बातम्यासमाजकारण

उस्मानाबाद नामांतरात अडकलेला आमचा जिल्हा..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आमच्या जिल्ह्याला दोन नावे आहेत .एक लोकांच्या मनातील नाव आणि दूसरे १९०४ पासून निजामाच्या काळातील नाव आणि तेच नाव आपल्या सरकारने अधिकृत म्हणून वापरले ते   म्हणजे उस्मानाबाद. काही जण धाराशिव म्हणतात तर काही जण उस्मानाबाद .पण आज मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दयायच्या अगोदर उस्मानाबाद चे नामांतर केले धाराशिव .पण लढाई अजून संपली नाहीतोपर्यत तर लगेच सर्वजण जल्लोष करायला लागले.आता हा प्रस्ताव केंद्राकडे मंजूरी साठी जाणार तेव्हाच अधिकृत सर्व गोष्टी मध्ये बदल होतील जर त्यांनी या नावाला मान्यता दिली तर.राज्यसरकारचे काम संपले आता केंद्रसरकारची जबाबदारी असेल..असो

नाव बदलत आहे त्या बदद्ल खरच सरकारचे अभिनंदन .पण आमच्या शहराचा इतके वर्ष विकास का केला नाही .रोजगारांसाठी आम्हाला दुसऱ्या जिल्ह्यात जावे लागते.आमचे आई वडील उस्मानाबाद मध्ये ,आमचा सर्व परिवार धाराशिव मध्येच,आमची शेती येथेच ,का म्हणून आम्ही दुसऱ्या जिल्ह्यात कामासाठी जायचे.आमच्या याच जिल्ह्यात आम्हाला रोजगार का नाही भेटत..का तूम्ही इतके वर्ष विकास केला नाही. धाराशिव मध्ये मोठे मोठे उद्योग का नाही आणले तुम्ही ..,बोटावर मोजता येतात तेवढे कारखाने सोडले तर बाकी कारखाने आपल्या जिल्ह्यात का नाहीत. शिक्षण संस्था  का नाहीत आपल्या शहरात ,आपल्या  जिल्ह्यात , शिक्षण घेण्यासाठी आम्हाला दुसऱ्या जिल्ह्यात जावे लागते ,का नाहीत आपल्या जिल्ह्यात टेक्निकल विदृयापीठ,का नाहीत भरपूर मेडिकल कॉलेज आपल्या जिल्हयात,पर्यटन स्थळे आहेत त्याचा विकास का केला नाही,आपल्या जिल्ह्यात का येत नाहीत बाहेरचे लोक पर्यटनासाठी ,का नाही आपल्या जिल्ह्यात स्वच्छता ,का आहेत आपल्या जिल्ह्याच्या गटारी उघडया ,का नाही गटारीला आउटलेट,का आहे नाली उघडी ,का आहे आपल्या शहरात एवढी घान,का भरतो बाजार घानीच्या साम्राज्यामध्ये , का नाही लोकांना सूविधा प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये ,का नाहीत रस्ते चांगले ,का आहे धुळीचे साम्राज्य् आपल्या शहरात,का नाही मुलांना खेळायला मैदान,एकच मैदान त्यामध्ये  पण प्रत्येक खेळ कसा खेळायचा सर्व खेळाडूंनी,का नाही प्रत्येक खेळाचा प्रशिक्षक ,का नाही शाळेमध्ये सर्व सुविधा ,का नाहीत आपले बसस्टॅन्ड् स्वच्छ् ,का नाही स्वच्छ् होत बसस्टॅन्ड् मधील परिसर, का नाहीत रस्त्याच्या कडेला झाडी,का नाहीत प्रत्येक वार्ड मध्ये बाग,पुस्तकालय,जिम..,का वाढली आहे टपरींची संख्या धाराशिव मध्ये,का भोगावती नदी अरुंद होत चालली आहे.का नदीचे पात्र टिकवले जात नाही. आपण दुसऱ्या देशात का नाहीत निर्यात करत वस्तू ,का आपल्याला दुसऱ्या देशातून आणाव्या लागतात वस्तू ,का आपला तरूण नवीन नवीन प्रयोग करत नाही, का नाही मार्केट आपले पण पूणे ,मुबई सारखे,का येत नाहीत आपल्या जिल्ह्यात कंपन्या व्यवहार करायला ,का नाही आपला जिल्हा आनंदी ,का होत नाहीत जास्त् प्रमाणात अधिकारी आपल्या जिल्ह्यातले ,का होत नाहीत कलेक्टर आपल्या जिल्ह्यातून जास्त्‌ प्रमाणात, नाटयग्रहामध्ये का होत नाहीत नाटके,का नाही आपल्या शहारात भव्य्‍ चित्रपट ग्रह ,का नाही आपल्या जिल्हयात कला विद्यापीठ,का होत नाहीत आपल्या कडे सगळयाप्रकारचे ऑपरेशन,का जावे लागते आपल्याला दुसऱ्या जिल्हयात ऑपरेशन करायला,का नाहीत हॉस्पीटलमध्ये सुविधा,का नाही आपल्या जिल्हयात स्वत:चे विदयापीठ ,का नाहीत हाताला काम,का तयार होत नाही आपल्याकडे वस्तू,का आपले उत्पन्न् कमी आहे,का नाही कोण चालू करत एखाद्या वस्तूचे उत्पादन….

नावामध्ये बदल होईल पण या सर्व सुविधा कधी मिळणार हा खरा प्रश्न् सगळयांना पडला पाहिजे.

लेखक – राम ढेकणे.

Marathi Udyojak

मराठी उद्योजक हा प्रत्येक मराठी उद्योजकासाठी एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. मराठी उद्योजकच्या माध्यमातून आम्ही व्यवसाय, शेअर मार्केट, स्टार्टअप इत्यादी विषयी उपयुक्त माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोहचवत असतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *