विवेक बिंद्रा यशोगाथा Vivek bindra success story in Marathi
विवेक बिंद्रा यशोगाथा Vivek bindra success story in Marathi
यश हे नेहमी अशाच व्यक्तींना प्राप्त होते ज्यांच्या स्वप्नांमध्ये जीव असतो.ज्यांची आपल्या ध्येयावर अतुट निष्ठा असते.
हीच गोष्ट सिद्ध करून दाखवली आहे की जगप्रसिद्ध प्रेरक वक्ता,व्यवसाय प्रशिक्षक,व्यवसाय मार्गदर्शक,युटयुबर अणि नेतृत्व सल्लागार म्हणून ओळखले जाणारे विवेक बिंद्रा यांनी.
विवेक बिंद्रा यांच्या डोक्यावरील वडिलांचा हात ते लहान असतानाच हिरावला होता.
पण एवढे मोठे दुख अंगावर कोसळल्यानंतर देखील विवेक बिंद्रा यांनी स्वताला सक्षम अणि पात्र बनविले.ज्यामुळे आज ते लाखो लोकांना आपल्या भाषण तसेच व्यवसाय प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रेरणा देण्याचे काम करीत आहेत.
आजच्या लेखामध्ये आपण प्रेरणादायी वक्ता, व्यवसाय प्रशिक्षक अणि नेतृत्व सल्लागार डॉ विवेक बिंद्रा यांच्या जीवनातील संघर्ष अणि यशोगाथा जाणुन घेणार आहोत.
आज आपण हे देखील जाणुन घेणार आहोत की एका संन्यासीने पुर्ण जगभरातील लाखो लोकांना कशा पद्धतीने यशाचा एक नवीन मार्ग दाखवला.
एक संन्यासी व्यक्ती जगातील सर्वात मोठा व्यवसाय प्रशिक्षक तसेच प्रेरक वक्ता कसा बनला?
विवेक बिंद्रा यांचा जन्म उत्तर प्रदेश मधील लखनौ शहरात ५ एप्रिल १९८२ रोजी झाला होता.विवेक बिंद्रा यांना लहानपणापासूनच खेळामध्ये आवड होती.
लहानपणी बाॅक्सिंग तसेच फुटबॉल इत्यादी खेळात त्यांनी चांगली कामगिरी केली.एवढेच नव्हे तर कित्येकदा त्यांना राष्ट्रीय पातळीवर देखील खेळण्याची संधी मिळाली.
लहानपणी खेळातुन त्यांना अनेक मेडल देखील प्राप्त झाले होते.विवेक बिंद्रा फक्त अडीच वर्षांचे होते तेव्हाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले.
मग यानंतर विवेक बिंद्रा यांच्या आईने दुसरे लग्न केले.अशा प्रकारे खुप अल्पवयातच विवेक बिंद्रा यांच्या डोक्यावरील पित्याचे छत्र हरपले होते.
आईने दुसरे लग्न केल्यानंतर विवेक बिंद्रा यांनी आपल्या आई अणि सावत्र वडिलांसोबत न राहता आजोबांच्या सोबत राहण्यास सुरुवात केली.
थोडे दिवस आजी आजोबा,थोडे दिवस काका काकुंसमवेत असे लहानपणापासून विवेक बिंद्रा आपल्या नातवंडांसोबत राहत होते.
लहानपणी जेव्हा आपल्या आजुबाजुच्या घरातील मुलांसोबत ते खेळायला जात तेव्हा त्या मुलांचे आईवडील आमचा मुलगा तुझ्यासोबत राहीला तर त्याचे वळण बिघडेल असे म्हणुन त्यांना हाकलुन लावत होते.
ज्या छोट्या वयात विवेक बिंद्रा यांना आईवडिलांच्या आधाराची प्रेमाची आवश्यकता होती.त्यावयात त्यांना लोकांच्या भयंकर टिकेला अपमानास्पद वागणूकीला सामोरे जावे लागले होते.
एवढ्या सर्व गोष्टींना सामोरे जात विवेक बिंद्रा यांनी आपले शिक्षण सुरू ठेवले.
विवेक बिंद्रा लहानपणापासूनच अभ्यासात चांगले होते त्यामुळे त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिल्ली मधील नोएडा येथे असलेल्या एम आयटी बिझनेस काॅलेज मधुन एमबीएचे शिक्षण पुर्ण करत पदवी प्राप्त केली.
विवेक बिंद्रा यांनी त्यांच्या अनेक मुलाखतीत सांगितले आहे की त्यांना लहानपणापासूनच खेळामध्ये देखील भरपूर रूची होती.
आज विवेक बिंद्रा यांनी त्यांच्या जीवनातील संघर्षाचा अधिकतम वेळ स्वताला खेळात व्यस्त ठेवुनच पार पाडला होता.
विवेक बिंद्रा हे त्यांच्या अनेक सेमिनार तसेच मोटीव्हेशनल व्हिडिओ मध्ये बाऊन्स बॅक हा एकच शब्द वारंवार बोलताना आपणास दिसुन येतात.हा शब्द देखील त्यांनी खेळातुन प्रेरणा प्राप्त करत घेतला आहे.
विवेक बिंद्रा यांची परिस्थिती इतकी गरीबीची होती एकवेळ त्यांच्याजवळ आपल्या काॅलेजची फी भरण्याइतके पैसे देखील नव्हते.
म्हणून त्यांनी आपल्या शिक्षणाचा खर्च स्वताला उचलता यावा म्हणून ट्रॅफिक सिग्नलवर रस्त्याच्या बाजूला उभे राहुन रस्त्याने ये-जा करत असलेल्या वाहन चालकांना डिक्शनरी विकण्याचे काम केले.
अणि मग तेच जमवलेले पैसे आपल्या शिक्षणासाठी खर्च करत होते.
फक्त १६ वर्षाचे असताना लहानमुलांना टयुशन देण्यास सुरुवात केली होती.पण विवेक बिंद्रा यांना पुर्णवेळ टयूशन मध्ये करिअर करायचे नव्हते.
विवेक बिंद्रा यांच्यावर वडिलांच्या निधनानंतर एकवेळ अशी देखील आली होती.विवेक बिंद्रा यांच्या आईने दुसरे लग्न केल्यानंतर त्यांच्याजवळ कुठलीही जवळची व्यक्ती त्यांना समजुन घेण्यासाठी तसेच आधार देण्यासाठी नव्हती.
यामुळे चार पाच वर्षे विवेक बिंद्रा यांनी संन्यासी बनुन वृंदावनात वास्तव्य केले.वृंदावनात त्यांनी संन्यासी व्यक्ती प्रमाणे लोकांची सेवा केली.
वृंदावनात वास्तव्यास असताना विवेक बिंद्रा संन्यासी व्यक्ती प्रमाणे धोतर आणि कुर्ता हा पोशाख परिधान करत होते.अणि रात्री जमिनीवर अंथरूण टाकत झोपत होते.
तेव्हा विवेक बिंद्रा यांचें मानसिक आरोग्य चांगले नव्हते ते अनेक मानसिक आरोग्य विषयक समस्यांना तोंड देत होते.
त्याचदरम्यान विवेक बिंद्रा यांच्या वृंदावनातील एका गुरूने विवेक बिंद्रा यांच्या मनाला शांती प्राप्त व्हावी यासाठी त्यांना भगवतगीता वाचण्याचा सल्ला दिला.
आजपर्यंत विवेक बिंद्रा यांनी त्यांच्या युटयुब चॅनलवर अनेक व्हिडिओ द्वारे गीतेचे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचविले आहे.
विवेक बिंद्रा यांचे म्हणणे आहे की भगवतगीता हे कुठलेही धार्मिक पुस्तक नाहीये आपण जीवन कसे जगायला हवे हे शिकण्याचे माध्यम आहे.
आज विवेक बिंद्रा यांनी त्यांच्या जीवनात जे यश प्राप्त केले आहे ते भगवतगीतेतुन प्राप्त केलेल्या ज्ञानाच्या बळावरच प्राप्त केले आहे असे विवेक बिंद्रा स्वता सांगतात.
पुढे विवेक बिंद्रा यांनी आपल्या गुरूंसमवेत शाळा काॅलेजात जाऊन तेथील विद्यार्थ्यांना भगवतगीतेचे ज्ञान देण्यास सुरुवात केली.
एवढेच नव्हे तर काॅर्पोरेट मध्ये जाऊन विवेक बिंद्रा व्यवसायाचे शिक्षण आध्यात्माशी जोडुन लोकांना शिकवू लागले.
हे बघुन विवेक बिंद्रा यांच्या गुरूने विचार केला हा मुलगा आध्यात्मिक जीवनात लोकांना एवढे शिकवत आहे एवढे ज्ञान देत आहे.
याचठिकाणी हा मुलगा आध्यात्मिक जीवन सोडुन सांसारिक जीवनात गेला अणि आध्यात्मिक जीवन अणि सांसारिक जीवन दोघांना एकत्रित करून लोकांना शिकवेल तर आयुष्यात हा खुप मोठे कार्य करू शकतो.
विवेक बिंद्रा हे वृंदावनात वास्तव्यास असताना त्यांच्या गुरूंनी त्यांना व्यावसायिक बनण्यास सांगितले.त्यांनी विवेक बिंद्रा यांच्या हातात भगवतगीता दिली.
अणि सांगितले ह्या भगवतगीतेतुन लोकांना व्यवसायाचे धडे देण्याचे काम तु अधिक उत्तमरीत्या करू शकतो.
कारण त्यांच्या गुरूचे असे मत होते की विवेक बिंद्रा यांना उत्तम शिकवता येते.याचसोबत त्यांना व्यवसायाचे उत्तम ज्ञान आहे.त्यांचे एमबीए देखील झाले आहे.
सांसारिक जीवनात गेल्यास विवेक बिंद्रा यांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्यवसायाचे ज्ञान पोहोचवता येईल.अणि तिथे त्यांची वृंदावनापेक्षा अधिक प्रगती होईल.
त्यामुळे विवेक बिंद्रा यांनी ठरवले की ज्या व्यक्तींना पैशाच्या अभावामुळे जीवनात एक यशस्वी उद्योजक बनता येत नाहीये.अशा व्यावसायिक बनु इच्छित असलेल्या व्यक्तींना प्रेरणा देण्याचे,व्यवसाय प्रशिक्षण देण्याचे काम ते आपल्या गुरूच्या आज्ञेनुसार करतील.
पण जेव्हा विवेक बिंद्रा यांनी यशस्वी उद्योजक होऊ इच्छित असलेल्या व्यक्तींना व्यवसाय प्रशिक्षण देण्यासाठी ग्लोबल ॲक्ट नावाची एक कंपनी सुरु केली.
जेव्हा त्यांनी ह्या कंपनीची सुरूवात केली तेव्हा त्यांच्याकडे स्वताचे एक छोटेसे आॅफिस सुरू करता येईल एवढे पुरेसे पैसे देखील नव्हते.कसेबसे त्यांनी पैशांची जमवाजमव करत एक खोली भाड्याने घेतली.
विवेक बिंद्रा यांच्याकडे कामासाठी कर्मचारी लावता येतील एवढे पैसे नव्हते म्हणून सुरूवातीला ऑफिसमधील सर्व कामे विवेक बिंद्रा यांनी एकट्याने केली.
जसजसे विवेक बिंद्रा यांच्या व्यवसायाने प्रगती केली तसतसे त्यांनी अनेक बेरोजगारांना आपल्या कार्यालयात रोजगार तसेच नोकरी देखील उपलब्ध करून दिली.
आज आपल्या जीवनात एवढ्या अधिक अडीअडचणींना,समस्यांना तोंड देत विवेक बिंद्रा यांनी बाजारात असे एक उच्च स्थान प्राप्त केले आहे.
ज्यामुळे लाखो उद्योजक,जगभरातील कित्येक स्टार्ट अप कंपन्या विवेक बिंद्रा यांना आपला आदर्श मानतात.
आज विवेक बिंद्रा यांच्या युटयुब चॅनलला करोडो लोकांनी सबस्क्राईब देखील केले आहे.कारण त्यांच्या युटयुब चॅनलच्या माध्यमातून लोकांना घरबसल्या व्यवसायाशी संबंधित अनेक महत्त्वपुर्ण गोष्टी शिकायला मिळतात.
आजवर विवेक बिंद्रा यांनी १५०० पेक्षा अधिक कंपन्यांना व्यवसाय प्रशिक्षण दिले आहे.
एवढेच नव्हे आज त्यांनी भारतात बडा बिझनेस डाॅट काॅम नावाची स्वताची एक मोठी कंपनी देखील स्थापित केली आहे.