उद्योजकता

जपानी लोकांच्या दिर्घायुष्याचे रहस्य काय आहे?japanese secrets of long and happy life 

जपानी लोकांच्या दिर्घायुष्याचे रहस्य काय आहे?japanese secrets of long and happy life 

आज आपल्या भारत देशातील व्यक्ती जास्तीत जास्त ६० ते ६५ वर्षांपर्यंत जगतात त्याचठिकाणी जपान मधील लोक १०० ते १२० वर्ष जगतात.

आज संपूर्ण जगभरात सर्वात जास्त वर्षे जगणारी गेन तनाका ११८ वय ह्या नावाची व्यक्ती देखील आपल्याला जपान मधील असल्याचे आढळून येते.

मेलबर्न युनिव्हसिर्टीने जपानी लोकांवर एक सर्वेक्षण केले होते ज्यात असे समोर आले की जपान ह्या देशात ५० हजारपेक्षा अधिक व्यक्ती असे आहेत ज्यांचे वय शंभरपेक्षा जास्त आहे.

जपान ह्या देशाने केलेला हा विक्रम बघुन सर्व जग आश्चर्यचकित झाले आहे.

एवढेच नव्हे जपान ह्या देशात गेल्यावर आपल्याला तिथे शंभर वय असलेली वृद्ध आजी आजोबा देखील सायकल चालवताना किंवा बागेत काम करताना दिसुन येतील.

आज संपूर्ण जगाला जपान ह्या देशाने शिकवले की आपल्या दिर्घायुष्याचे,तरूण दिसण्याचे सिक्रेट हे आपल्या वयावर नव्हे तर आपल्या जीवनशैलीवर अवलंबून असते.

आज आपण देखील आपल्या आयुष्यात,जीवनशैलीत जपानी लोकांप्रमाणे काही छोटछोटे परिवर्तन घडवून आणत

१२० ते ११५ वर्ष इतके दिर्घ आयुष्य आपल्या शरीराला पुर्णपणे स्वस्थ,निरोगी अणि तंदुरुस्त ठेवून आरामात जगु शकतो.

आजच्या लेखामध्ये आपण जपानी लोक १२० वय होईपर्यंत कसे जगतात? त्यांची जीवनशैली कशी आहे तसेच स्वताला स्वस्थ,निरोगी अणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी ते काय करतात हे जाणुन घेणार आहोत.

जपानी सरकारने तयार केलेली मार्गदर्शक तत्वे –

जापनीज सरकारने जपान मधील लोकांनी नेहमी आरोग्यदायी जीवन जगावे म्हणून काही मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत.

जापनीज सरकारने हेल्दी फुड विषयी तयार केलेल्या ह्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन सर्व देश विदेशातील कंपन्यांना आवर्जून करावे लागते.

जापनीज सरकार घरी बनविण्यात आलेल्या अन्नपदार्थांचे सेवण करण्यास येथील लोकांना अधिक प्रोत्साहित करते.

जपान मध्ये लहानपणापासून मुलांना नेहमी आरोग्यदायी आहाराचे सेवण करण्याचे धडे दिले जातात. 

यामुळे जपान मधील लहानमुलांपासुन तरूण तसेच वृद्ध व्यक्ती पर्यंत कोणीही उघड्यावर विक्री केल्या जाणाऱ्या जंकफुडचे फास्ट फूडचे सेवण करत नाही.

भुकेपेक्षा कमी खाणे –

जपानी लोक हे जेवढी त्यांना जितकी भुक लागलेली असते त्यापेक्षा २० टक्के कमी खात असतात म्हणजे जेवढी त्यांना भुक लागलेली असते त्याच्या फक्त ८० टक्के अन्नाचे सेवन ते करतात.८० टक्के पोट भरल्यावर ते तिथेच आपले जेवण करणे थांबवतात.

यामुळे ते नेहमी शारीरीक दृष्ट्या देखील सक्रिय राहतात.

जपान मधील लोक नेहमी छोट्याशा ताटात जेवण करतात.जेणेकरून कमी अणि शरीराला आवश्यकता आहे तेवढेच अन्न त्यांच्या पोटात जाते.

जेवण करताना अन्नाचा प्रत्येक कणकण ते कुठलीही घाई न करता एकदम शांतपणे,जागृतपणे व्यवस्थित चावून खात असतात.

 जपानी लोक एकाच वेळी खुप जास्त अन्न ग्रहण करत नाही.याने त्यांचे आरोग्य पण चांगले राहते.अणि रोज खाण्यासाठी कमी अन्न बनविल्याने अन्नाची देखील नासाडी होत नाही.

भूकेपेक्षा जास्त किंवा जलदगतीने खाल्ल्याने अन्न न पचण्याच्या चयापचय समस्या देखील निर्माण होतात.पोटात गॅस निर्माण होतो.आपल्या शरीरात लठ्ठपणा निर्माण होतो अणि आपली काम करण्याची क्षमता देखील कमी होते.

एवढेच नव्हे तर आपले आयुष्य कमी कमी होत जाते तरूणपणातच आपण म्हातारे दिसायला लागतो.

डेअरी पदार्थ अणि लाल मांसाचे कमी सेवण करणे –

दुधापासून बनविण्यात आलेल्या डेअरी प्रोडक्ट तसेच लाल मांस यांमध्ये सर्वात जास्त चरबी असते म्हणून जपान मधील लोक यांचे खुप कमी प्रमाणात सेवन करतात.

याचठिकाणी जपानी लोक सीफुडचे अधिक सेवण करतात कारण यात आयर्न पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतात.

आकडेवारीतुन असे समोर आले आहे की आज जगातील १० टक्के इतके सी फुडचे एकट्या जपान ह्या देशातील लोक सेवण करतात.

तेलात तळलेल्या अन्नपदार्थाचे सेवन न करणे –

आपल्या भारत देशातील लोक अधिकतम प्रमाणात तेलात तळलेले अन्नपदार्थ खाणे अधिक पसंत करतात जे आपल्या आरोग्यासाठी खुप हानीकारक असते.

पण जपानी लोक आपले अन्न वाफेवर शिजवून बनवतात याने त्या अन्नातील पोषक तत्वे त्या अन्नातच मिसळून जातात.याने अन्न अधिक चवदार अणि पौष्टिक बनते.

जपानी लोकांचा चहाचा शौक –

असे म्हटले जाते की जपानी लोकांच्या दिर्घायुष्याचे रहस्य त्यांच्या चहा पिण्याच्या सवयीत देखील दडलेले आहे.

जपानमध्ये शंभरपेक्षा अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या चहाचे सेवन केले जाते.पण जपान मधील चहा भारतातील चहा प्रमाणे नसतो तेथील सर्व प्रकारचे चहा आरोग्यदायी असतात.म्हणून येथील लोक दिवसभरात कमीत कमी तीन ते चार वेळा चहा पितात.

पायी चालणे –

आज जपान तंत्रज्ञान अणि प्रगतीच्या बाबतीत जगभरातील सर्वात मोठमोठ्या देशात गणले जाते.

तरी देखील जपान मधील लोक कुठेही जाण्यासाठी बाईक किंवा कारचा वापर न करता सायकलचा वापर करतात.

किंवा जवळपास जायचे असल्यास पायी चालत जातात याने त्यांचा कोलेस्टेरॉल नियंत्रित राहतो अणि त्यांना हदयरोगाची समस्या देखील उद्भवत नाही.

शरीराचा देखील पुरेसा व्यायाम होतो.याने इंधनाची बचत होते अणि ध्वनी प्रदुषण देखील होत नाही.

आज जपानी लोकांच्या ह्या सवयीमुळे जपान मध्ये आपल्याला एकही व्यक्ती लठ्ठ असल्याचे दिसून येत नाही.तिथे सर्व व्यक्ती सडपातळ असल्याचे दिसून येते.

जपानमधील नागरीक स्वताच्या वाहनात प्रवास न करता रेल्वे किंवा रिक्षा,बसने प्रवास करतात.याने देशातील प्रदुषण देखील नियंत्रित राहते.

रुटीन चेक अप –

भारतातील लोक पुर्णतः आजारी पडल्याशिवाय किंवा एखादा मोठा आजार जडत नाही तोपर्यंत दवाखान्यात पाऊल देखील टाकत नाही.

पण जापनीज नागरीक वर्षातुन १२ वेळा हाॅस्पिटल मध्ये जाऊन आपल्या शरीराचे रूटीन चेक अप करतात.याने त्यांना कुठलाही गंभीर आजार जडत नाही.तसेच ते जास्त आजारी देखील पडत नाही.

स्वच्छता

जापनीज लोक आपल्या आजुबाजुचा संपूर्ण परिसर नेहमी स्वच्छ राहील याची विशेष काळजी घेतात.जपान मधील लोक रस्त्यावर कचरा फेकत नाही.

कारण जापनीज लोकांचे असे म्हणने आहे की स्वच्छता राखल्याने आपल्याला आजारांपासून स्वताचा बचाव करता येतो.

जपान मधील शाळेत लहानपणापासून मुलांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जाते.

आहार करण्याची पद्धत –

जपानी लोक जेवण करणे अन्नाचे सेवन करणे याला योगा तसेच पवित्र यज्ञ पुजा करण्याप्रमाणे मानतात.

भारतात जेवण करताना लोक टिव्ही तसेच मोबाईल बघत असतात एका हातात मोबाईलवर चॅट करतात अणि दुसरया हाताने जेवण करतात.

टीव्ही बघत जेवण करतात लगबगीत वेगाने जेवण करतात याने घाईघाईत कसेबसे तोंडात अन्न कोंबल्याने आपण अन्न नीट चावुन देखील खात नाहीत.

जपानी कुटुंबातील व्यक्ती आपल्या कुटुंबासमवेत अन्नाचे एकत्र बसुन सेवण करतात.अणि जपानी लोक जमिनीवर बसुन अन्नाचे सेवन करतात.

कारण जमिनीवर बसुन जेवण केल्याने आपली पाठ नेहमी संतुलित राहते.हया संतुलनाने आपला छोटा मेंदु सिरीबेलम हा सक्रीय होतो.

आपला छोटा मेंदु सक्रीय झाल्याने आपले संपूर्ण मन शांत होते.याचसोबत याने जेवण करताना आपले इतर कुठल्याही गोष्टींकडे लक्ष वेधले जात नाही.

इकिगाई

जापनीज लोकांना माहीत असते की त्यांच्या जीवणाचे उद्देश काय आहे ह्या पृथ्वीवर असे कोणते काम आहे जे करण्यासाठी त्यांचा जन्म झाला आहे.

त्यांना त्यांचा इकिगाई सापडला आहे अणि त्याच्या दिशेने ते रोज काम करत असतात.

जपानी लोकांमधील प्रेम भावना –

एका सर्वेक्षणातून समोर आले आहे की ज्या लोकांच्या आयुष्यात प्रेम होते तसेच त्यांच्याकडे जीवन जगण्याचे एक उद्दिष्ट होते जे आपल्या कुटुंबातील व्यक्ती आई,वडील,भाऊ पत्नी मुलांसाठी जगत होते ते जास्त तरूण दिसु लागले.

आज आपल्या देशात दिवसेंदिवस वृद्धाश्रमांचे प्रमाण वाढत चालले आहे याचमुळे वृद्धापकाळात आवश्यक ते प्रेम काळजी न मिळाल्याने लोक लवकर मृत्यू पावतात.

आज जपानमध्ये एक देखील वृद्धाश्रम नाहीये.कारण जपानमधील मुले आपल्या वृद्ध आईवडिलांना आपल्या समवेत आपल्या घरातच ठेवतात.

कारण येथील लोकांना माहीत आहे की वृद्ध व्यक्तींना अनुभव असतो अणि लहानमुले ही बुजुर्ग व्यक्तींसोबत खेळत असतात.बुजुर्ग व्यक्ती नेहमी लहानमुलांना चांगल्या गोष्टी शिकवत असतात.अणि त्यांची काळजी घेत असतात. याने वृद्ध लोकांमध्ये देखील प्रेमाची भावना निर्माण होते.

अणि त्यांच्या मनात प्रेमाची भावना निर्माण झाल्याने त्यांच्या शरीरातील oxytocin ची पातळी वाढते.याने वृद्ध व्यक्ती कधीही निराश हताश राहत नाही.त्यांचे सर्व डिप्रेशन तणाव चिंता पुर्णतः दुर होऊन जाते. 

ज्यामुळे त्यांच्या आयु मर्यादेत देखील वाढ होते अणि ते म्हतारपणात अधिक तरूण दिसु लागतात.

घरातील छोटछोटे काम स्वता करणे –

जपान मधील वृद्ध लोक देखील आपल्या घरातील बगीच्यात पाणी मारण्यापासुन ते घर गाडी स्वच्छ करणे इत्यादी सर्व छोटछोटे काम स्वता करतात.

एका अभ्यासातून समोर आले आहे की जे व्यक्ती आपल्या घरातील कामे स्वता करतात त्यांच्या आयु मर्यादेत अधिक वाढ घडुन येते.असे व्यक्ती दिर्घकाळ तरुण देखील राहतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *