उद्योग मोटिवेशनउद्योजकताशेती उद्योगसुविचारस्वतःची डेव्हलोपमेंट

असामान्य (Extraordinary) लोक कसा विचार करतात ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

स्टीव्ह जॉब्स, बिल गेट्स, वॉरेन बफेट, रतन टाटा, एलोन मस्क, नेल्सन मंडेला, ओप्राह विन्फ्रे, मदर तेरेसा, महात्मा गांधी या आणि अशा अनेक व्यक्तींनी संपूर्ण मानवजातीवर खूप मोठा प्रभाव पडलेला आहे. या सर्वांनी त्यांच्या परीने मानवतेची सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे.

जर तुम्ही स्व-विकास साधण्याचा प्रयत्न केला असेल तर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल ती म्हणजे, “आपण जे विचार करतो, तेच विचार प्रत्यक्षात येतात”. मागील १० वर्षांपासून मी आयुष्य बदलून टाकणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी मला असामान्य लोक कसा विचार करतात? याविषयी अभ्यास करणे गरजेचे होते. सामान्य लोकांपेक्षा कोणत्या वेगळ्या गोष्टी हे लोक करतात ज्यामुळे मोठा बदल घडून येतो?

माझ्या मते मुख्यत्वेकरून असामान्य लोक सामान्यांपेक्षा तीन बाबतीत वेगळे असतात.

१. कठोर मेहनत विरुद्ध मिळणारे फळ :

कुठलीही गोष्ट करण्यापूर्वी सामान्य लोकांची प्रवृत्ती असते की, ते फक्त काम करण्यावर लक्ष देतात. त्यातून होणाऱ्या परिणामांचा फारसा विचार करत नाहीत.
टेस्ला कार रस्त्यावर आणण्यासाठी एलोन मस्कला अगणित अडथळ्यांना तोंड द्यावे लागले. तसेच ओप्राह विन्फ्रेला तिचा टीव्हीवरील कार्यक्रम प्रचंड यशस्वी करण्यासाठी बरीच दिव्यं पार करावी लागली. पण त्यांचं लक्ष त्यांच्या मेहनतीपेक्षा त्यातून मिळणाऱ्या यशाकडे होतं आणि म्हणून ते यशस्वी झाले.

२. मीच का विरुद्ध मीच का नाही :

सामान्य लोक नेहमी विचार करतात की, “मीच का?” सगळं दु:ख, सगळा त्रास माझ्याच वाट्याला का? अपयशाचा आणि नकारांचा सामना नेहमी मलाच का करावा लागतो? जगात बदल घडवण्याची जबाबदरी मीच का उचलावी?
याउलट असामान्य लोक विचार करतात, “मीच का नाही?” या जगात काहीतरी नवीन जन्माला घालणारा पहिला माणूस मीच का असू नये? लोकांचं जगणं सुसह्य करणारी एखादी गोष्ट मी का निर्माण करू नये? संकटांचा सामना करून, त्यावर उपाय शोधून मी ते उपाय इतरांशी शेअर का करू नयेत? जर मी हे करू शकतो, तर मी ते केलंच पाहिजे.

३. उद्या विरुद्ध आज :

सामान्य लोक चालढकल करण्यात पटाईत असतात, तर असामान्य लोक लगेच सुरुवात करण्यात. सामान्य लोक आजचं काम उद्यावर कसं ढकलता येईल याचा विचार करतात, तर असामान्य लोक उद्याचं काम आजच कसं करता येईल याचा विचार करतात.
तुम्ही आजची कामं उद्यावर ढकलणं बंद करा आणि बघा काय चमत्कार होतो ते. उद्या कधीही येत नाही. त्यामुळे सामान्य लोक अर्थपूर्ण आणि प्रभावी जीवनाऐवजी सामान्य जीवनच जगत राहतात.

तर मित्रांनो, जर तुम्हाला पटकन यशस्वी व्हायचं असेल तर खालील तीन प्रश्न स्वतःला विचारा.

१. संपूर्ण मानवजातीवर मोठा परिणाम करू शकेल अशी कोणती गोष्ट मी करू शकतो?
२. ती गोष्ट फक्त मीच का करू शकतो?
३. ती गोष्ट प्रत्यक्षात आणण्यासाठी मला आजपासूनच काय करायला पाहिजे?
आणि सुरुवात करा.

Marathi Udyojak

मराठी उद्योजक हा प्रत्येक मराठी उद्योजकासाठी एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. मराठी उद्योजकच्या माध्यमातून आम्ही व्यवसाय, शेअर मार्केट, स्टार्टअप इत्यादी विषयी उपयुक्त माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोहचवत असतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *