Shetkari Yojana

“नमो शेतकरी योजना” संपूर्ण माहिती

महाराष्ट्र शासनाने नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना अंतर्गत वर्षाला ६००० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना वर्षाला एकूण १२००० रुपये अनुदान मिळेल.

जर का तुम्ही प्रधान मंत्री सम्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल तर आता नमो शेतकरी महा सम्मान निधी योजना महाराष्ट्र शासनाद्वारे सुरु करण्यात आली आहे यात योजनेत सुद्धा तुम्हाला वार्षिक एकूण ६००० रुपये अनुदान मिळतील.

प्रधान मंत्री सम्मान निधी योजना हि केंद्र शासनाच्या माध्यमातून चालवली जात आहे आता महाराष्ट्र शासनाद्वारे हि नमो शेतकरी योजना राबवण्यात येणार आहे . या योजने अंतर्गत सुद्धा वार्षिक ६००० रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. केंद्र शासनाद्वारे ६००० रुपये तसेच राज्य शासनाद्वारे ६००० एकूण १२००० रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहे.

योजनानमो शेतकरी महासम्मान निधी योजना
कोणासाठीमहाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी
By महाराष्ट्र शासन
लाभवर्षाला ६००० रुपये तीन हफ्त्या मध्ये

Namo Shetkari Yojana Status List बघण्यासाठी तुम्हाला दोन पर्याय दिले आहे १) मोबाइल नंबर २) 

रेजिस्ट्रेशन नंबर यातील कोणताही एक पर्याय निवडा उदाहरणासाठी आम्ही रेजिस्ट्रेशन नंबर हा पर्याय निवडला आहे. त्यानंतर Captcha कोड भरून Get Data बटन वर क्लिक करा.

शेवटी तुमच्या स्क्रीनवर शेतकऱ्याची सर्व माहिती आणि Fund Disbursed Details येईल यार तुम्हाला आता पर्यंत प्राप्त झालेल्या Installment ची माहिती मिळेल.

नमो शेतकरी योजना रेजिस्ट्रेशन

नमो शेतकरी योजने साठी तुम्हाला रेजिस्ट्रेशन करण्याची आवशक्यता नाही महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान सम्मान निधीचे अनुदान मिळत आहे त्या सर्व शेतकरऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल, जर का तुम्ही पी एम किसान सम्मान निधी योजने साठी अर्ज केला नाही तर लवकरात लवकर करून यो दोन्ही योजनांचा लाभ घ्या.

Namo Shetkari Yojana Installments

InstallmentDate
Name Shetkari Yojana 3rd Installmentजून/जुलै 2024
(अपेक्षित)
Name Shetkari Yojana 2nd Installment29 फेब्रुवारी 2024
Name Shetkari Yojana 1st Installment23 ऑक्टोबर 2023

खाली कमेंट करुण आम्हाला कळवा की तुम्हाला योजनेचा हफ्ता मिळाला आहे की नाही.

Marathi Udyojak

Marathi Udyojak ही मराठी भाषेतील आघाडीची व्यासपीठ आहे जी नवउद्योजक, स्टार्टअप्स आणि लघुउद्योग यांना व्यवसाय, अर्थशास्त्र, सरकारी योजना आणि डिजिटल साधनांबाबत मार्गदर्शन देते. आमचा उद्देश म्हणजे मराठी तरुणांना माहिती, साधने आणि प्रेरणा देऊन यशस्वी उद्योजक बनवणे.

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button