उद्योजकता

आपल्या उद्योग व्यवसायात वाढ कशी घडवून आणायची?how to scale your business in marathi

आपल्या उद्योग व्यवसायात वाढ कशी घडवून आणायची?how to scale your business in marathi

आज प्रत्येक व्यावसायिक तसेच उद्योजकाची ईच्छा असते की त्याच्या व्यवसायात दिवसेंदिवस अधिक वृदधी घडुन यावी.मग तो एखादे छोटेसे किराण्याचे दुकान असलेला दुकानदार असो किंवा एखाद्या मोठ्या कंपनीचा मालक असो.

आज आपल्याला प्रत्येकालाच वाटते की आपल्या उद्योग व्यवसायाचा अधिकतम विस्तार व्हावा जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त प्रगती करता येईल.

पण आपल्या उद्योग व्यवसायात वाढ घडवून आणण्यासाठी आपण काय करायला हवे कोणता स्ट्रॅटेजीचा वापर करावा हे अधिकतम व्यावसायिक उद्योजकांना माहीत नसते.

याचकरीता आजच्या लेखामध्ये आपण आपल्या उद्योग व्यवसायात वाढ घडवून आणण्यासाठी कोणत्या स्ट्रॅटेजीचा वापर करावा? आपल्या व्यवसायात वृद्धी कशी घडवून आणायची हे जाणुन घेणार आहोत.

उद्योग व्यवसायाचा भौगोलिक विस्तार करणे-

आपल्या व्यवसायाच्या पातळीत वृद्धी करण्यासाठी दोन पद्धतींचा वापर करू शकतो.यात पहिली पद्धत आहे भौगोलिक विस्तार.ज्यात आपण आपल्या उद्योग व्यवसायात भौगोलिक विस्तार घडवून आणु शकतो.

म्हणजे समजा एखाद्या उद्योजक व्यावसायिक त्याच्या कंपनीचे प्रोडक्चा एका हाॅस्पिटलला पुरवठा करीत आहे.अणि तो आपला हा उद्योग व्यवसाय एका विशिष्ट शहरामध्ये चालवत आहे.

त्या शहरातील सर्व हाॅस्पिटल सोबत त्याचे बोलणे देखील झाले आहे.आपल्या उद्योग व्यवसायात ज्या हाॅस्पिटलला त्याला आपला ग्राहक बनवता आले त्यांना त्याने ग्राहक बनविले आहे.

आता त्या व्यक्तीला आपल्या उद्योग व्यवसायात विस्तार घडवून आणायचा असेल तर त्याला त्या विशिष्ट शहरा व्यतिरिक्त त्याच्या आजुबाजूला असलेल्या इतर शहरांमध्ये देखील त्याच्या उद्योग व्यवसायाचा विस्तार करता येईल.

इथे उद्योजक व्यावसायिक आधीच्या शहरात ज्या प्रोडक्टची विक्री त्याने केली त्याच प्रोडक्टची विक्री करणार आहे अणि त्या एका विशिष्ट क्षेत्रातील ग्राहकांनाच आपले प्रोडक्ट विकणार आहे.

फक्त इथे त्याने आपल्या उद्योग व्यवसायात वाढ घडवून आणण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रात वाढ केली आहे.

बाजारात प्रवेश –

इथे उद्योग व्यवसायिक आपल्या व्यवसायात वृदधी घडवून आणण्यासाठी एका विशिष्ट शहराच्या बाहेर जात नसतो.

म्हणजे समजा त्या उद्योग व्यवसायिकाने त्याचे प्रोडक्ट त्या विशिष्ट शहरातील सर्व हाॅस्पिटलला दिले आहे तर आता हेच प्रोडक्ट ती कंपनी त्या विशिष्ट शहरातील छोट्या क्लिनिक करीता उपलब्ध करून देऊ शकते.

किंवा त्या प्रोडक्ट मध्ये थोडीफार अजुन सुधारणा करून कंपनी आपले प्रोडक्ट हाॅटेल इंडस्ट्रीला, तसेच शाळा महाविद्यालयात देखील उपलब्ध करून देऊ शकते.

याआधी आपल्या प्रोडक्टला कंपनी फक्त व्यावसायिक वापराकरीता देत असेल तर इथुन पुढे कंपनी आपले प्रोडक्ट वैयक्तिक उपयोगासाठी देखील उपलब्ध करून देऊ शकते.

म्हणजे यात आपण बाजाराच्या जागेत कुठलाही बदल घडवून न आणता फक्त आपल्या प्रोडक्ट मध्ये सुधारणा घडवून आणत आपल्या उद्योग व्यवसायात विस्तार घडवून आणु शकतो.

किंवा आपण आपल्या प्रोडक्ट सर्विसेसच्या इंडस्ट्री मध्ये बदल करून देखील आपल्या उद्योग व्यवसायाच्या पातळीत वाढ विस्तार घडवून आणु शकतो.

सेल्स अणि मार्केटिंग –

आपल्याला आपल्या उद्योग व्यवसायात विस्तार घडवून आणायचा असेल तर आपल्या उद्योग व्यवसायाची मार्केटिंग करणे खुप आवश्यक असते.

सेल्स अणि मार्केटिंग करण्यासाठी आपणास वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करता येईल.

आपल्या उद्योग व्यवसायाचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपण विशिष्ट शहराच्या बाहेर आपल्या आजुबाजूला असलेल्या इतर शहरात आपला उद्योग व्यवसाय सुरू करू शकतो.

किंवा आपण स्वताचे दुकान सुरू न करता तेथील वितरकांना आपले प्रोडक्ट देऊ शकतो,एखाद्या व्यक्तीला आपल्या दुकानाची,कंपनीची फ्रेंचायजी देऊ शकतो अणि त्याद्वारे आपल्या प्रोडक्टची विक्री करू शकतो.

यापैकी आपण कुठल्याही एका पद्धतीचा वापर आपल्या उद्योग व्यवसायात विस्तार घडवून आणण्यासाठी करू शकतो.

पण ह्या सर्व गोष्टींसाठी आपल्याकडे स्वताची एक टीम असणे आवश्यक आहे.

म्हणजे समजा कंपनीची फ्रेंचायजी वितरीत करायची असेल तर त्यासाठी देखील एक सेल्स टीमची आवश्यकता असणार आहे जी लोकांना जाऊन भेटेल.

ज्यांना कंपनीची फ्रेंचायजी घेण्यात रूची आहे अशा व्यक्तींना फ्रेंचायजी देईल.अणि कंपनीला बाजारात आपले वितरक बनवायचे असल्यास त्यासाठी देखील कंपनीला बाजारात एक टीम सोडावी लागेल.

एवढेच नव्हे तर कंपनीला स्वताचे दुकान सुरू करायचे असेल तेव्हा देखील बाजारात आपल्या प्रोडक्टची मार्केटिंग करण्यासाठी टीमची आवश्यकता असणार आहे.

म्हणजे कंपनीला आपल्या सेल्स अणि मार्केटिंगच्या कार्यात शक्कल लढवावी लागणार आहे.त्यात विभाजन करावे लागेल.

सेल्स मध्ये वाढ घडवून आणण्यासाठी सर्वप्रथम कंपनीला आपल्या मार्केटिंग मध्ये वाढ करणे आवश्यक आहे.

कारण जर मार्केटिंग न करता आपण एखाद्या व्यक्तीला सांगितले तुम्ही माझ्याकडुन फ्रेंचायजी घ्या तेव्हा ती व्यक्ती आपल्याला विचारेल की मी तुझ्याकडुन फ्रेंचायजी का घ्यावी?तुझी कंपनी बाजारातील मोठा ब्रँड देखील नाहीये.

तुझ्या मालाची बाजारात विक्री होईल का?

याचकरीता आपल्याला आपल्या उद्योग व्यवसायाच्या मार्केटींग तसेच सेल्स टीमच्या कार्याकडे अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल.

म्हणजे समजा बाजारात आपल्या मालाला १० करोडपर्यत मागणी आहे अणि ह्या मागणीत आपल्याला २० करोडपर्यत वाढ घडवून आणायची आहे तर अशावेळी आपल्या प्रोडक्टला तेवढी मागणी देखील प्राप्त होणे आवश्यक आहे.

यासाठी आपण ऑनलाइन किंवा ऑफलाईन ह्या दोघांपैकी कुठल्याही एका पद्धतीचा वापर करून बाजारात आपल्या प्रोडक्टची मार्केटिंग करू शकतो.

बाजारात आपल्या टीमला सोडुन आपल्या उद्योग व्यवसायाची मार्केटिंग करू शकतो किंवा सोशल मीडियावर जाहीरात करून देखील आपणास आपल्या प्रोडक्ट सर्विसेसची मार्केटिंग करता येते.

याने आपले प्रोडक्ट सर्विस बाजारात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल.

असे केल्याने आपल्या प्रोडक्ट सर्विसेस अणि कंपनीविषयी बाजारातील अधिकतम लोकांना माहिती प्राप्त होईल लोकांमध्ये जनजागृती होईल.

पुरवठा

पहिल्यांदा आपण आपल्या उद्योग व्यवसायासाठी बाजारातील एका विशिष्ट जागेची निवड केली.यानंतर बाजारात आपल्या प्रोडक्टच्या मागणीवर देखील काम केले.

यानंतर आपल्याला आपल्या प्रोडक्टच्या पुरवठ्यावर काम करणे आवश्यक आहे.

म्हणजे समजा आपली १० करोडपर्यत विक्री होत होती यानंतर आपण बाजारात गेलो इतर दुकानदारांना आपली फ्रेंचायजी वितरीत केली.

तसेच आपल्याला बाजारात वितरक देखील प्राप्त झाले यानंतर आपण नवीन आॅफिस देखील सुरू केले आपल्याकडे ग्राहक देखील येण्यास सुरुवात झाली.

आपण आपल्या प्रोडक्टची मार्केटिंग देखील उत्तम पद्धतीने केल्याने आपल्या सेलिंग देखील चांगली होते आहे.पण अचानक बाजारातुन ग्राहकांची मागणी वाढली तर ती आपल्याला पुर्ण देखील करता येणे आवश्यक आहे.

समजा आपली कंपनी स्वता मॅन्युफॅक्चरींग करत असेल तर कंपनीला बाजारातुन जेवढी मागणी केली जात आहे तेवढा माल तयार करता येईल का?

आपल्या कंपनीची तेवढी उत्पादन करण्याची क्षमता आहे किंवा नाही?

किंवा आपण बाजारातून ज्या मॅन्युफॅक्चरर कडुन माल खरेदी करतो आहे त्याची एवढा अधिक माल तयार करण्याची क्षमता आहे किंवा नाही?

एकाच विक्रेत्याकडे आपल्याला तेवढा माल उपलब्ध होईल का आपल्याला बाजारात वेगवेगळ्या विक्रेत्यांशी संपर्क साधावा लागेल.

ह्या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्याला आपल्या पुरवठा संचात सुधारणा घडवून आणावी लागेल.

म्हणजे समजा आपण बाजारातुन एकाच विक्रेत्याकडुन प्रोडक्टची खरेदी करत असाल तर बाजारातील ग्राहकांची मागणी पुर्ण करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या विक्रेत्यांकडुन प्रोडक्टची खरेदी करावी लागेल.

अणि त्या विक्रेत्यांकडुन आपण मर्यादीत मालाची खरेदी करत असाल तर त्याच्याशी बोलावे लागेल की डबल ऑडर दिल्यास तेवढा माल ते देऊ शकतील किंवा नाही?

अणि जरी आपण स्वता प्रोडक्टची मॅन्युफॅक्चरींग करत असलो तरी आपल्याला इथे देखील अनेक गोष्टी बघाव्या लागतील.

आपल्याकडे बाजारात प्रोडक्टची जेवढी मागणी आहे तेवढा माल तयार करण्याची क्षमता आहे किंवा नाही?

तसेच प्रोडक्टची मॅन्युफॅक्चरींग करण्यासाठी आवश्यक ती सर्व यंत्रे संसाधने आपल्याकडे मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहेत किंवा नाहीत.

आपल्याकडे एवढ्या अधिक प्रमाणात मशीनवर बसुन मालाचे उत्पादन करण्यासाठी कामगार उपलब्ध आहेत किंवा नाही.अशा प्रकारे आपल्याला आपल्या यंत्रे, सामग्री,कामगार इत्यादी वर देखील काम करावे लागेल.

याचसोबत आपल्याला आपल्या आॅफिस स्टाफ कडे देखील बघावे लागेल आपल्या अकाऊंटंटला एवढी इंट्री करता येईल का?का तिथे देखील आपल्याला अतिरिक्त स्टाफची आवश्यकता पडणार आहे.

जो आपल्यासाठी कोटेशन बनवायचे काम करेल त्याला देखील एवढे कोटेशन बनवता येईल किंवा नाही का तिथे देखील आपणास अतिरिक्त व्यक्तीची कामासाठी आवश्यकता असणार आहे.ह्या सर्व गोष्टी देखील आपणास पाहणे गरजेचे आहे.

आज आपल्या आॅफिस मध्ये १० लोकांचा स्टाफ उपलब्ध आहे.

भविष्यात त्याची संख्या २५ ते ३० होईल अशा परिस्थितीत एवढी अधिक हायरींग करण्याची व्यवस्था आपल्याकडे आहे किंवा नाही एवढ्या स्टाफचे वेतन आपणास देता येईल किंवा नाही?

याचसोबत एवढ्या अधिक स्टाफची बसण्याची सोय करण्यासाठी आपल्याकडे खुर्च्या टेबल वगैरे इत्यादी पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत किंवा नाहीत.

आपले आॅफिस एवढे मोठे आहे का ज्यात आपल्या आॅफिस मधील सर्व कर्मचारींना काम करता येईल हे देखील बघावे लागेल.

आज प्रत्येक व्यक्तीला वाटते की आपल्या उद्योग व्यवसायामध्ये वाढ व्हायला हवी त्यात अधिकतम प्रमाणात विस्तार घडुन यायला हवा.

यासाठी आपण आपल्या उद्योग व्यवसायात मालाच्या विक्रीत देखील वाढ घडवून आणतो.

अणि जर आपले प्रोडक्ट उत्तम आहे आपली सर्विसची गुणवत्ता देखील उत्तम दर्जाची आहे तर अशा परिस्थितीत आपल्याला आपल्या ग्राहकांमध्ये वाढ घडवून आणने अधिक सोपे जाते.

पण बाजारात आपल्या प्रोडक्टची मागणी अधिक वाढल्यास आपल्याला एवढे अधिक प्रमाणात मॅन्युफॅक्चरींग करता येईल का?

एवढे प्रोडक्ट आपण बाजारातील ग्राहकांना उपलब्ध करून देऊ शकतो का? आपल्या उद्योग व्यवसायात वाढ घडवून आणण्याआधी याचा विचार करणे देखील खुप महत्वाचे असते.

म्हणून जेव्हा आपण बाजारात आपल्या उद्योग व्यवसायात विस्तार घडवून आणायचा विचार करू.

तेव्हा सर्वप्रथम आपल्याला आपण आपल्या उद्योग व्यवसायात विस्तार कसा घडवून आणु शकतो याबाबत एक प्लॅन तयार करायला हवा.

अणि तेव्हाच बाजारात स्केलिंग करण्याबाबत विचार आपण करायला हवा.अणि उद्योग व्यवसायात जेव्हा मागणी वाढेल तेव्हा मालाच्या पुरवठ्यात देखील वाढ करायला हवी.

कारण समजा बाजारातुन अचानक ग्राहकांनी प्रोडक्टची मागणी करण्यास सुरुवात केली.

अणि आपल्याला बाजारातील मागणी आपली उत्पादनक्षमता मनुष्यबळ संसाधने कमी असल्याने पुर्ण नाही करता आली तर ग्राहकांमध्ये नाराजी निर्माण होण्यास सुरुवात होईल.

अणि आपली मागणी पुर्ण होत नसल्याने नाराज झालेले आपले रोजचे ग्राहक आपल्यापासून माल घेणे बंद देखील करायला लागतील.

याने आतापर्यंत आपण आपल्या उद्योग व्यवसायाला बाजारात स्थापित करण्यासाठी त्याचा जम बसवण्यासाठी जेवढीही मेहनत घेतली होती ती सर्व वाया जाऊ लागेल.

अणि समजा आपण आपल्या कारखान्याच्या क्षमतेत वाढ घडवून आणली.कारखान्यात मालाचे उत्पादन काम करण्यासाठी जास्त कामगार ठेवले.

तरी अशा परिस्थितीत हा प्रश्न निर्माण होतो की जेवढे आपण मॅन्युफॅक्चरींग करतो आहे तेवढी बाजारातुन आपल्या मालाला मागणीच प्राप्त झाली नाही,कोणी त्याची खरेदीच केली नाही तर आपण काय करायचे?

याकरिता आपल्याला सुरूवातीला एका वर्षाचा प्लॅन तयार करावा लागेल.जानेवारी फेब्रुवारी मध्ये माझ्या मालाच्या मागणीत ५० टक्के वाढ झाली.तर मला मालाच्या उत्पादन क्षमतेत ५० टक्के वाढ करावी लागेल.

म्हणजे जेवढी बाजारात मागणी तेवढयाच मालाचे उत्पादन पुरवठा आपणास करायचा आहे.

फायनान्स

बाजारात जेव्हा आपण आपल्या उद्योग व्यवसायात विस्तार घडवून आणु तेंव्हा जिथे आपल्याला आधी १० करोड मिळत होते तिथे २० करोड मिळतील.

पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे हे सर्व पैसे नंतर दुप्पट होणार आहेत.

सर्वप्रथम आपल्याला आपल्या उद्योग व्यवसायात वाढ घडवून आणण्यासाठी आपल्या खिशातुन पैसे खर्च करावे लागणार आहेत.ही एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवायला हवी.

कारण उद्योग व्यवसायात विस्तार घडवून आणण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम मार्केटिंग वर भरपूर पैसे खर्च करावे लागतील.

याचसोबत आपणास सेल्स करीता एक टीम तयार करावी लागेल.कंपनीत काम करण्यासाठी कर्मचारींची नियुक्ती करावी लागेल.एवढेच नव्हे तर आपल्याला आपल्या उत्पादन क्षमतेत, मनुष्यबळात देखील वाढ करावी लागेल.

मॅन्युफॅक्चरींग करीता आवश्यक असलेल्या पायाभूत सोयी सुविधांची सोय करावी लागेल.तसेच सर्व कर्मचारींना काम करण्यासाठी आॅफिसची तजवीज करावी लागेल.

ह्या सर्व गोष्टींवर खर्च करण्यासाठी आपल्याकडे अतिरिक्त पैसे असणे आवश्यक आहे.

अणि आपण जो व्यवसाय करत आहे त्यातुन आपल्याला एवढा नफा प्राप्त होतो आहे का ज्यात हा सर्व अतिरीक्त खर्च आपणास करता येईल? 

आपल्या उद्योग व्यवसायातुन जेवढाही नफा प्राप्त होत आहे त्याचे रूपांतर रोख रक्कम मध्ये झाले आहे का? आपल्याकडे खर्च करण्यासाठी रोख रक्कम आहे का?

अणि समजा उद्योग व्यवसायात विस्तार करण्यासाठी आपल्याला ५० लाख लागता आहेत.

अणि आपल्याकडे फक्त ३० लाख आहेत अशावेळी उर्वरीत २० लाख बॅकेकडुन आपणास मिळतील एवढे आपले बॅलन्स शीट मजबूत आहे किंवा नाही हे देखील पाहणे आवश्यक आहे.

अणि समजा जरी बॅकेने २० लाखाचे कर्ज आपणास दिले तर आपल्या उद्योग व्यवसायात विस्तार घडुन आल्यानंतर आपण त्याचे व्याज अणि मुद्दल फेडु शकतो का तेवढी आर्थिक क्षमता आपली आहे का?याचे आर्थिक ज्ञान देखील आपणास असायला हवे.

थोडक्यात सांगायचे म्हटले तर उद्योग व्यवसायात विस्तार घडवून आणने की खुप मोठी गोष्ट नाहीये आज कोणीही आपल्या उद्योग व्यवसायात वाढ घडवून आणु शकते.

पण उद्योग व्यवसायात वाढ,विस्तार घडवून आणण्यासाठी आपल्याला व्यवसायातील सर्व महत्वाच्या पैलुंवर देखील काम करावे लागेल.

सर्वप्रथम आपल्याला कर्मचारींची नियुक्ती कशी करायची हे शिकावे लागेल.कारण चुकीच्या व्यक्तीला एखाद्या पदावर नियुक्त केले तर आपणास मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागेल.

अणि त्यातच नवीन कर्मचारींची नियुक्ती करण्यात जुने कर्मचारी काम सोडुन गेले तर तेव्हा देखील आपल्यासमोर अडचण निर्माण होते.

याचकरीता आपल्याला कर्मचारींची नियुक्ती करणे त्यांचे व्यवस्थापन करणे ह्या गोष्टी शिकुन घ्याव्या लागतील.कारण जुने कर्मचारी आपल्याकडे टिकुन राहतील तेव्हा आपल्याला अधिक प्रभावीपणे काम करता येईल.

याचसोबत आपणास फायनान्स संबंधीत माहीती जाणुन घ्यावी लागेल.प्राॅफिट अणि लाॅस, बॅलन्स शीट कसे वाचायचे ह्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *