टाईनी हॅबिट पुस्तकाचा परिचय tiny habit book summary in Marathi
टाईनी हॅबिट पुस्तकाचा परिचय tiny habit book summary in Marathi
आपण आपले भविष्य बदलू शकत नाही पण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातील सवयी नक्कीच बदलु शकतो ज्यामुळे भविष्यात आपल्या जीवनात एक मोठे परिवर्तन घडून येईल.
आतापर्यंत मानवी सवयींवर आधारीत अनेक पुस्तकांचे लेखन करण्यात आले आहे.ज्यात ॲटोमिक हॅबिट,द पावर ऑफ हॅबिट सारख्या अनेक महत्वपूर्ण पुस्तकांचा समावेश होतो.
टाईनी हॅबिट ही मानवी सवयींवर आधारीत असेच एक पुस्तक आहे ह्या पुस्तकाचे लेखक बीजे फाॅग हे आहेत.
हे पुस्तक आपणास आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित छोटछोटया गोष्टींमध्ये परीवर्तन घडवून आणण्यास शिकवते.
बीजे फाॅग हे एक अमेरिकन सोशल साइंटिस्ट आहेत तसेच ते स्टॅनफोर्ड युनिव्हसिर्टीत बिहेव्हीअर डिझाईन लॅबचे संस्थापक देखील आहेत.
हे पुस्तक लिहिण्यासाठी बीजे फाॅग यांनी २० वर्षांपेक्षा अधिक काळ दैनंदिन जीवनातील छोटछोटया सवयींवर संशोधन केले आहे अणि आतापर्यंत ४० हजारपेक्षा अधिक लोकांना ह्या विषयी प्रशिक्षण देखील दिले आहे.
टाईनी हॅबिट ह्या पुस्तकात बीजे फाॅग यांनी अनेक महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.
आपण आपल्या अपयशाचे दुख मनात ठेवून वाईट वाटुन न घेता आपल्या यशाबाबत चांगला विचार कसा करावा हे देखील आपणास इथे सांगितले आहे.
बीजे फाॅग यांनी लिहिलेले टाईनी हॅबिट हे पुस्तक अशा सर्व व्यक्तींसाठी आहे.ज्यांना आपल्या दैनंदिन जीवनात काही चांगल्या छोटछोटया सवयी लावून घ्यायच्या आहेत.पण त्यांना यात पाहीजे तसे कुठलेही यश प्राप्त होत नाहीये.
ह्या पुस्तकात बीजे फाॅग यांनी आपल्याला हे सांगितले आहे की मानवी वर्तन चांगल्या सवयी जोपासण्यासाठी आपल्या जीवनात कशी महत्वाची भुमिका पार पाडते.
ह्या पुस्तकातुन आपल्याला ही गोष्ट शिकायला मिळते की फक्त तात्पुरता प्राप्त केलेले मोटीव्हेशन हे आपल्या सवयीमध्ये कायमस्वरूपी मोठे क्रांतीकारी परिवर्तन घडवून आणण्याचे विश्वसनीय स्रोत नाहीये.
तसेच आपल्याला बीजे फाॅग यांनी लिहिलेल्या ह्या पुस्तकातुन हे देखील शिकायला मिळते की आपण स्वताला काही छोटछोटी कामे करण्याची सवय लावून भविष्यात आपल्या स्वतामध्ये कशापद्धतीने मोठे परिवर्तन घडवून आणु शकतो.
ॲटोमिक हॅबिटचे लेखक जेम्स क्लिअर म्हणतात आज आपण स्वताला ज्या छोटछोटया सवयी लावतो आहेत त्याच भविष्यात आपल्याला एक मोठा रिझल्ट प्राप्त करून देतील.
पुस्तकाचा सारांश –
जाॅन नावाचा एक तरूण मुलगा होता ज्याला आपल्या अंगी काही चांगल्या सवयी जोपासायच्या होत्या.
पण त्याला चांगल्या सवयी जोपासण्यात अनेक समस्या तसेच अडचणी येत होत्या.जाॅनला आपल्या जीवनात अधिक प्रोडक्टीव्ह, हेल्दी अणि आनंदी राहायचे होते.
पण त्याला नवीन सवयी जोपासण्यासाठी फाॅलो करणे आवश्यक असलेल्या नवीन रुटीनचे पालन करणे जमत नव्हते.एकेदिवशी जाॅन सेल्फ इंप्रूव्हमेंट संबंधित लिहिण्यात आलेले एक पुस्तक वाचत असतो.
पुस्तकात जाॅन बांबूच्या झाडाची एक कथा वाचतो.बांबुचे झाड फार जलदगतीने मोठे होते.पण त्यांना त्यांच्या रुट सिस्टम मध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी चार ते पाच वर्ष इतका कालावधी लागत असतो.
ह्या चार वर्षांच्या कालावधीत जमीनीच्या वरील बाजूस आपल्याला फक्त छोटेछोटे अंकुर दिसुन येतात.
मग ह्या कथेचे वाचन केल्यावर जाॅनला ह्या गोष्टीची जाणीव होते की जीवनात चांगल्या सवयी जोपासणे बांबूच्या झाडाची वाढ होण्याप्रमाणेच आहे.यात एक मजबूत पाया तयार करण्यासाठी भरपूर वेळ अणि मेहनत घ्यावी लागते.
पण एकदा हा मजबूत पाया तयार झाल्यानंतर आपल्याला मोठमोठे रिझल्ट प्राप्त होण्यास सुरुवात होते.मग यानंतर जाॅनने देखील आपल्या दैनंदिन जीवनात छोटछोटया गोष्टी करण्यास सुरुवात केली.
मग जाॅनने दर महिन्याला एक पुस्तक वाचण्याचे अणि रोज कमीत कमी २० मिनिटे वर्क आऊट करण्याचे स्वतासोबत एक कमिटमेंट केली.
सुरूवातीला जाॅनला ही नवीन सवय जोपासणे अवघड गेले पण त्याने आपले प्रयत्न करणे निरंतर चालू ठेवले.अणि काही आठवडयातच जाॅनला रिझल्ट देखील मिळण्यास सुरुवात झाली.
आता त्याच्यामध्ये आधीपेक्षा जास्त उर्जा निर्माण झाली होती तो रात्री चांगली झोप देखील घेत होता.अणि त्याला तो आधीपेक्षा अधिक परिपूर्ण झाला असल्याचे जाणवू लागले होते.
मग त्याला ह्या गोष्टीची देखील जाणीव झाली की तो आपल्या नवीन सवयींची मज्जा लुटत आहे.त्यातुन भरपूर आनंद प्राप्त करत आहे.
मग वेळेनुसार जाॅनने त्याच्या रुटीनमध्ये अजुन चांगल्या सवयी समाविष्ट करण्यास सुरुवात केली.त्याने वेळेवर जेवण करणे,मेडिटेशन करणे अणि आपल्या जवळच्या लोकांसोबत आपला अधिकतम वेळ व्यतीत करण्यास सुरुवात केली.
एवढेच नव्हे तर त्याने आपल्या टार्गेट देखील निर्धारित वेळेत अधिक जलदगतीने साध्य करण्यास सुरुवात केली.
ह्या गोष्टीतुन आपल्याला ही एक गोष्ट शिकायला मिळते की कसे आपण आपल्या जीवनात स्वताला छोटछोटया सवयी लावून स्वतामध्ये एक मोठा क्रांतीकारी बदल घडवून आणू शकतो.
जेव्हा आपण आपल्या दैनंदिन जीवनात एखादी नवीन सवय जोपासण्याचा विचार करत असतो.किंवा एखादे नवीन परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतो.
मग ते सकाळी लवकर झोपेतून उठणे असो,पुस्तक वाचणे असो किंवा रोज सकाळी जिममध्ये जाऊन कसरत करणे असो.
थोडे दिवस आपण ते नवीन रूटीन मोठ्या उत्साहाने आनंदाने फाॅलो करतो पण काही दिवसांनंतर आपल्यातील प्रेरणा संपुष्टात येते अणि पुन्हा आपण आपल्या जुन्या रूटीन प्रमाणे जगायला लागतो.
कारण जेव्हा आपण एखादा प्रेरणादायी व्हिडिओ बघतो किंवा पुस्तक वाचतो तेव्हा आपल्याला जी प्रेरणा प्राप्त होते ती तात्पुरत्या स्वरूपाची असते.जी काही काळानंतर आपोआप संपुष्टात येते.
यावरून आपणास लक्षात येईल की आपल्या आयुष्यात काही कायमस्वरूपी बदल परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपल्याला फक्त प्रेरणेची गरज नसते.
त्याकरिता आपल्याला आपल्या जीवनात काही असे छोटे छोटे छंद जोपासावे लागतात ज्याने भविष्यात आपल्या जीवनात मोठे परिवर्तन घडून येईल.
यासाठी आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात काही अशा छोटछोटया सवयी जोपासाव्या लागतील,अशी छोटछोटी कामे करावी लागतील जी करण्यासाठी आपल्याला फक्त १ मिनिट किंवा त्यापेक्षा कमी कालावधी लागतो.
जेवढ्या कमी वेळात आपण ही हाती घेतलेली छोटछोटी कामे पुर्ण करत जाऊ तसेच जेवढा कमी प्रयत्न आपल्याला ही छोटछोटे काम पुर्ण करण्यासाठी लागेल.
तेवढ्या अधिक लवकर आपल्या दैनंदिन जीवनात ही छोटछोटी कामे रोज करण्याची आपल्याला सवय जडत जाईल.
पण जे छोटछोटे कामे आपण करण्यासाठी हातात घेऊ ती सर्व कामे करण्याची रुची आपल्याला असायला हवी.तसेच ती कामे करण्याची क्षमता,पात्रता देखील आपल्यात असायला हवी.अणि ही गोष्ट आपल्याला सर्वप्रथम ट्रिगर करावी लागेल.
समजा आपल्याला रोज सकाळी एक्सरसाईज करायची आहे.अशावेळी हे देखील महत्वाचे आहे की आपल्याला एक्सरसाईज करायला आवडते का?
आपण रोज सकाळी उठून १० ते १५ पुश अपस मारू शकत नसाल तर रोज किमान दोन पुश अपस आपण मारू शकतो का? अणि ह्या दोन पुश अपस मारण्याचे काम आपण रोज एक मिनिटात करू शकतो का?
जेव्हा आपल्याला याचे उत्तर हो मिळेल तेव्हा आपण आपल्या एखाद्या जुन्या सवयी सोबत हे छोटेसे काम करण्याची नवीन सवय देखील स्वताला लावून घ्यायची आहे.
म्हणजे समजा रोज सकाळी नेहमीच्या सवयीनुसार आपण दात घासत असाल तर दात घासुन झाल्यावर रोज दोन पुश अपस मारायची सवय आपण स्वताला लावून घ्यायला हवी.
म्हणजे रोज सकाळी झोपेतून उठल्यावर दात घासुन झाल्यावर लगेच आपल्याला नेहमीच्या सवयीनुसार दोन पुश अपस मारण्याची आठवण येईल.
अणि जुन्या सवयी सोबत जे नवीन छोटेसे काम रोज करण्याची सवय लावून घेऊ इच्छित आहे प्रत्येक दिवशी ते छोटे काम पुर्ण केल्यानंतर आपण प्राप्त केलेल्या ह्या छोट्याशा यशासाठी देखील स्वताला शाबासकी द्यायला हवी.
असे केल्याने हळूहळू आपल्या मेंदुला देखील ते काम रोज करण्याची सवय लागुन जाईल.
अशा पद्धतीने आपल्या ह्या दैनंदिन जीवनातील रोजच्या छोटछोटया सवयीचे कालांतराने आपल्या रोजच्या सवयीमध्ये कधी रूपांतर होऊन जाईल हे आपल्याला देखील कळणार नाही.