उद्योग मोटिवेशनसमाजकारणस्वतःची डेव्हलोपमेंट

शिवाची गोष्ट (Rags to Riches)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पुण्याच्या झेड पुलावर उभा राहील की पुढे दिसत ते नऊ मजली शांताबाई पंचतारांकित हॉटेल,तशी एरवी शांत वाटणारी ही इमारत आज वेगळ्याच चैतन्याने बहरली होती.आज प्रत्येक व्यक्तीची लगबग चालू होती,नवीन पाहुण्याच आगमन चालू होत.स्वागतासाठी मराठमोळा वेश धारण केलेल्या मुली येणाऱ्या प्रत्येकाचं जिव्हाळ्याने स्वागत करत होत्या.शिवा या सगळ्या लगबगिकडे शांत पाहत होता.त्याच्या मनात एक वेगळच काहूर पेटल होत.आज हॉटेल च्या मेन हॉल मध्ये शांताबाईंच्या पुतळ्याच अनावरण होणार होत,हा पुतळा बनवण्यासाठी नेपाळ वरून खास कारागीर मागवले होते.त्या पुतळ्याच रूप पाहून शिवाला साक्षात समोर आईच पाहिल्याचा भास झाला.आपोआप तो पुतळ्या समोर गुढघ्यावर बसला.आज पहिल्यांदा शिवाच्या डोळ्यातून आसवे गळत होती.त्या असव्यात दिसत होता तो त्याचा त्याला भूतकाळ.साधारण दहा वर्षापूर्वीची गोष्ट असेल.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा गेल्या महिनाभर पेटलेला वणवा कालच्या आबासाहेबांच्या दणदणीत विजयाने शांत झाला होतो.आबासाहेबांच्या विजया साठी जिवाचं रान एक करणारा शिवा आज घरात शांत झोपला होता. शिवाच्या शेजारी खाटेवर त्याची विधवा आई रात्र भर खोकून खोकून बिचारी दमली होती. पहाट झाल्यावर बीचारीचा कुठे डोळा लागला होता. शिवाची आई शांताबाई खूप खमकी बाई,तिचा नवरा शिवा पाच वर्षाचा असताना गेला.उदरनिर्वाहाच हाती कोणतं साधन नाही,शेती नाही.पण बाई कधी खचली नाही. शांताबाईंच्या हाताला काही ओरच चव होती. संसाराचा गाडा सुरळीत चालवण्यासाठी तिने गावात वडापावची गाडी चालू केली.शांताबाईचा वडापाव पंचकृशित चागलाच नावाजलेला होता. गावात येणाऱ्या पाहुणे मंडळींच्या, जाताना शांताबाईंच्या वडापावची चव जिभेवर रेंगाळत जायची.

गेल्या सहा महिन्यांपासून शांताबाईला अचानक खोकला सुरू झाला.सुरुवातीला साधा खोकला असेल म्हणून तिने दुर्लक्ष केलं.पण दिवसेंदिवस खोकला वाढत गेला. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर टिबी ची लक्षण अडळली.आपल्या नंतर शिवाच कसं होणार याचीच जास्त काळजी शांताबाईला सतावत होती.आपल्या बापासारख आपल्या मालकाला सगळं धुऊन देण्याचा शिवाचा गुण शांताबाईला जास्त काळजीत टाकत होता.तू आता वडापावची गाडी सांभाळ म्हणून शांताबाई त्याच्या रोज मागे लागली होती.पण शिवा तिला दात देत नव्हता.

शिवा म्हणजे मागासवर्गीय वस्तीतली तरुणांचं नेतृत्व .आबासाहेबांचा विश्वासू सहकारी.आबासाहेबांच्या मतदार संघात मागासवर्गीय मतदार मोठ्या प्रमाणात होता. त्या सगळ्यांची जबाबदारी आबासाहेब शिवाच्या खांद्यावर देऊन मोकळे होयचे.आणि शिवा ती जबाबदारी पार पाडण्यासाठी जीवाची बाजी लावायचा.शिवाच्या गणपती मंडळाची विसर्जनाची आरती आबासाहेबांच्या हातातून झाल्या शिवाय गणपतीचं विसर्जन होत नव्हतं.आणि आबासाहेब पण शिवाच्या शब्दाला मान‌ द्यायचे.
अचानक शांताबाईंच्या खाटे वरचा तांब्या खाली पडला.त्या आवाजाने शिवाला जाग आली.पुढे आई खाटेवर जिवाच्या आकांताने धडपड करत होती. तिच्या छातीत तीव्र वेदना होत असताना, ती जिवाचा अखांत करून शिवाला हाक मारण्याचा प्रयत्न करत होती.पण तोंडातून आवाज बाहेर पडत नव्हतं.समारील चित्र पाहून शिवा थोडा भांबावला पण स्वतःला सावरुन आई जवळ गेला.शांताबाई शिवाला काही तरी सांगण्याचा प्रयत्न करत होती.शिवाने त्याचा कान शांताबाईंच्या तोंडाजवळ नेहला तेव्हां, तू बापाच्य वाटेवर जाणार नाही असा मला शब्द दे असे तुटक तुटक शब्द त्याच्या कानावर आले.

शांताबाईंच्या वेदना वाढत चालल्या होत्या.आई तू जास्त बोलू नकोस तुला त्रास होईल,मी जाऊन रिक्षा घेऊन येतो.तो पर्यंत जवळचे लोक ही जमा झाले होते.शिवा रिक्षा घेऊन आला.आणि शांताबाईला सरकारी रुग्णालयात भरती केले.जीवनात अनेक वादळांना तटस्त पणे तोंड देणारी वाघीण आज जीवनाच्या मावळतीकडे चालली होती. रुग्णालयात खाटेवर पडलेलं आईच क्षीण झालेलं शरीर पाहून शिवाच्या मनाला पहिल्यांदा पश्चातापाची भावना शिऊन गेली. गेल्याच महिन्यात आईचा खोकला वाढला होता,तेव्हा डॉक्टरांनी कर्नाटक राज्यात या आजारावर स्पेशल उपचार होतात, तिकडे घेऊन जायला सांगितले होते.पण आबासाहेबांच्या प्रचार धूमाळित व्यस्त असल्या मुळे ते शिवाला जमलं नाही,ही बाब त्याच मन खात होती.आईचे शब्द सावर,संसाराच बघ, सुधर हे त्याच्या पुढे घोंगावत होते. शिवा विचाराच्या घोल दरीत कोसळत चालला होता.त्याचा भूतकाळ त्याच्या समोर उभा राहून त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता.

गोष्टी २० वर्ष पूर्वीची आहे.शिवा त्या वेळी पाच वर्षाचा होता.भिमराव शिवाचे वडील पंचकृशितील नावाजलेले गाडी ड्रावर. आबासाहेबांच्या गाडीचे सार्थी. लांबच्या प्रवासाला आबासाहेब त्यांला आवर्जून घेऊन जायचे.शिवा,शांताबाई,भिमराव हे त्रिशंकू कुटुंब आनंदात राहत होत.एका रात्री आबासाहेब धावत पळत शिवाच्या घरी आले.ते खूप घाबरलेले होते आणि जास्त बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते.त्यांनी फक्त आपल्याला पोलिस स्टेशनला जायचे आहे एवढेच सांगितले.भिमराव नी शांताबाई कडे एक कटाक्ष टाकला. शांताबाईंच्या डोळ्यात भीती दाटून आली होती, पण आबासाहेबांच्या पुढे बोलण्याची भिस्त नव्हती.आबासाहेबांच्या पाठीमाघे जाणारी भीमरावांची पाठमोरी मूर्ती शिवा त्याच्या किलकिल्या डोळ्यांनी पाहत होता.त्याला हे बापाचं शेवटचं दर्शन.त्या नंतर बाप दिसला तो पांढऱ्या कपड्यात मेलेला मुडदा.आबासाहेबांच्या लहान भावाने दारू पिऊन एक विरोधी पक्षाचा माणूस गाडीने उडवला होता.तो जागेवरच मला. आबासाहेबांना तो अपघात म्हणून दाखवायचा होता.पण त्याच्या भावाकडे लायसन नव्हते आणि तो दारू पिला होता. त्यामुळे गाडी तो चालवत नव्हता, तर भिमराव चालवत होते .असे कोर्टात सांगायचे होते.त्यांनी भिमरावला या गोष्टीतून सहिसलामत सोडवतो आस आश्वासन दिलं होत.

मालका पुढे भिमरावला काही बोलता आल नाही.आबासाहेब आपल्याला सोडवतील असा विश्वास त्याला होता.पण आबासाहेबांच्या विरोधकांना माहित होत हा खून आहे म्हणून, आणि हा खून जाणूनबुजून केला आहे.त्यामुळे विरोधकांनी भीमरावची सुपारी तो जल मध्ये असतानाच दिली.जेल मध्ये भिमरावर जीवघेणं हल्ला झाला आणि त्यातच तो दगावला.आबासाहेब भिमरावला जिवंत घेऊन गेले मात्र माघारी त्याच मृत शरीर घेऊन आले. शांताबाईंवर या घटनेनं आभाळ कोसळलं.दोन राजाच्या भांडणात एक प्याद शहीद झाल होत. आबासाहेबांनी शांताबाईला शब्द दिला तुम्हाला उघड्यावर येऊ देणार नाही.मी शिवाला कामाला लावेल.पण शांताबाई स्वाभिमानी होती की कोणाच्या भरोषावरा थांबली नाही. तिने वडापावची गाडी चालू करून संसाराचा गाडा नेटाने पुढे नेहला.आता शिवा मोठा झाला होता.आबासाहेब ज्या सहकारी साखर कारखान्याचे संचालक होते तिथे काही जागा निघाल्या होत्या.आबासाहेब वडापावच्या गाडीवर आल्यावर शांताबाईंनी आबासाहेबांना दिलेल्या शब्दाची आठवण करून दिली. आणि शिवाला तिथे कामाला घेण्याची विनंती केली.

आबासाहेबानी काम झाले म्हणून सांगितले. शांताबाईंला आनंद झाला.पोराचं आता मार्गी लागेल अशी तिला आशा वाटली.कारखान्यावर ज्या संचालकांची पोर कामावर घेतली जाणार होती त्याची लिस्ट पाहिला शिवा कारखान्यावर गेला.पण त्याच नाव त्या लिस्ट मध्ये नव्हतं.त्याने चार पाच वेळा लिस्ट तपासली पण त्याचे नाव त्याला आढळले नाही.तो मनातून हताश झाला.घरी येऊन त्याने शांताबाईला सांगितले.तिने आबासाहेबांना भेटायला सांगितले.पण शिवा मनातून नाराज झाल्या मुळे भेटायला गेला नाही.रात्री आबासाहेबांची गाडी शिवाच्या दरात उभी राहिली.शिवा बाहेर गेला आणि आबासाहेबांना घरात घेऊन आला.आबासाहेब शिवाच्या खांद्यावर हात टाकून समजुतीच्या सुरात बोलले.शिवा तुज नाव फिक्स होत. पण आमच्या मालकीणबाई रुसल्या. चुलत भावाला कामाला घ्या, म्हणून रुसवा धरला.ते आमच गृहमंत्रालय त्यामुळे नाईलाज झाला.तुझ नाव कट करावं लागलं.पण तुला पुढे नक्की कुठे तरी सामावून घेऊ.शिवाचा राग कधीच निवळला होता.

आबासाहेब आपल्या घरी आले त्यामुळे त्याचा उर भरून आला होता.त्यानेही मी रागावलो नाही, मी तुमच्याशी एकनिष्ठ राहीन म्हणून शब्द दिला. काळ वाऱ्याच्या वेगाने पुढे चालला होता.गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका आल्या होत्या.गावात सरपंच पद मागासवर्गीय महीले साठी राखीव होत.आबासाहेबांच्या मनात शांताबाईच नाव होत.शिवाच्या मागे मागासवर्गीय समाज आहे त्यामुळे आपल्याला फायदा होईल.आबासाहेबांनी शांताबाईच नाव फिक्स केलं.शिवा नव्या उम्मिद आणि जोशाने कमाल लागला.सगळी कागद पत्राची त्याने जुळवा जुळव केली.उद्या फॉर्म भरायला जायचं आहे.म्हणून त्याने सगळी तयारी केली.आईला त्याने उदया सकाळी तयार राहील सांगितले.शिवा वस्तीतील लोकांच्या गाठीभेटी घेण्यात वेस्त होता.तेव्हा एक कार्यकर्ता तुला आबासाहेबांनी वाड्यावर बोलावलं आहे म्हणून निरोप घेऊन आला. काही तरी महत्वाचं काम असेल म्हणून शिवा लगोलग निघाला.वाड्यावर वातावरणात चांगलाच तणाव जाणवत होता.कोणच कोणाशी बोलत नव्हतं.त्यामुळे नक्की काय झालं आहे हेच कळत नव्हतं.आबासाहेबांनी शिवाला एका खोलीत बोलावलं.आबासाहेबांचा स्वर शांत पण गंभीर होता.त्यांनी एक हात शिवाच्या खांद्यावर टाकला आणि बोलायला सुरुवात केली,शिवा कार्यकर्त्याचा विचार, आणि पक्षाची वाढ, तसेच गावाचा विकास. लक्षात घेऊन काही निर्णय घेण्यात आले आहेत.शांताबाईची उमेदवारी मागे घेऊन आपण कमलाताईच्या सुनेला देण्यात आली आहे. पक्षाने तरुण स्त्री चा चेहरा द्यायच ठरवल आहे. त्या तुझ्याच वार्ड मध्ये राहतात.

शिवाला नक्की काय झालं आहे ते कळत नव्हतं.तो बोलला, पण आबासाहेब आपल्याला कोणाचा विरोध आहे.शिवा हे राजकारण आहे. काही विरोध हे गुप्त असतात. एवढ्या वेळेस माझ म्हणनं मान्य कर.आपण परत तुझा विचार करू,आता परिस्थिती नाजूक आहे आणि तुझ्या सारख्या कार्यकर्त्यांकडून मी त्यागाची अपेक्षा करतो.आज पक्षाला तुझ्या त्यागाची गरज आहे.आणि मला शब्द दे.मी जो उमेदवार देईल त्याच तू निष्ठेने काम करशील. आता शिवा कडे दुसरा पर्याय नव्हता.त्याने उमेदवारी माघारी घेतली.पण शिवाच्या आईला उमेदवारी न देण्याचं वेगळं कारण होत.कमलाबाई आणि आबासाहेबांच जुण प्रेम. त्यांची प्रेम कहाणी पंचकृशित दबक्या आवाजात गायली जायची. विजय हा कमलाबाई आणि आबासाहेब यांच्या अनैतिक संबंधातून जन्माला आलेला आबासाहेबांचा मुलगा. आज कमलाबाईने आबासाहेबांना त्यांच्या प्रेमाच्या निशानीची आठवण करून दिली आणि आपल्या सुनेला उमेदवारी द्या, असा आबासाहेबा कडे हट धरला.आबासाहेबांच जुनं प्रेम उतु आल आणि कमलाबाईच्या सुनेला उमेदवारी घोषित केली.शिवाने आबासाहेबांना दिलेली निष्ठेची शपत पाळली.

आपली सगळी ताकत कमलाबाईच्या सूने माघे उभी केली आणि निवडून आणली. पुढे आबासाहेबांच्या‌ जिल्हा परिषदेच्या निवडणुकात जिवाचं रान केलं.विचाराच्या आणि पश्चातापाच्या खोल दरीत शिवा कोसळत चालला होता.काल परवा पर्यंत निष्ठा हा शब्द त्याच्या साठी अभिमानाची गोष्ट होती आज ती त्याला गुन्हा वाटायला लागली. अचानक नर्सने मोठ्या आवाजात हक्क मारली आणि त्या आवाजाने शिवाच्या विचारांची तंद्री तुटली,सगळे डॉक्टर शांताबाईच्या कॉट शेजारी जमले होते. शांताबाईंच्या तोंडाचा ऑक्सिजन काढलं होता. शिवाला पुढे चालल्या गोष्टी पाहून बऱ्याच गोष्टीचा उलगडा झाला होता.डॉक्टरनी जवळ येऊन आम्ही खूप प्रेयत्न केलं पण त्याच फुफुस पूर्ण निकामी झालं होत त्यामुळे ते कोणताच प्रतिसाद देत नव्हतं.शिवा सध्या काहीच बोलण्याच्या मनसस्थितीत नव्हता .खूप रडण्याचा प्रयत्न करत होता, पण डोळ्यातलं पाणीच आठून गेलं होत.राहिल्या होत्या त्या फक्त कोरड्या भावना.शांततेत त्याने शंताबाईची सगळे कार्य आटपले.

नक्की वाचा : ई-कॉमर्स म्हणजे काय? ई-कॉमर्स चे प्रकार आणि ई-कॉमर्स ही नवी संधी

शिवा वरून जरी शांत वाटत असला तरी आतून त्याच्या असतित्वाच्या वादळाने रुद्र रूप धारण केलं होत. जगायचं तर कोणासाठी हाच एकमेव प्रश्न त्याला सतावत होता.त्याला घरातील आईची वडापावची भांडी,गाडा, कडई,झरा,त्याच्या असतित्वावा बद्दल प्रश्न विचारत होते.याच गोष्टी त्याच्या आता घरातील साथीदार होत्या. आईच शेवटचं वाक्य,तू बापाच्या वाटेवर जाऊ नको हे त्याच्या डोक्यात थायमन घालत होत.सगळ्यात महत्वाचं प्रश्न होता आता पुढे काय,आता एक नवीन सुरुवात करायची होती पण यज्ञ प्रश्न होता, ती कशी,शिवाने पहिला निर्णय घेतला तो गाव सोडण्याचा.आणि सोबत फक्त शांताबाईंच्या आठवणी घेऊन जाण्याचा.शिवाच्याही हाताला शांताबाई सारखी चव होती.कुणाला ही न सांगता त्यांनी गाव सोडलं,आणि जिल्हाचा रस्ता धरला.सोबत होते फक्त शांताबाईचा वडापाव गाडा आणि भांडी.तस कुठे काय करायचं ते ठरलं नव्हतं.पण वाट मिळेल तिकडे धावायचं एवढच त्याला माहित होत.झेड ब्रीज च्या समोर नगर पालिकेच्या जागेत नवा संसार चालू झाला शांताबाई वडापाव सेंटर. हा जो अविरत प्रवास चालू झाला तो आज येऊन थांबला शांती पंचतारांकित हॉटेल मध्ये.शिवाच्या चेहऱ्यावर आज एक वेगळच समाधान होत.तो शांताबाईंच्या पुतळ्या समोर नतमस्तक झालं आणि त्याच्या तोंडून उदगार निघाले आई मी दिलेला शब्द पाळला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *