उद्योग मोटिवेशनउद्योजकताबातम्यासुविचारस्टार्टअप Storyस्वतःची डेव्हलोपमेंट

व्यवसाय करायचा असेल तर काम करावंच लागतं… घरबसल्या काहीच होऊ शकत नाही.

कित्येक कॉल येतात, व्यवसायाची माहिती घेतात, वेळ फुकट असल्यासारखं कितीतरी वेळ बोलत बसतात, कितीतरी प्रश्न विचारून माहिती घेतात, आणि शेवटी एक प्रश्न विचारतात… ग्राहक आम्ही शोधायचे कि तुम्ही देणार? अरे.. हा प्रश्न पडतोच कसा? ग्राहक तुम्ही नाही शोधायचे मग कोण शोधणार? जो ग्राहक देऊ शकतो तो ग्राहकांना प्रोडक्ट/सर्व्हिस सुद्धा देऊ शकतो ना? तुमची काय गरज आहे मग? दुसऱ्याने ग्राहक शोधून तुम्हाला का द्यायचे? आणि ग्राहकच शोधायचे नसतील तर व्यवसायात राहिलंच काय? नोकरी मागताना मालकाला ‘काम मी करायचे कि तुम्ही करणार’ असे म्हणता का? नाही ना? मग व्यवसायात ‘ग्राहक मी शोधायचे कि तुम्ही देणार’ असा प्रश्न कसा विचारू शकता? ग्राहकच तर मुख्य भाग आहे व्यवसायाचा, त्याच्यामुळेच तर पैसा मिळतो. तेच शोधायचे नसेल तर बाकीच्या हमाली कामाला व्यवसाय म्हणत नसतात… ग्राहक शोधावाच लागतो, तेच मुख्य काम असतं… ग्राहक शोधण्याचा कंटाळा असेल तर व्यवसायात तरी कशाला उतरायचं?

लोकांना प्रचंड पैसा कमवायचा आहे पण त्या प्रमाणात १% सुद्धा काम करण्याची तयारी नाहीये. काहीच त्रास नकोय, बसल्या बसल्या काही देऊ शकता का सांगा… बोलण्याचा आवेश असा असतो कि जणू व्यवसाय करून आपल्यावर आणि समाजावर उपकारच करत आहेत… तुम्ही व्यवसाय केला किंवा नाही केला कुणाला काय फरक पडतोय? आपल्यावाचून जगाचं काहीच अडलेलं नाहीये. जे काय करायचंय ते आपण आपल्यासाठी करतो आहोत, इतरांसाठी नाही. त्यामुळे काम करावाच लागतं, ते इतर कुणी करू शकत नाही.

काही दिवसांपूर्वी असाच एकाच कॉल आला होता, माझा एक मार्केटिंग विक्री विषयक लेख वाचून त्याने कॉल केला होता. बोलण्याची सुरुवातच रागीट शब्दोच्चारांनी झाली होती. म्हणे मी एका कंपनीत महिनाभरापासून आहे, सेल्स साठी काम करतोय, पण मला ग्राहकच मिळत नाहीयेत. म्हटलं, ते ठीक आहे पण माझ्यावर का चिडतोय? म्हणे तुम्ही मार्केटिंग बद्दल लिहिताय मग ग्राहक का मिळत नाहीयेत सांगा.. म्हटलं असं पाच मिनिटात नाही सांगता येत. मग म्हणे आत्तापर्यंत ३०-४० दुकानदारांना भेटलो, ५-७ दुकानदारांनी प्रोडक्ट घेतले. बाकीचे फक्त उद्या ये, परवा ये असे करतात… म्हटलं मग जा कि दोन दिवसांनी… म्हणे का जाऊ? किती संधी द्यायची त्यांना? एकदा काय ते सांगत का नाही? म्हटलं भाऊ, तू त्यांना संधी देत नाही, ते तुला संधी देत आहेत… तुला त्यांच्या कलेप्रमाणे वागावे लागेल, त्यांचं तुझ्यावाचून काहीच अडलेल नाहीये… तू त्यांच्याकडे जाऊन त्यांच्यावर उपकार करत नाहीये, ते तुझे प्रोडक्ट घेऊन तुझ्यावर उपकार करत आहेत.

असाच काही दिवसांपूर्वी एकाच कॉल आलेला होता, त्याला कन्सल्टेशन हवं होतं. बोलता बोलता असं लक्षात आलं कि त्या व्यक्तीला मार्केटमध्ये उतरण्याचा प्रचंड कंटाळा होता. त्याने दोन चार पोरांना कामावर ठेऊन यांच्याच भरवश्यावर व्यवसाय सोडून दिला होता. स्वतः ना काही लीड करत होता, ना आपल्या सेल्स टीम ला काही मार्गदर्शन करत होता, कारण त्यालाच विक्रीचा कसला अनुभव नव्हता… तो फक्त ऑफिस मध्ये बसून राहायचा आणि कामावर ठेवलेल्या मुलांना दररोजचे लेक्चर द्यायचा… आणि सगळी मुले सुद्धा शून्य अनुभवाची… त्याला काही सांगण्याचा प्रयत्न केला तर तो मार्केटिंग चा विषय सरळ बाजूला करून विषय बदलायचा.. पण त्याला व्यवसाय मात्र खूप यशस्वी करायचा होता. माझी हजारो रुपये फी द्यायला तयार होता, पण घेऊन काय फायदा? त्याला स्वतःला कामच करायचं नाहीये, मी मार्गदर्शन कुणाला करू? अशाने व्यवसाय कसा चालणार आहे?

आपण ‘काय करतोय’ आणि ‘का करतोय’ या प्रश्नांची उत्तरे आपल्याकडे असलीच पाहिजेत… काम तर करावंच लागतं, आणि मार्केटमध्ये उतरवत लागतं.. ग्राहक शोधावेच लागतात. ग्राहक शोधण्याचा, विक्रीचा, लोकांना कन्व्हिन्स करण्याचा कंटाळा असेल तर व्यवसायात उतरूच नका, त्यापेक्षा ते व्यवसायाला लागणारे पैसे FD करून ठेवा, किमान वाया तरी जाणार नाहीत…

Marathi Udyojak

मराठी उद्योजक हा प्रत्येक मराठी उद्योजकासाठी एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. मराठी उद्योजकच्या माध्यमातून आम्ही व्यवसाय, शेअर मार्केट, स्टार्टअप इत्यादी विषयी उपयुक्त माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोहचवत असतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *