उद्योग मोटिवेशनउद्योजकताब्लॉगिंगस्टार्टअप Story

१०१ Business Ideas (१०१ व्यवसाय आयडिया)

business Ideas – तुम्हाला व्यवसाय करायचा आहे आणि कमी पैशामध्ये कल्पना सुचत नाहीय मग हि पोस्ट तुमच्यासाठी आहे, खाली अशा १०१ व्यवसायिक आयडिया दिल्या आहेत त्यातली कोणतीहि एक आयडिया निवडा त्याची संपूर्ण माहिती घ्या आणि तुमचा व्यवसाय चालू करा.

Table of Contents

ट्रेनिंग इंस्टीट्यूट ( Training Institute ) –

ट्रैनिंग इन्स्टिटयूट म्हणजेच प्रशिक्षण संस्थेत तुम्ही लोकांना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण देऊ शकता. ज्यात तुम्हाला चांगले KNOWLEDGE आहे त्या बद्दल प्रशिक्षण देऊ शकता. तुम्ही चांगले प्रशिक्षक कामला लावून तसेच तुम्ही लोकांना कमिशनच्या आधारावर ठेवून किंवा पगार देऊनहि हा व्यवसाय चालू करू शकता. आपल्यासाठी या कामासाठी जागा असणे खूप महत्वाचे आहे, जर स्वतःची जागा असेल तर ह्या व्यवसायामध्ये जास्त गुंतवणूकीची आवश्यकता नाही.

उदबत्ती आणि मेणबत्ती बनवणे ( Incense and candle making business ) –

जर तुम्हाला घरी बसल्या काही करायची इच्छा असेल तर तुम्ही घरी बसून अगरबत्ती, मेणबत्त्या यासारखी उत्पादने बनवू शकता, तुम्ही थोडे आवश्यक साहित्य खरेदी करून घरी बसून हा व्यवसाय सुरू करू शकता. या व्यवसायात तुम्हाला छोट्या गुंतवणूकीतून भरपूर नफा मिळतो.
तुम्हाला हा व्यवसाय पार्ट टाइम म्हणून देखील करता येईल.

पापड आणि लोणचे उत्पादन ( Manufacture of domestic products like papads and pickles )

असे बरेच लोक आहेत जे आजकाल घरी खूप चवदार पापड आणि लोणचे बनवतात. पापड आणि लोणचे हे आपल्या प्राचीन सभ्यतेचे मुख्य अंग आहेत. जर तुमच्याकडेही ती कला असेल तर तुम्ही तुमचे स्वतःचे पापड आणि लोणचे बनवून ते बाजारात विकून नफा कमवू शकता.
हा उत्तम असा लघु उद्योग असून तुम्हाला हा व्यवसाय पार्ट टाइम म्हणून देखील करता येईल.

ब्रेकफास्ट शॉप उघडा (Breakfast Shop business ) –

आजच्या या वेगवान जीवनात कुणालाही स्वतःची काळजी घ्यायला वेळ नाहीये, मोठ्या शहरांमध्ये घाईत ऑफिसला जाणारे लोक आंघोळ करून बाहेर जातात आणि बाहेर नाश्ता करतात. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी पुरेशी जागा असावी जिथे लोकांसाठी बसण्याची व्यवस्था असावी तसेच तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की तुमचा नाश्ता चवदार असावा मग तुमच्याकडे अधिक ग्राहक असतील.
या प्रकारचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला काही भांडी , टेबल व काही खुर्च्या लागतील . शहरात पार्सल घेऊन जाणारे लोक पण खूप असतात त्यामुळे जास्त जागा नसेल तरी हा व्यवसाय करता येऊ शकतो.

किराणा दुकान व्यवसाय (Grocery Shop Business ) –

लोकांना त्याच दुकानात जायला आवडते जिथे चांगल्या प्रतीचे सामान मिळते.
जेव्हाही आपण नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतो, सर्वप्रथम आपण लहान व्यवसायाच्या योजनेबद्दल विचार करतो आणि किराणा दुकान हा छोट्या व्यवसायाचा एक भाग आहे. घराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण किराणा दुकानात जातो, पण सर्वप्रथम आपण पाहतो की जर आपल्या जवळ एखादे दुकान असेल तर तिथे जाऊन सामान घ्यावे.
अशाप्रकारे, जर तुम्हाला देखील हा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या आजूबाजूला पाहावे लागेल की कोणी किती गुंतवणूक केली आहे. लोकांच्या गरज ओळखून तुम्ही हा व्यवसाय सुरु करू शकता.

मोठ्या किंवा नवीन कॉम्प्लेक्स च्या बाहेर, खेडेगावात पण हा व्यवसाय तुम्ही करू शकता.

स्टेशनरी दुकान व्यवसाय (Stationery Shop Business ) –

तुम्ही कोणत्याही शाळा, कॉलेज जवळ स्टेशनरी दुकान उघडू शकता. हा एक व्यवसाय आहे जो कधीही थांबणार नाही, तुम्ही वेगवेगळ्या वर्गांची पुस्तके, कॉपी, पेन, पेन्सिल, रबर आणि इतर अनेक गोष्टी ठेवू शकता, तसेच मुलांना खाण्यासाठी टॉफी आणि चॉकलेट ठेवू शकता.
लोकांच्या गरज ओळखून तुम्ही हा देखील व्यवसाय सुरु करू शकता.

फायनॅन्शियल प्लानिंग ( Financial Planning Business ) –

असे बरेच लोक आहेत ज्यांच्याकडे पैसे आहेत, पण ते पैसे कुठे गुंतवू शकतात आणि ते पैसे कसे वाढवू शकतात याची माहिती त्यांच्याकडे नाही. जर तुम्हाला आर्थिक व्यवस्थापन संबंधित थोडे ज्ञान असेल तर तुम्ही आर्थिक नियोजन सेवा देऊन चांगला व्यवसाय सुरू करू शकता. आपल्याला या व्यवसायात काहीही गुंतवण्याची गरज नाही.
तुम्ही स्वतः शेअर मार्केट बद्दल माहिती, किंवा Mutual Funds मध्ये गुंतवणूक कशी करावी, यांसारख्या विषयात ज्ञान ग्रहण करून लोकांना त्या बद्दल चांगले मार्गदर्शन करून चांगले पैसे कमवू शकता.

दागिने बनवणे ( Jewel Making business ) –

महिलांना स्वतःला खूप सुंदर असावे असं वाटत, दागिन्यांचा उपयोग करून त्या स्वतःचे सौन्दर्य वाढवत असतात.
आजच्या युगात मध्यम वर्गीय माणसाला सोन्याचे दागिने घालणे शक्य नाही, म्हणून कृत्रिम दागिन्यांचे युग आहे, ज्यामुळे लोकांना नवीन डिझाईन्स हवे आहेत. जर तुमच्याकडे काही आयडिया असतील ज्याद्वारे तुम्ही नवीन डिझाईनचे दागिने बनवू शकता, तर तुम्ही घरी बसल्या कमी गुंतवणुकीत दागिने बनवण्याचा व्यवसाय करू शकता.

डी जे सेवा ( DJ Service business ) –

लोकांची आवड लक्षात घेऊन गाणी वाजवणे किंवा त्यांच्या मागणी नुसार सेवा दिल्यास तुम्ही लवकरच या व्यवसायात प्रगती करू शकता.
लोक कोणत्याही फंक्शनच्या निमित्ताने डीजे बुक करतात, मग ती बर्थ डे पार्टी असो किंवा लग्नाची मेजवानी, जर तुम्ही लोकांना डीजेची सेवा देत असाल तर यातही चांगला नफा मिळू शकतो. डीजे साउंड सर्व्हिस बिझनेस सुरू करण्यासाठी, तुम्हाला डीजेचा संपूर्ण किट विकत घ्यावा लागेल, त्यानंतर तुम्ही 2 लोकांना तुमच्या जवळ ठेवून हा व्यवसाय सुरळीत चालवू शकता.

डिजिटल मार्केटिंग ( Digital Marketing Business ) –

डिजिटल मार्केटिंग ची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. पूर्वी, ऑफलाइन पद्धतींद्वारे व्यवसायाला प्रोत्साहन दिले जात होते जसे की पोस्टर्स किंवा बॅनर ला ठिकठिकाणी लावून, ज्यामुळे प्रमोशनमध्ये बरेच पैसे खर्च केले गेले.
हे पाहता आणि इंटरनेटवरील वाढते प्रेक्षक लक्षात घेऊन आता लोक ऑनलाइन जाहिरात करण्यास प्राधान्य देतात. ज्यासाठी डिजिटल मार्केटरची गरज आहे. तर तुम्ही देखील या संधीचा लाभ घेऊ शकता आणि डिजिटल मार्केटिंग एजन्सी सुरू करू शकता आणि भरपूर पैसे कमवू शकता.

ऑनलाइन मार्केटिंग ( Online Marketing ) –

आजकाल प्रत्येक जण सोशल मीडिया वापरत असतो. प्रत्येक व्यवसायासाठी मार्केटिंग करण्याची गरज असते. या मध्ये तुम्हाला लोकांना आवडेल किंवा समजूत बसेल अश्या पद्धतीने मार्केटिंग करावी लागेल. तुम्ही सोशल मीडिया ( इन्स्टाग्राम, फेसबुक पेज इत्यादी ) वर तुमच्या जाहिराती टाकू शकता. तुमच्या followers ला रोजच्या वापराच्या वस्तू, किराणा, कपडे किंवा इतर कोणत्याही वस्तू ज्या तुम्ही ऑनलाइन विकू शकता, जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्या गोष्टी पोहोचवून त्या वस्तूंची मार्केटिंग करून विकू शकतात.
या व्यवसायामध्ये तुम्हाला जास्त गुंतवणूक करण्याची गरज नसते. घरातील स्त्रिया सुद्धा पार्ट टाइम म्हणून हा व्यवसाय करू शकतात.

ब्लॉगिंग ( Make Money From Blogging ) –

या व्यवसायाकरिता तुम्हाला इंटरनेट चे ज्ञान असणे आवश्यक आहे. याशिवाय तुम्हाला चांगले लिहिता येणे गरजेचे आहे. ब्लॉगिंग तुम्हाला तुमच्या ब्लॉगसाठी डोमेन नेम विकत घ्यावे लागेल, त्यानंतर जर तुम्ही वर्डप्रेस वर वेबसाइट बनवत असाल तर होस्टिंग आवश्यक असेल. ब्लॉगिंग सुरू करण्यापूर्वी, कोणत्या क्षेत्रात तुम्हाला ज्ञान आहे, म्हणजे कोणत्या क्षेत्रात तुम्हाला लिहायला आवडेल तो विषय निवडा.
तुम्ही मोबाईल किंवा लॅपटॉप द्वारे ब्लॉगिंग करू शकता. या व्यवसायामध्ये तुम्हाला जास्त गुंतवणूक करण्याची गरज नसते. तुम्ही जर चांगले लिहण्यात निपुण असाल तर हा व्यवसाय खूप फायदेशीर ठरू शकतो.

यू-ट्यूब वरून पैसे कमवा ( Make money through YouTube) –

आजकाल प्रत्येक जणांकडे स्मार्टफोन उपलब्ध आहे आणि स्वतःच्या मनोरंजना साठी लोक YouTube वापरतात. YouTube वर व्हिडीओ पाहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
जर तुम्ही एका वर्षात ४००० तासांचा वॉच टाइम आणि १००० सबस्क्राइबर पूर्ण केलेत, तर तुमचे व्हिडिओ पैसे कमवण्यास पात्र होतात. जर तुमच्याकडे काही प्रतिभा असेल तर तुम्ही यूट्यूब वर व्हिडीओ द्वारे तुमच्यातील कला टाकू शकता. व्यवसायामध्ये तुम्हाला जास्त गुंतवणूक करण्याची गरज नसते. तुम्ही जर चांगले लोकांना आवडतील असे विडिओ बनवत असाल तर हा व्यवसाय खूप फायदेशीर ठरू शकतो.

फ्रीलांसर व्हा ( Become a Freelancer ) –

आजकाल अशा अनेक कंपन्या आहेत ज्या लोकांना ऑनलाईन काम करायला लावतात आणि लोक ऑनलाइन कामाच्या बदल्यात कंपनीकडून पैसे घेतात, अशा काही कंपन्या आहेत ज्याद्वारे तुम्ही घरूनही काम करू शकता. जर तुम्हाला वेबसाईट डिझायनिंग, आर्टिकल रायटिंग, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, फोटो आणि व्हिडीओ एडिटिंग, यूट्यूब thumbnail इत्यादी असे सगळे काम तिथे उपलब्ध असतात आणि जर त्या मध्ये कसे काम करावे हे तुम्हाला माहित असेल, तर तुम्ही एक Freelancer देखील बनू शकता.
येथे काम करण्याचा सर्वात मोठा फायदा असा होईल की तुम्ही हे काम तुम्हाला हवे तेव्हा करू शकता आणि दुसरे म्हणजे तुम्ही त्याची किंमत स्वतः ठरवू शकता. मी तुम्हाला काही कंपन्यांची नावे देत आहे जसे Fiverr.com , Freelancer.com ,Upwork.com ,Guru.com इ. आपण या वेबसाइट्सवर आपले खाते तयार करून स्वतःचा बिनभांडवली घरघुती व्यवसाय सुरू करू शकता.
हा यशस्वी असा पार्ट टाईम व्यवसाय सुद्धा आहे. अगदी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा व्यवसाय केव्हा पण करू शकतात.

रिक्रूटमेंट फ़र्म ( Recruitment Firm ) –

जर तुमच्या ओळखी किंवा कॉन्टॅक्ट जास्त असतील तर तुम्ही अनेक कंपन्यांना त्यांना असलेल्या गरजेनुसार employee पुरवू शकतात आणि कंपनी त्याबद्दल त्याच्या पगारातील काही हिस्सा तुम्हाला देतात. हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला तुमचे चांगले नेटवर्क बनवावे लागते.

रिअल इस्टेट ( Real Estate Consulting ) –

अनेक जण रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करत असतात. रिअल इस्टेट मध्ये जागेची किंमत सहसा कधीच कमी होत नाही. प्रॉपर्टी मध्ये गुंतवणूक करणे हा सर्वात फायदेशीर विचार आहे आणि जर एखाद्या व्यक्तीने आपली मालमत्ता एखाद्या रिअल इस्टेट फर्मच्या मदतीने खरेदी केली तर तो त्या फर्म ला मालमत्तेच्या कमिटीच्या १% किंवा २% देतो, जी खूप चांगली रक्कम असते.
सर्वात चांगली गोष्ट म्हणजे कोणतीही रिअल इस्टेट फर्म सुरू करण्यासाठी गुंतवणूकीची रक्कम खूप कमी आहे, किंवा अजिबात इन्व्हेस्टमेंट नाहीये. तुमच्या चांगल्या ओळखी असतील तरीही हा बिजनेस यशस्वी होऊ शकतो.

कपड़े धुवून प्रेस करून देणे (Washing & ironing business) –

आजच्या काळात प्रत्येकजण खूप व्यस्त आहे आणि कोणालाही त्याचे घरकाम करण्यासाठी पुरेसा वेळ नाही, लोक नोकरी साठी शहरात आलेले असतात.
असे लोक एकटे राहतात आणि त्यांना स्वतःचे काम जसे कपडे धुणे, जेवण बनवणे इ.करायला फार जड जाते, कारण जेव्हा एखादी व्यक्ती नोकरी केल्यानंतर येते तेव्हा तो खूप थकून जातो आणि त्याला घरातली किंवा स्वतःची छोटी कामे करायला खूप आळस येतो. किंवा कॉलेज धून आलेले विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी सुद्धा या कामांना कंटाळलेले असतात.
त्यामुळे बाहेरून आपल्या शहरात आलेल्या लोकांच्या किंवा विद्यार्थ्यांना approach करून तुम्ही त्यांच्या या समस्या तुम्ही त्यांचे कपडे धुवून आणि इस्त्री करून पुन्हा त्यांच्या घरी डिलिव्हर करू शकता.
तुम्ही तुमच्या पत्नीसोबत हा व्यवसाय देखील करू शकता. महिलांसाठी उत्तम घरघुती आणि बिनभांडवली व्यवसाय आहे.

इव्हेंट मॅनेजमेंट फर्म ( Event Management Firm ) –

तुम्हाला जर एखाद्या कार्यक्रमाचे चांगल्या प्रकारे नियोजन करता येत असेल तर हा व्यवसाय तुम्ही करू शकता. आजच्या काळात प्रत्येकजण खूप व्यस्त आहे आणि कोणालाही त्याच्या घराच्या प्रत्येक कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी पुरेसा वेळ नाही. आजकाल घराचा कोणताही कार्यक्रम लहान असो वा मोठा व्यक्ती दुसरे कोणीतरी त्याचे नियोजन करू इच्छितो.
तर इव्हेंट मॅनेजमेंट फर्म ही एक फर्म आहे जी आपला कार्यक्रम दुसऱ्या कोणासाठी आयोजित करते. आणि त्या बदल्यात ती काही पैसे घेते.

इलेक्ट्रॉनिक शॉप व्यवसाय ( Electronic Shop Business ) –

आज प्रत्येक घरात वीज आहे, लोक उन्हाळ्यात कूलर आणि पंखे खरेदी करतात आणि हिवाळ्यात हीटर. येत्या काही दिवसांमध्ये, लोक त्यांच्या घरात वायरिंग करत राहतात, अशा स्थितीत लोक कूलर, पंखे, बल्ब, वायर, बोर्ड, वायरिंगसाठी पाईप्स आणि बरीच उत्पादने खरेदी करत राहतात. लोकांच्या गरजा लक्षात घेता तुम्ही ला व्ययवसाय सुरु करू शकता.

गृह कँटीन व्यवसाय ( Home Canteen Business ) –

मुलांना उच्चशिक्षणासाठी स्वतःचे घर सोडून मोठ्या शहरात राहायला जावे लागते. तेथे त्यांना जेवणाची काहीतरी व्यवस्था करावी लागते. पण आजही मोठ्या शहरात असे चांगले अन्न पुरवले जात नाही, जर तुम्ही स्वतः बनवून, स्वच्छ व चवदार जेवणाचा व्यवसाय सुरु केला तर नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल. हा व्यवसाय तुम्ही घरबसल्या करू शकता. तुम्हाला हा व्यवसाय पार्ट टाइम म्हणून देखील करता येईल.

मसाला चहा व्यवसाय ( Masala Tea Business ) –

आपल्या देशात अनेक लोक चहाचा व्यवसाय करून चांगले पैसे कमावत आहेत कारण भारतात चहा पिणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त आहे. अनेक लोक तर चहा पिल्याशिवाय राहूच शकत नाहीत. चहा चे इतर प्रकार जसे कि (आद्रक चहा, लिंबू चहा, तुळशी चहा ) या सर्व बाबींचा विचार करून अत्यंत कमी गुंतवणूक करून तुम्ही चहाचा व्यवसाय सुरु करू शकता.

Namkeen Making Business ( चटपटीत पदार्थांचा व्यवसाय ) –

जर तुम्हाला मसालेदार चटपटीत पदार्थ आवडत असतील, आणि अनेक प्रकारचे स्नॅक्स खात असाल आणि त्या नमकीन पदार्थ कसे बनवतात किंवा कसे बनवल्यावर अधिक चांगले लागतील याची तुम्हाला चांगली समज असेल, तर हे क्षेत्र तुमच्यासाठी खूप छान आहे.
देशात अशा अनेक स्त्रिया आहेत, जे त्यांच्या स्वयंपाकाच्या कौशल्याच्या आधारावर उत्कृष्ट आणि चवदार विविध गोष्टी बनवत आहेत आणि या आधारावर प्रचंड पैसे कमवत आहेत. म्हणून जर तुमच्याकडे देखील असे काही कौशल्य असेल तर तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. आणि इतर स्त्रियांप्रमाणे तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता.
हा एक यशस्वी कमी गुंतवणुकीचा महिलांसाठी घरघुती उद्योग ठरू शकतो.

फळे आणि भाजीपाला यांचे सलाड व्यवसाय ( Fruit and vegetable salad business ) –

आजच्या या प्रदूषित वातावरणात सर्वांचा कल हा स्वतःच्या आरोग्याकडे वाढत चालला आहे. आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी तुम्ही लोकांना फळे किंवा भाजीपाला सलाड बनवून विकू शकता. लोकांची ही मागणी पाहता तुम्ही फळ आणि भाजीपाला सलाडचा व्यवसाय देखील सुरू करू शकता.
हा व्यवसाय स्वच्छतेने करा तसेच ताजे फळे आणि भाज्यांचे स्वादिष्ट कोशिंबीर बनवा.

मसाला व्यवसाय ( Masala Business) –

हा व्यवसाय एका छोट्या ठिकाणापासून सुरू केला जाऊ शकतो.हा व्यवसाय सुरु करण्यासाठी, वेगवेगळ्या क्षमता असलेल्या मशीन्स येतात, ज्यांची उत्पादन क्षमता देखील वेगळी आहे, तरीही तुम्ही ते 15 ते 20 हजार रुपयांमध्ये सुरू करू शकता. मसाल्याच्या उद्योगासाठी तुम्ही खरेदी करणार्या मशीनमध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचे खडा मसाले दळू शकता, जे पॅक करून बाजारात पुरवले जाऊ शकते. या मशीन द्वारे तुम्ही हळद, धणे, मिरची, जिरे,लवंग, वेलची इत्यादी व्यतिरिक्त अनेक प्रकारचे मसाले बारीक करू शकता. हा एक अत्यंत सोयीस्कर व्यवसाय ठरू शकतो

कोचिंग इंस्टीट्यूट ( Coaching institute) –

ऑनलाइन चा जमाना सध्या जोरात आहे, त्यामुळे तुम्ही घरी बसूनही ऑनलाइन कोचिंग क्लासेस चालवू शकता. ऑनलाईन म्हटलं कि गुंतवणुकीचा कुठे प्रश्नच येत नाही. तुम्ही ज्या विषयात सक्षम आहात, तुम्ही लोकांना तीच गोष्ट शिकवू शकता. इथून पुढे बहुधा हाच व्यवसाय चांगला जोर धरू शकतो.

मॅट्रिमोनी सर्विस ( Matrimony Service Business ) –

लग्नाची सेवा देण्यासाठी, तुम्हाला स्वतःला सक्रिय करणे आवश्यक आहे. जर तुम्ही सोशल मीडिया हँडलवर सक्रिय असाल, तर तुम्ही सोशल मीडिया हँडलवर ग्रुप आणि पेज तयार करून सहजपणे विवाह सेवा देऊ शकता. यामध्ये, तुम्ही मुलगा आणि मुलगी यांची सांगड घालवून त्यांचे लग्न करून कमिशन मिळवता, ज्याचा तुम्हाला काहीच खर्च होत नाही आणि लाखोंची कमाई होते.

दुधाचा व्यवसाय ( Milk Business ) –

आज प्रत्येक घरात दुधाची गरज आहे तसेच हॉटेल मध्ये सुद्धा, दुधापासून बनणारे पदार्थ आणि नेते पदार्थ बनवणारे व्यापारी या सगळ्यांना कमी किमतीत दूध कुठून मिळेल याची ओढ असते. नियमित भावापेक्षा थोडस स्वस्त व्यापाऱ्यांना दूध मिळाले तर नक्कीच ते तुमच्याकडूनच दूध विकत घेतील. यासाठी तुम्हाला गरज लागेल ती म्हणजे सुरवातीला २ म्हशी पाळायची. आणि त्यासाठी घराच्या मागे थोडी जागा असेल तरीही पुरेस आहे. या गोष्टीचा विचार करून तुम्ही हा दुधाचा व्यवसाय सुरु करू शकता.

ऑनलाइन किराणा दुकान ( Online Kirana Or Grocery Shop Business ) –

तुम्ही तुमच्या शहरपुरता किंवा एरिया पुरता सुद्धा हा ऑनलाईन किराणा व्यवसाय सुरु करू शकतात. यात तुम्हाला जागेची किंवा जास्त गुंतवणुकीची अजिबात आवश्यकता नाही. आजकालच्या घाई गरबडीच्या जीवनात लोकांकडे पुरेसा वेळ नसतो. जेव्हा ऑर्डर मिळेल तेव्हा ते सामान तुम्ही होलसेल खरेदी करून त्यांना डिलिव्हरी करू शकतात. इथून पुढे हा व्यवसाय चांगला जोर धरू शकतो.

विमा एजन्सी बिझनेस ( Insurance Agency Business ) –

आजकाल विमा ही लोकांची मोठी गरज बनली आहे, अशा स्थितीत अनेक मोठ्या विमा कंपन्या आहेत जसे कि LIC Insurance. या कम्पन्या एजंट्सची नेमणूक करून लोकांना त्यांचे काम पुढे नेण्यासाठी ठेवतात.
त्यामुळे तुम्ही सुद्धा एजंट बनून आणि तुमची स्वतःची विमा एजन्सी सुरू करू शकता, ज्यात तुम्हाला कोणताही खर्च करावा लागणार नाही, फक्त विमा लोकांना समजावून त्यांचा त्यात फायदा दाखवून नीट मार्केटिंग करून त्यांना विकल्यावर प्रत्येक विम्या मागे ठरलेले कमिशन विमा कंपनी तुम्हाला देईल.

फेस्टिवल गिफ्ट बिजनेस ( festival gift business ) –

आपल्याकडे सणांच्या वेळी भेटवस्तू तसेच सणांन मध्ये येणारी खरेदी केल्याशिवाय सण पूर्ण होत नाहीत.अशा स्थितीत तुम्ही सण-उत्सवांच्या भेटवस्तू व्यवसायाचा विचार करू शकता.संबंधित काही सण आणि भेटवस्तू निवडाव्या लागतील ज्या लोकांना एकमेकांना देणे आवडेल. जर भेटवस्तू निवडीची तुमची आयडीया खूपच अनोखी असेल, तर लोकांना तुमची ती कल्पना आवडते, अशा परिस्थितीत तुम्ही खूप लवकर प्रसिद्ध व्हाल आणि लवकरच तुम्ही छान कमाई करण्यास सुरुवात कराल. जिथे तुम्हाला खूप कमी गुंतवणूक करावी लागेल.

योगा क्लासेस ( Yoga Classes ) –

आजकाल च्या धावपळीच्या आयुष्यात लोकांना स्वतःसाठी वेळच नाहीये. यामुळे गुडघे, कंबर इ. चा त्रास प्रत्येकात दिसून येत आहे. जर तुम्हाला योगाबद्दल माहिती असेल तर तुम्ही लोकांना योगा करण्याचे प्रशिक्षण देऊ शकता.
हा व्यवसाय करण्यासाठी तुमचा पूर्ण दिवस लागत नाही. सकाळी २ तास व सायंकाळी २ तास याप्रमाणे तुम्ही हा व्यवसाय करू शकता.

महिलांसाठी जिम ( Gym For ladies ) –

महिलांच्या जिममध्ये गुंतवणूक पुरुषांच्या जिमपेक्षाही कमी लागते. आजकाल प्रत्येक दुसरी महिला वाढत्या जाडीमुळे त्रस्त आहे. हि गोष्ठ लक्षात घेऊन तुम्ही महिलांसाठी जिम सुरु करू शकता. हा एक छानसा पार्ट टाइम व्यवसाय आहे.

गेम स्टोअर बिझनेस ( Game Store Business ) –

सध्याच्या Smart Phones आणि कॉम्प्युटर च्या जगात तुम्ही पाहिले असेल की मुलांना गेमिंगची किती आवड आहे ते. पण या मुलांच्या आवडीमुळे पालक मात्र चिंतेत पडले आहेत, ते मुलांच्या आरोग्य आणि करिअर ला घेऊन.
तर अशा परिस्थितीत पालक त्यांना फोन आणि कॉम्प्युटरवर गेम खेळू देत नाहीत, किंवा त्यासाठी मुलांवर निर्बंध लावले जातात.
आता तुम्हाला याच मुलांसाठी गेमिंग स्टोअर खोलून व्यवसाय करू शकतात. यासाठी खूप काही जागा लागत नाही, १० ते १५ वेग वेगळे कॉम्प्युटर बसतील एवढी जागा तुम्हाला बघायची आहे. मग तुम्ही तुमच्या घरात किंवा तुमच्या घराजवळ शॉप घेऊन सुद्धा एक गेमिंग स्टोअर उघडू शकता जिथे मुले येऊन गेम खेळतील. त्या स्टोअरसाठी तुम्हाला काही गेमिंग उपकरणे आवश्यक आहेत जी भाड्याने सहज उपलब्ध होतात.

मोबाइल फूड कोर्ट ( Mobile Food Court Business ) –

आजच्या काळात कोणाकडे जास्त वेळ नाही. म्हणूनच लोक जेवण करण्यासाठी हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जाण्याऐवजी ते आहेत त्या जागी त्यांच्या अन्नाची मागणी करतात. तर आजच्या काळात या व्यवसायाची ही सर्वोत्तम कल्पना आहे. हा एक उत्तम फिरता व्यवसाय ठरू शकतो.
तुम्ही या फिरत्या व्यवसायासाठी एक गाडी घेऊ शकतात जिला मागे ट्रॉली सारखी जागा असेल, आणि त्यात तुमचा सेटअप बसवून लोकांना जागेवर जेवण उपलब्ध करून देऊ शकतात.

लग्नाचे नियोजन करण्याचा व्यवसाय ( Wedding Planner Business ) –

लग्न म्हंटले कि खूप नियोजनाची गरज असते, तुम्ही लोकांच्या गरजा लक्षात घेता लग्नाचे व्यवस्थापन करू शकता, तुम्ही केलेल्या व्यवस्थेसाठी तुम्हाला पैसे मिळतात. कारण आजच्या व्यस्त काळात प्रत्येक गोष्टीचे व्यवस्थापन करणे लोकांना शक्य होणे अवघड झाले आहे, ज्यामुळे लोक त्याला आउटसोर्स करतात. तर ही एक अतिशय चांगली व्यवसाय आयडिया आहे.
जेवढे पैसे तुम्ही यात गुंतवाल ते सगळे साहित्य तुमचे पुन्हा पुन्हा वापरात येत असतात म्हणून नंतर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी खरेदी करण्याची गरज नाही.

मॅन पॉवर रिसोर्सिंग बिझनेस ( Manpower resourcing business ) –

मॅन पॉवर रेसोर्सिन्ग चा थेट आणि सोपा अर्थ म्हणजे बेरोजगारांना रोजगार देणे. आजच्या काळात प्रत्येकाला नोकरी हवी आहे आणि जर तुम्ही त्यांना नोकरीच्या संधी आणल्या तर तुम्ही त्यांच्याकडून कमिशन घेऊ शकता.
यासाठी तुम्हाला एका मोठ्या कंपनीत नोकरीच्या ऑफर शोधाव्या लागतील आणि त्यांच्यासाठी पात्र लोकांना नोकरीच्या ऑफर द्याव्या लागतील. तुम्ही गुंतवणूक न करता या व्यवसायातून चांगले कमवू शकता.

इंटिरियर डिज़ाइनर व्यवसाय ( Interior Designer Business ) –

जर तुमच्यामध्येही इंटीरियर डेकोरेटरची प्रतिभा दडलेली असेल तर तुम्हीही खूप पैसे कमवू शकता. लोक त्यांची घरे सजवण्यासाठी इंटिरियर डिझायनर्सची नेमणूक करतात, जेणेकरून त्यांचे घर चांगले दिसावे आणि आकर्षक दिसावे. मोठ्या शहरांमध्ये, त्यांच्या घरांव्यतिरिक्त, लोक त्यांची कार्यालये आणि दुकाने देखील सजवतात, त्या बदल्यात ते तुम्हाला खूप पैसे देतात.
तुम्ही या बद्दलचे प्रशिक्षण घेऊन हा व्यवसाय प्रोफेशनल पद्धतीने सुद्धा करू शकतात. या व्यवसायात अजिबात इन्व्हेस्टमेंट करावी लागणार नाही.

ट्रेडिंग बिजनेस ( Trading Business ) –

अनेक लोक शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करून पैसे काढत आहेत, झरोधा, एक्सपर्ट ऑप्शन, एंजल इत्यादी अनेक वेबसाईट आहेत. यात तुम्हाला थोडे ज्ञान असले पाहिजे, तरच तुम्ही पैसे कमवू शकाल कारण हे एक जोखमीचे काम आहे, यात अनेकांचे पैसे बुडतात. परंतु एकदा हा व्यवसाय समजला तर कित्येक लोक आहेत जे रोडपती होते आता करोडपती झालेले आहेत
मित्रांनो, इथे मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल तर फक्त तुम्ही त्यात गुंतवणूक करावी आणि ते सुद्धा तुमच्या उत्पन्नाच्या 5 ते 10% कारण माहितीच्या अभावामुळे अनेकांचे पैसे बुडतात आणि ते काहीही कमावू शकत नाहीत परंतु जर तुम्हाला त्याबद्दल माहिती असेल तर तुम्ही त्यातून पैसे कमवू शकता.

पॉपकॉर्न व्यवसाय ( Popcorn Business ) –

गाव असो किंवा शहर, मुले, वडील, स्त्रिया पॉपकॉर्नचे नाव ऐकताच त्यांच्या तोंडात पाणी येते, तुम्ही हा व्यवसाय अगदी कमी भांडवलासह सुरू करू शकता. तुम्ही पॉपकॉर्नची छोटी पाकिटे बनवू शकता आणि किरकोळ किमतीत विकू शकता किंवा तुम्ही दुकान उघडू शकता. तुम्ही हा व्यवसाय सुमारे 20 हजार रुपयांनी सुरू करू शकता, ज्यामध्ये मशीन आणि काही कच्चा माल दोन्ही येऊन जातील.

रसवंती व्यवसाय ( Fruit Juice Business ) –

आजकाल सर्वांचा कल हा स्वतःच्या आरोग्याकडे वाढत चालला आहे. आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फळांचा रस हा अत्यंत उपयुक्त ठरत असतो तर हि गोष्ट लक्षात ठेवून कमी गुंतवणूक करून फळांच्या रसाचा व्यवसाय सुरु करू शकता.

झेरॉक्स शॉप ( Xerox shop Business ) –

या व्यवसायात तुम्हाला झेरॉक्स मशीनची आवश्यकता असेल. यामध्ये तुम्हाला तेवढीच गुंतवणूक करावी लागेल आणि लगेच तुम्हाला फायदा व्हायला सुरुवात होईल. हा कमी गुंतवणूक आणि जास्त नफा मिळणारा व्यवसाय आहे. आजकाल शाळेत, कॉलेज व कार्यालयीन कामामध्ये झेरॉक्स खूप उपयुक्त ठरते.

ब्यूटी आणि स्पा ( Beauty and Spa Business ) –

जर तुम्हाला सौंदर्याशी संबंधित चांगले ज्ञान असेल आणि तुमच्याकडे घरात किंवा आसपास कोणतीही जागा असेल तर कमी गुंतवणुकीत तुमचे स्वतःचे सौंदर्य आणि स्पा व्यवसाय सुरू करू शकता.

ड्रायव्हिंग स्कूल ( Driving School Business ) –

आज बहुधा प्रत्येक घरात कार असते आणि तिला चालवता येणं हि तेवढच महत्वाचं झालं आहे.
कार शिकताना एका चांगल्या प्रशिक्षकाची गरज असते जो त्यांना सहजपणे गाडी चालवायला शिकवू शकेल. जर एखादी व्यक्ती कार चालवण्यात पारंगत असेल तर तो कार ड्रायव्हिंग स्कूल चालवून पैसे कमवू शकतो. या व्यवसाया करीता एक कार असणे गरजेचे आहे आणि तुम्हाला शिकवता आले पाहिजे. हा व्यवसाय पार्ट टाइम म्हणून सुद्धा करू शकता.

सेकंड हँड कार डीलरशिप ( Second hand car Dealership ) –

काही लोकांना गाड्यांची खूप आवड असते, लोकांना नवं नवीन लेटेस्ट कार खरेदी करणे फार आवडते, म्हणून ते त्यांच्या जुन्या कारसाठी नवीन खरेदीदार देखील नेहेमी शोधत असतात.
परंतु स्वतःच्या कामामुळे प्रत्येकाला ग्राहक शोधणे शक्य नसते, म्हणून जर अशा लोकांच्या गाड्या विकण्याची जबाबदारी तुम्ही घेतली आणि त्यांची गाडी चांगल्या भावात विकून दिली तर नक्कीच तुम्हाला चांगले commission मिळेल.
तुम्ही या सेकंड हँड कार डीलरशिप बिझनेस मध्ये जास्त नफा कमवण्यासाठी अजून एक युक्ती करू शकता. ज्या मालकाची चार आहे त्याला एक रक्कम ठरवून द्या आणि विकतांना ती कार त्याहून जास्त किमतीने विका, यात आलेली सर्व रक्कम तुमची होऊ शकते .
अशा प्रकारे दुसऱ्याच्या गाड्या स्वतः मार्केटिंग करून विकू शकतो.

वॉल पेन्टिंग ( Wall Painting Business ) –

प्रत्येकाला वाटत असत कि आपलं घर खूप छान दिसावं त्यानुसार ते आपल्या घराची तशी कल्पना करत असतात. तुम्हाला जर पेन्टिंग किंवा चित्रकारी विषयी चांगली माहिती असेल तर तुम्ही अशा लोकांच्या घरातील भिंतीवर स्वतःची कलाकारी दाखवून पैसे कमवू शकतात.
जर लोकांच्या गरजेनुसार तुम्ही काम केले तर ते खुश होऊन अजून १० लोकांना तुमच्या बद्दल सांगतील, आणि व्यवसाय वाढेल.

एटीएम मशीन फ्रँचायझी (ATM franchise business ) –

आजच्या युगात अनेक कंपन्या एटीएम बसवण्यासाठी मताधिकार म्हणजेच franchise देत आहेत. जे लोक तुमच्या शहरात किंवा गावात पेन्शनधारक आहेत त्यांना 6 ते 7 किलोमीटर दूर जावे लागते, त्यानंतर त्यांना बँकेत रांग लावावी लागते, त्यानंतर ते पैसे काढू शकतात.
बर्‍याच लोकांच्या घरात, जेव्हा पती कामानिमित्त घरा बाहेर राहतात, त्यांच्या घरात फक्त स्त्रिया असतात, तेव्हा नवऱ्याने पाठवलेले पैसे काढण्यासाठी त्यांना बँकेत जावे लागते. हे ATM मशीन बसवून तुम्ही लोकांना मदत करू शकाल. लोकांना फक्त डेबिट कार्ड मशीन मध्ये टाकून पैसे काढायचे असतील.
तर हा एक उत्तम व्यवसाय आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जास्त जागेचीही गरज भासणार नाही. यामध्ये कंपनी तुम्हाला काही टक्के कमिशन देईल ज्यातून तुम्ही चांगले पैसे कमवू शकतात.
म्हणून हा व्यवसाय बिनभांडवली व्यवसाय नक्कीच आहे कारण बँक तुम्हाला सगळं देणार आहे. दुसरं असं कि हा एक उत्तम ग्रामीण भागातील उद्योग / गावाकडचा व्यवसाय बनू शकतो.

स्क्रीन प्रिंटिंग ( Screen Printing Business ) –

या व्यवसाय करीता तुम्हाला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. आपण लहान शहरात राहत असलात तरीही आपण हा व्यवसाय सुरू करू शकता. आपल्या जवळपास दरोज अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात ज्यात लोकांना आमंत्रण देण्यासाठी कार्ड छापले जाते, लग्न कार्ड, मुंडन, भंडारा, वाढदिवस, वर्धापनदिन इत्यादी व्यतिरिक्त, बिल बुक, कॅश मेमो, व्हिजिटिंग कार्ड आणि प्रसंगी मतपत्रिका, स्टीकर, पोस्टर इ.
जर तुमच्याकडे संगणक किंवातुम्हाला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. लॅपटॉप असेल तर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी 15 ते 20 हजार रुपये खर्च येईल, जेणेकरून तुम्ही थोडे साहित्य घेऊन व्यवसाय सुरू करू शकता. मॅटर बनवण्यासाठी, तुम्हाला लेझर प्रिंटरची आवश्यकता असेल

बेकरी व्यवसाय ( Bakery Business ) –

आपण हा व्यवसाय आपल्या घरातून देखील सुरू करू शकता. या व्यवसायाची विक्री खूप जास्त असते.तुम्ही हा व्यवसाय दोन प्रकारे सुरू करू शकता, पहिले तुमचे दुकान उघडून आणि दुसरे म्हणजे स्वतः बेकरी प्रॉडक्ट्स तयार करून. जर तुम्ही बेकरीचे दुकान उघडत असाल तर तुम्हाला दुसऱ्या ठिकाणाहून वस्तू मागवाव्या लागतील, ज्यात तुम्ही किमान 10 ते 15 हजार गुंतवून हा व्यवसाय सुरू करू शकता.

भेटवस्तू शॉप ( Gift Shop Business ) –

आपल्याकडे कोणताही मंगल प्रसंग असो जसे कि वाढदिवस, लग्न कार्य, ऍनीव्हर्सरी इ. भेटवस्तू शिवाय सर्व प्रसंग अपुरे वाटतात. अशा प्रकारे जर तुम्ही गिफ्ट शॉप उघडून तुमचा व्यवसाय सुरू केला तर तुम्ही या व्यवसायातून चांगला नफा मिळवू शकता.

व्हिडिओग्राफी ( Video Shooting Business ) –

आजकाल, जिथे तुम्ही कोणत्याही पार्टीला जाता, तिथे तुम्हाला लोक व्हिडिओग्राफी करताना दिसतील, कारण हे आनंदाचे क्षण अविस्मरणीय राहतात. व्हिडीओग्राफी करणाऱ्या लोकांना पार्टीमध्ये व्हिडीओग्राफी करण्यासाठी लोक भाड्याने घेतात. ही एक नवीन लघु उद्योग आयडिया आहे जी सुरू करू शकतात आणि चांगले पैसे कमवू शकतात, यासाठी आपल्याकडे एक चांगला कॅमेरा असावा, तरच आपण हा व्यवसाय सुरू करू शकता.

वाढदिवस भेटवस्तू बिजनेस ( Birthday Gift Business ) –

या व्यवसायात सर्वात जास्त गरज असेल ती तुमच्या creative mind ची , कॉन्टॅक्ट ची आणि सोशल मीडिया हँडलिंग पॉवर ची. कारण एका मुलाला किंवा मुलीला तुमच्याकडचे बनवलेले अनोखे गिफ्ट आवडले तर नक्कीच ती व्यक्ती अजून १० लोकांना तुमच्या बद्दल सांगते आणि हळू हळू तुमचा बिन भांडवली घरघुती व्यवसाय यशस्वी होतो.

शेळीपालन व्यवसाय ( Goat Farming Business ) –

आजकाल शेळीपालन हा व्यवसाय लोकप्रिय होत चालला आहे. सुरवातीला २ – ३ शेळ्या घेऊन हा व्यवसाय सुरु करता येतो. यामध्ये जास्त गुंतवणूक लागत नाही तसेच शेळ्यांवर जास्त खर्च करावा लागत नाही. शेळ्यांची वाढ लवकर होत असते आणि त्यांची किंमत देखील चांगली मिळते.
कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी साठी हे उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत आहेत. ते ग्रामीण उत्पन्नात आणि राष्ट्रीय उत्पन्नामध्ये खूप योगदान देतात. शेळीचे मांस आणि दूध हे कोलेस्टेरॉल मुक्त आणि पचण्याजोगे आहे. शेळीचे दूध हे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वापरले जाते.
तुम्ही शेळीपालन करून एक यशस्वी व्यवसाय करू शकता.

आइस्क्रीम पार्लर ( Ice cream parlor Business ) –

हिवाळा असो की उन्हाळा, लोकांना आईस्क्रीम खाण्याचा नक्कीच आनंद होतो. अन्न खाल्ल्यानंतर, जर संध्याकाळी आइस्क्रीम उपलब्ध नसेल, तर लोकांना आइस्क्रीम शोधण्यासाठी लांब जावे लागते. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमच्या घरात स्वतःच्या कॉलनी साठी एक लहान आईस्क्रीम पार्लर उघडू शकता.
ज्यामध्ये तुम्हाला आईस्क्रीम फ्रीज खरेदी करण्याची सुद्धा गरज नाही, कारण ज्या कंपनी च्या ICE-CREAME तुम्ही ठेवतात तेच लोक तुम्हाला फ्रिज देतात. म्हणून हा नक्कीच एक बिनभांडवली घरघुती पार्ट टाईम केला जाणारा व्यवसाय आहे.

डांस क्लासेस ( Dance Classes Business ) –

हा व्यवसाय करण्यासाठी तुमच्यात कला असावी लागते.
डान्स क्लासेस ही ट्रेन्डिंग व्यवसाय आयडिया पैकी एक आहे. तुम्ही डान्स स्वतः उत्तम करत असाल आणि तुम्ही नृत्य शिकवण्यात तज्ञ असाल तर तुम्ही मुलांसाठी एक नृत्य केंद्र ( Dance Class ) उघडू शकता कारण आजच्या काळात अनेक पालकांना आपल्या मुलांना त्यांच्या आवडीच्या गोष्टींना पुढे नेण्यात इंटरेस्ट असतो.
यासाठी तुम्हाला फार पैसे गुणवण्याची सुद्धा गरज नाही, तुमच्या घरात वरच्या खोलीत पुरेशी जागा जरी असेल तरीही हे डान्स प्रशिक्षण केंद्र तुम्ही उघडू शकतात. हा देखील एक उत्तम व्यवसाय ठरू शकतो.

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ( Social Media Influencer ) –

आजकाल प्रत्येक जण सोशल मीडिया वापरत असतो. तुमच्यात असलेली एखादी विशिष्ट कला किंवा कौशल्य रेकॉर्ड करून तुम्ही सोशल मीडिया ( इन्स्टाग्राम, फेसबुक पेज इत्यादी ) वर टाकू शकता. तो कॉन्टेन्ट जर लोकांना आवडत असेल तर ते तुम्हाला फॉलो करतील. जेव्हा तुम्हाला फॉलोअर्स मिळतील तेव्हा तुम्ही त्यांना सौंदर्य किंवा इतर उत्पादनांचा प्रचार करू शकता. तर अशाप्रकारे तुम्ही त्या उत्पादनातून मिळणाऱ्या कमिशनद्वारे पैसे कमवू शकता.

चिप्स मेकिंग बिझनेस ( Chips Making Business ) –

चिप्स सर्वांनाच खायला आवडतात. चिप्स बनवण्याचा व्यवसाय हा एक अतिशय मागणी असलेला व्यवसाय आहे. त्याची मागणी सर्वत्र आहे मग ते रेल्वे स्टेशन असो किंवा बस स्टेशन, शाळा-कॉलेज किंवा कोणतेही गर्दीचे क्षेत्र. हा व्यवसाय एक छोटीशी बिझनेस आयडिया आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी, जास्त जागेची आवश्यकता नाही किंवा जास्त गुंतवणूक ची गरज पडत नाही.
चिप्स बनवण्याचा हा व्यवसाय पुरुष आणि महिलांसाठी कमी गुंतवणुकीचा घरघुती उद्योग आहे.

ब्युटी पार्लर ( Beauty Parlor Business ) –

हा वर्षभर चालणारा व्यवसाय आहे. हा व्यवसाय खास करून महिलां साठी आहे. जर तुमच्याकडे घरकाम करून वेळ उरत असेल तर हा छान व्यवसाय करू शकता. त्यासाठी तुम्हाला ब्युटीशियन कोर्स करावा लागेल.
आजच्या काळात प्रत्येक स्त्रीला सुंदर दिसावेसे वाटते, अशा परिस्थितीत तुम्ही पाहिले असेल की जर एखादी महिला मार्केटिंगसाठी गेली तर ती नक्कीच ब्युटी पार्लरमध्ये जाते. तुमच्यासाठी सर्वोत्तम व्यवसाय आयडिया असू शकते.

साबण बनवणे ( Soap Making Business ) –

सध्याच्या Chemical च्या जमण्यात सर्वांना Natural प्रॉडक्ट्स ची ओढ असते. बऱ्याच स्किन प्रॉब्लेम्स असलेल्या लोकांना डॉक्टर कडून तसा सल्ला सुद्धा देण्यात येतो, म्हणून हा साबण बनवण्याचा बिझनेस करण्यात काहीच हरकत नाहीये.
बरेच लोक आपल्या घरातून साबण बनवण्याचा व्यवसाय करतात ते सुद्धा घरगुती पद्धतीने. तथापि, साबण बनवण्यासाठी येणारी यंत्रसामग्री खूप महाग आहे जी प्रत्येकाला परवडणारी नाही. हाताने तयार केलेला साबणही बाजारात विकला जातो. साबण हे असे उत्पादन आहे की आपण ते रोज वापरतो, त्यामुळे बाजारात त्याची मागणी कधीच कमी नसते.

सोशल मीडिया सेवा ( Social Media Service business ) –

आजच्या युगात प्रत्येक जण सोशल मीडिया वापरतो. मोठ्या कंपन्या त्यांच्या ब्रँडची जाहिरात मिळवण्यासाठी यूट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, वेबसाइट इत्यादी सोशल मीडियाची मदत घेतात. जर तुम्ही युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम वगैरे चालवत असाल तर तुम्ही खाते उघडून लोकांच्या कंपनीची जाहिरात देखील करू शकता, पण यासाठी तुमचे फॉलोअर्सही तेवढे असावे लागतात.
तुम्ही तुमची सोशल मीडिया प्रोफाइल कशी money making बनवू शकतात याचे योग्य प्रशिक्षण घेतले तर नक्कीच हा एक छान पर्याय ठरू शकतो.

मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय ( Candle Making Business ) –

हा एक छोटासा पण फायदेशीर व्यवसाय आहे जो कि कोणीही करू शकतो. मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय अगदी कमी गुंतवणुकीने सुरू करता येतो. वाढदिवसाची मेजवानी, लग्नाच्या मेजवानी आणि अनेक सणांमध्ये याचा वापर प्रकाश योजना साठी किंवा सजावट वाढवण्यासाठी केला जातो. तुम्ही उत्तम डिझाईन आणि रंगीबेरंगी मेणबत्ती बनवून विकू शकता. अशा रंगीबेरंगी मेणबत्त्या बाजारात खूप महाग किंमतीत विकल्या जातात. या व्यवसाया मधून कमी खर्चात भरपूर नफा मिळवता येतो.

प्ले स्टेशन ( Play Station )

लहान मुलांना विडिओ गेम्स खेळायला खूप आवडते, अशी क्वचितच मुले / मोठे व्यक्ती असतील जे गेम्स खेळत नाहीत. पूर्वी मुले मैदानावर खेळायची, पण आजकाल मुलांना मैदानावर कमी आणि मोबाईल / कॉम्प्युटरमध्ये जास्त खेळायला आवडते. तुम्ही ह्या संधीचा फायदा घेऊन त्यांच्यासाठी विडिओ गेम्स ची सुविधा देऊ शकता. हा सुद्धा व्यवसायाचा एक प्रकार ठरू शकतो. कम्प्युटर वर खेळणाऱ्या गेम्स ला प्ले स्टेशन म्हणतात.

सकाळची उत्पादने विक्री व्यवसाय ( Morning Products Selling Business ) –

सकाळी आपल्याला दैनंदिन वापराच्या अनेक प्रकारच्या वस्तूंची गरज असते, जसे की दूध, ब्रेड, पोहे, वृत्तपत्र इ. या सर्व अशा गोष्टी आहेत, ज्या आपण दोन-चार दिवस एकत्र ठेवू शकत नाही. त्यामुळे हे लक्षात घेता, रोजच्या वापराच्या या गोष्टी तुम्ही रोज सकाळी लोकांना त्यांच्या घरी उपलब्ध करून देऊ शकता.
ज्यामुळे त्यांचा वेळ देखील वाचणार आहे आणि त्यांना सकाळी दुकानात जाण्याची गरज नाही, त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही या व्यवसायाद्वारे खूप चांगले कमवू शकता. हा नक्कीच एक कमी गुंतवणुकीचा पार्ट टाईम बिजनेस आहे.

टिकली बनवण्याचा व्यवसाय –

हा लघु उद्योग देशांतर्गत उद्योग म्हणून करता येतो. महिला सहजपणे हा व्यवसाय सुरू करू शकतात. बिंदी, डिंक, मखमली कापड, रुबी, नीलमणी, क्रिस्टल, मोती इत्यादी विविध प्रकारच्या दगडांचा वापर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असेल.
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी काही मशीन्स घ्याव्या लागतील ज्या 15 ते 20 हजारात सुरू करता येतील आणि आपण बनवलेल्या टिकल्या शॉप्स ला डिस्ट्रिब्युट करून आपण सुमारे 40 ते 50%पर्यंत नफा कमवू शकता.
हा उद्योग घरगुती व्यवसाय मध्ये गणला जातो.

स्वीट बॉक्स मेकिंग व्यवसाय –

प्रत्येक हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये स्वीट बॉक्सला मागणी आहे, ती कोणत्याही स्त्री किंवा पुरुषाने सुरू केली जाऊ शकते, यासाठी बॉक्स तयार करण्यासाठी आपल्याला गोंद आणि कागदाची आवश्यकता असेल, जे आपण खरेदी करून आपला व्यवसाय सुरू करू शकता. ही देखील एक लघु उद्योग आईडिया आहे जी कमी खर्चात सुरू करता येते.
बॉक्स बनवल्यानंतर तुम्ही ते हॉटेल, ढाबा, रेस्टॉरंट इत्यादी येथे विकू शकता तुम्ही हा व्यवसाय फक्त 10 ते 15 हजारात सुरू करू शकता.

ग्राफ़िक डिजाईन बिजनेस –

जर तुम्हाला ग्राफिक डिझाइन करण्यात रुची असेल तर तुम्ही लोकांना पोस्टर, व्हिसीटींग कार्ड, लग्नपत्रिका इ. बनवून देऊ शकता. ग्राफिक डिझाइन शिकणे काही फार अवघड काम नाहीये, १ महिन्यात तुम्ही ते शिकू शकता. ग्राफिक डिझाइन ची ऑनलाईन खुप मागणी आहे.

पेपर बॅग बनवणे ( Paper Bag Making Business ) –

सरकारने पर्यावरणाचे होणार नुकसान लक्षात घेता प्लास्टिक वर बंदी घातली आहे. आता लोक पेपर च्या पिशव्या वापरात आहे हि गोष्ट लक्षात घेता तुम्ही कमी गुंतवणूक करून कागदी पिशव्या बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. हा व्यवसाय तुम्ही घर बसल्या किंवा पार्ट टाइम म्हणून करू शकता.

सजावटीच्या वस्तू बनवण्याचा व्यवसाय ( Decoration items making Business ) –

घराची सजावट ही आजकाल ची फॅशन बनली आहे. जुन्या काळात लोक घराची सजावट स्वतः करायचे, आजकाल नवीन वस्तू खरेदी करून बाजारातून सजावटीसाठी आणल्या जातात. जर तुमच्यामध्ये अशी एखादी कला दडलेली असेल, ज्याद्वारे तुम्ही जुन्या वस्तूंपासून किंवा अशा काही गोष्टींमधून नवीन सजावटीच्या वस्तू बनवू शकता, तर तुम्ही घरी बसून सजावटीच्या वस्तू बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता जे अगदी कमी गुंतवणूकीने सुरू करता येईल.
अशा वस्तुंना बाजारात फार मागणी असते, लोक घरासाठी दिलखुलास पणे खर्च करतात. तुम्हाला व्यवसाय करण्या करिता हा पर्याय निवडू शकता.

टेलरिंग शॉप ( Tailoring shop Business ) –

जर तुम्हाला मशीन कसे चालवायचे हे माहित असेल आणि कपडे कापून त्यांना नवीन रूप देता आले तर तुम्ही घराच्या एका छोट्या कोपऱ्यात टेलरिंगचे दुकान सुरू करू शकता. अवघ्या 5 ते 7 हजार रुपयांनी टेलरिंग मशीन खरेदी करून घरी बसून व्यवसाय सुरू केला जाऊ शकतो.
स्त्रियांसाठी तर हा पारंपरिक व्यवसाय आहे असे म्हणायला काही हरकत नाही. फावल्या वेळात महिलांसाठी उत्तम घरघुती लघु उद्योग आहे.

द्रोण पत्रावळी बनवण्याचा व्यवसाय –

द्रोण पत्रावळी मध्ये अन्न खाण्याची सुरुवात आपल्या प्राचीन सभ्यतेपासून झाली आहे आणि आजही लोक त्याला शुभ मानतात. कोणत्याही छोट्या कार्यक्रमात हे द्रोण पत्रावळी नक्कीच विकत घेतली जातात, अशा स्थितीत जर तुम्ही घरी बसून द्रोण पत्रावळी बनवण्याचा व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला त्याच्याशी संबंधित कच्चा माल खरेदी करण्यासाठी जास्त पैशांची गरज पडणार नाही. अतिशय कमी गुंतवणुकीने हा व्यवसाय तुम्ही शकतात.

द्रोण पत्रावळी साठी लागणारी मशीन इंडियामार्ट वर उपलब्द आहे.

ज्यूट बॅग बनवण्याचा व्यवसाय ( Jute Bag Making Business ) –

जूट पिशव्या वापरण्यासाठी आणि दिसण्यासाठी अतिशय सुंदर आहेत, त्यामुळे हळूहळू बाजारात ज्यूट पिशव्यांची मागणी वाढत आहे. जर तुम्ही घरी बसून ( घरघुती व्यवसाय ) काही उद्योग करण्याचा विचार करत असाल तर ज्यूट बॅग बनवून बाजारात विकणे हा व्यवसाय तुम्ही करू शकतात. कमी गुंतवणूकीत हा बिजनेस करता येतो. हा लघु उद्योगाचा सर्वोत्तम आणि सर्वात फायदेशीर व्यवसाय आहे. हा बिझनेस महिलांसाठी उत्तम घरघुती व्यवसाय आहे.

खेळण्यांचे दुकान ( Toy store ) –

हा व्यवसाय करणे अगदी सोपे आहे. मुले नेहमी त्यांच्या पालकांकडून खेळण्यांची मागणी करत असतात आणि पालकही त्यांच्या आनंदासाठी नवीन खेळणी आणतात जेणेकरून त्यांची मुले आनंदी राहतील. हि कल्पना तुमच्या साठी फायदेशीर ठरू शकते.

स्पोर्ट क्लब (Sport Club ) –

जर तुम्ही एखाद्या खेळात पारंगत असाल तर तुम्ही त्या खेळाचे प्रशिक्षण इतरांना देऊ शकता. यामध्ये तुम्ही कोणता खेळ निवडता त्यावर तुमची गुंतवणूक अवलंबून असेल. तुम्हाला हा व्यवसाय पार्ट टाइम म्हणून देखील करता येईल.

बेबीसिटर बना ( Babysitter business )

बाळ हातात आल्यावर आई स्वतःला विसरते. तिचे संपूर्ण लक्ष नवजात बाळाकडे वळते. गंभीर अवस्थेत मातांना मदत करून मोठे कार्य करण्याची समान संधी आहे. पालकत्वाच्या एका सेगमेंटपासून सुरुवात करा जिथे तुम्हाला जास्त स्वारस्य आहे, काही व्यवसाय करा आणि तुमच्या व्यवसायाची व्याप्ती वाढवा. हा व्यवसाय खास करून महिलांना करता येईल. काहीच गुंतवणूक न करता तुम्ही हा व्यवसाय सुरु करू शकता.

पेपर लिफाफा व्यवसाय ( Envelops Making business ) –

जेव्हापासून सरकारने प्लास्टिक वर बंदी घालण्यात आली आहे, तेव्हापासून कागदी लिफाफ्यांची मागणी वाढली आहे. हा व्यवसाय कमी किमतीचा आणि देशांतर्गत उद्योग व्यवसाय आहे. आपण स्क्रॅप वर्तमानपत्र खरेदी करू शकता आणि आपल्या घरी वेगवेगळ्या आकाराचे लिफाफे बनवू शकता आणि ते वैद्यकीय दुकाने, तयार, किराणा दुकाने इत्यादी बाजारात विकू शकता. अशा प्रकारे, एक लघु उद्योग सुरू करून चांगले पैसे कमवू शकतात. फावल्या वेळात महिला हा व्यवसाय करून चांगला नफा कमवू शकतात.

पशुखाद्य व्यवसाय ( Animal feed business ) –

आपण आपल्या परिसरात राहून पशुखाद्य व्यवसाय सुरू करू शकता. यामध्ये, सर्वप्रथम, तुम्हाला जवळच्या परिसरात शोधून काढावे लागेल की तुम्हाला कोणती शेती करणाऱ्यांशी संपर्क करावा लागेल आणि त्यांना इतर लोकांकडून 5 ते 10 रुपये स्वस्त माल देण्याचा प्रयत्न करावा लागेल. कमी गुंतवणुकीच्या व्यवसायासह ही एक लहान व्यवसाय कल्पना आहे.

Smart Gadgets Shop –

मित्रांनो, आजकाल स्मार्ट गॅझेट विकण्याचा व्यवसाय खूप प्रचलित आहे. काळाच्या ओघात, लोक स्वतःमध्ये बदल देखील आणत आहेत, म्हणूनच आज आपल्या देशात बरेच लोक स्मार्ट गॅझेट खरेदी करत आहेत.
तुम्ही तुमच्या दुकानात अनेक अनोख्या वस्तू ठेवू शकता जसे – स्मार्ट डोअर अलार्म लॉक, स्मार्ट वॉच, पोर्टेबल मिक्सर ज्युसर, ट्रिमर, सन ग्लासेस, फ्लेम लॅम्प, रेसिंग कार, व्हिडिओ एम्पलीफायर, लाइटर, मॅजिक मग, मिनी सिलाई मशीन, डमी सिक्युरिटी कॅमेरा, स्लॅप चॉप, वॉटर डिस्पेंसर, रोटी मेकर, याशिवाय इतर अनेक उत्पादने आहेत जी तुम्ही तुमच्या दुकानात ठेवू शकता. आपण इच्छित असल्यास, आपण आपल्या घरगुती वापरासाठी ऍमेझॉन वरून या सर्व वस्तू देखील खरेदी करू शकता.
आपण इच्छित असल्यास, आपण आपल्या दुकानात घर आणि स्वयंपाकघर, खेळ आणि फिटनेस, कॉस्मेटिक वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स के आयटम, सौंदर्य आणि फॅशन उत्पादने ठेवू शकता.

गूळ बनवण्याचा व्यवसाय ( jaggery making business ) –

गुळाचा उपयोग हा अनेक आजारासाठी केला जातो. जेव्हा तुम्हाला थकवा जाणवतो तेव्हा गुळाचे सेवन केले जाते, अनेक सणांमध्ये गुळाला विशेष महत्त्व दिले जाते, त्यामुळे बाजारात नेहमी गुळाला मागणी असते, या सर्व बाबी लक्षात घेऊन तुम्ही गूळ बनवण्याचा व्यवसाय सुरु करू शकता. गुळाला बाजारात नेहमीच मागणी असते.

बेसन उत्पादन व्यवसाय –

बेसन तयार करण्यासाठी मुख्य कच्चा माल म्हणजे हरभरा डाळ. तसेच तुम्हाला पॅक करण्यासाठी पाउचची गरज आहे. मित्रांनो, तुम्ही पाहिले असेल की सर्व रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, ढाबा इत्यादींवर भरपूर बेसन लागते. तसेच, बेसनाशी संबंधित कोणतीही डिश घरी बनवण्यासाठी बेसनाची गरज असते. जर तुम्ही बेसन प्लांट लावण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला काही मशिन विकत घ्याव्या लागतील. जसे स्वयंचलित बेसन प्लांट मशीन, वजन यंत्र, सिव्हिंग मशीन एक्सपायरी डेट मोहर मशीन इ.हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला 800 ते 1000 चौरस फूट जागेची आवश्यकता असेल. तसेच, ज्या भागात तुम्ही सुरू करणार आहात त्या भागात पाणी आणि वीज असणे आवश्यक आहे. हे नवीन व्यवसाय कल्पना 2021 सुरू करण्यासाठी, मशीन 3 फेज कनेक्शनवर चालतील आणि यामध्ये तुम्हाला जीएसटी नोंदणी, ट्रेडमार्क नोंदणी आणि अन्न परवाना घ्यावा लागेल आणि तुम्ही हा व्यवसाय सुमारे 2 ते 2.5 लाखांमध्ये सुरू करू शकाल.

दलिया मेकिंग बिझनेस ( Daliya Making Business ) –

अनेक घरांमध्ये निरोगी राहण्यासाठी लोक सकाळी नाश्त्यात दलिया (ज्याला मराठीमध्ये लापशी सुद्धा म्हणतात) लापशीचे सेवन करतात कारण लापशी शरीर मजबूत ठेवते. पाहिले तर बाजारात लापशीला मोठी मागणी आहे. त्यामुळे तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. लापशी बनवण्यासाठी वापरला जाणारा मुख्य कच्चा माल म्हणजे गहू. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला दालिया मेकिंग मशीन, सीलिंग मशीन आणि वेटिंग मशीन खरेदी करावी लागेल.
जर तुमच्याकडे 600 ते 800 चौरस फूट जागा असेल तर तुम्ही 1 लाख रुपयांमध्ये हा व्यवसाय सुरू करू शकता. या व्यवसायात तुम्हाला जीएसटी नोंदणी, अन्न परवाना आणि ट्रेड मार्क नोंदणी करावी लागेल.

पुनर्विक्री – वापरलेल्या वस्तूंची खरेदी आणि विक्री व्यवसाय –

हा एक बिनभांडवली व्यवसाय आहे.
देशात श्रीमंत आणि गरीब दोघांमध्ये मोठा फरक आहे, श्रीमंत लोक अनेक नवीन वस्तू विकत घेतात आणि गरीब लोकही त्यांना बघितल्यावर त्या गोष्टी घेण्याचा विचार करतात. पण गरीब लोकांकडे जास्त पैसे नसल्यामुळे ते जुन्या गोष्टी खरेदी करून आपली इच्छा पूर्ण करतात.
त्यामुळे हे लक्षात घेता, वापरलेल्या वस्तूंची खरेदी आणि विक्री करण्याचे काम तुम्ही करू शकता. यामध्ये तुम्ही लोकांच्या जुन्या गोष्टी विकू शकता आणि त्या बदल्यात तुम्ही त्यांच्याकडून कमिशन घेऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्ही जुन्या वस्तू खरेदी किंवा विक्री करून पैसे कमवू शकता.

पॅकेजिंग व्यवसाय –

आजकाल बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या भेटवस्तू आहेत ज्यामध्ये खूप चांगले पॅकिंग आहे, जे बघून लोक आकर्षित होतात. हे काही कलाकारांचे हस्तकला आहे, ज्यामुळे तुमच्याकडे देखील हे कौशल्य असेल तर तुम्ही अगदी कमी गुंतवणूकीसह घरी बसून पॅकेजिंग व्यवसाय सुरू करू शकता.

मग प्रिंटिंग (Mug Printing ) –

घराची सजावट ही आजकाल ची फॅशन बनली आहे. प्रत्येक गोष्टींमध्ये त्यांना अनोखी असावी असे वाटते. वेगवेगळ्या प्रकारचे मग घरांमध्ये दिसू शकतात. ज्यावर छपाई केली जाते, या मध्ये तुम्ही तुमची कला दाखवू शकता. लोकांच्या आवडीनुसार त्यांना मग बनवून देऊ शकता.
मग सजावटीमध्ये तुम्ही त्यांचे फोटो पण Mug वर प्रिंट करू शकता. हा व्यवसाय तुम्ही नक्कीच विचारात घेऊ शकता.

मग प्रिंटिंग बद्दल सविस्तर माहिती साठी येथे क्लीक करा.

बॉलीवूड बातम्या (Bollywood News ) –

मास्क बनवण्याचा घरघुती व्यवसाय –

बॉलीवूडच्या बातम्या शेअर करणारे अनेक चॅनेल्स असू शकतात पण बाजार भरलेला नाही. तुम्ही अजूनही चित्रपट R eviews लिहू शकता आणि लोकांना वाचू इच्छित असलेल्या सेलिब्रिटींच्या मनोरंजक कथा शोधू शकतात . तुमचे यश तुमच्या प्रमोशन क्षमतेवर अवलंबून असते. फावल्या वेळात तुम्ही हा व्यवसाय करून चांगला नफा कमवू शकतात.

आजकाल सर्वात जास्त मास्क ची मागणी वाढली आहे. बिना मास्क आजकाल कोणी बाहेर सुद्धा पडत नाही. मास्क हि खूप मोठी गरज झाली आहे.
जर तुम्हाला घरी बसून चांगले मास्क बनवू शकले तर या सारखा एक लघु उद्योग नसेल. या व्यवसायास जास्त खर्च पण लागत नाही. अत्यंत कमी गुंतवणूक करून तुम्ही हा व्यवसाय सुरु करू शकता.

ट्रैवलिंग एजेंट (Travelling Agent ) –

प्रत्येकाला प्रवासाची आवड असते, पण संपूर्ण मन हे नियोजन करण्यासाठी खर्च केले जाते, पण नियोजन नीट केले नाही तरी संपूर्ण सहल बिघडते. अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे प्रवासात चांगले मन असेल तर तुम्ही ट्रॅव्हलिंग एजंट बनून लोकांना मदत करू शकता. त्यांना सर्वोत्तम योजना देऊन, तुम्ही घरी बसून चांगले कमिशन मिळवू शकता.

CSC Center (कॉमन सर्विस सेंटर) –

हा व्यवसाय करण्यास तुम्हाला संगणकाचे ज्ञान असावे लागेल. आजकाल सर्वांकडे स्मार्टफोन झाले आहेत परंतु आजही अशी बरेच कामे आहेत जे फक्त संगणकावर होतात. गावात राहणाऱ्या साक्षर व्यक्तीसाठी, व्यवसाय करण्यासाठी हे देखील एक चांगले साधन असू शकते.
या सेंटरच्या मदतीने नागरिक विविध प्रकारचे स्कीम, फॉर्म भरणे इत्यादी ऑनलाइन काम करू शकतात. थोड्याश्या गुंतवणुकीतून हा व्यवसाय सुरु करता येतो.

चॉकलेट बनवण्याचा व्यवसाय –

लहान मुले असोत किंवा मोठी माणसे साधारणतः सर्वानाच चॉकलेट खावेसे वाटते. आजकाल चॉकलेट चा वापर वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. चॉकलेट कसे बनवावे याबद्दल थोडीसी माहिती घेतली तर तुम्ही हा कमी गुंतवणुकीचा व्यवसाय सुरु करू शकता. youtube वर चॉकलेट कसे बनवतात यावर बरेचसे व्हिडीओ आहेत.

डेटा एन्ट्री व्यवसाय ( Data entry business ) –

बऱ्याच कंपन्या आहेत ज्यांना डेटा इंट्री साठी लोकांची गरज असते, अशा अनेक वेबसाईट आहेत ज्या घरी बसलेल्या विद्यार्थ्यांना आणि गृहिणींना डेटा एंट्रीचे काम देतात. तुम्ही मोबाईल किंवा लॅपटॉप वरून हे काम करू शकता. घरबसल्या काम करण्यासाठी हे एक उत्तम पर्याय आहे.
खासकरून महिला किंवा मुले हा व्यवसाय करू शकतात. या व्यवसाठी तुम्हाला काहीच गुंतवणूक करावी लागत नाही.

शीतगृह ( Cold storage ) –

प्रत्येक घरात शीतगृहाची गरज असते जसे तुमच्या घरात फ्रिज आहे जेथे तुम्ही वस्तू ठेवता जेणेकरून ती खराब होऊ नये. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मोठ्या प्रमाणावर खरेदी करून स्टोर केल्या जातात, ज्याला स्टोरेज म्हणतात. अशा परिस्थितीत जर तुमच्या घरात किंवा तुमच्या दुकानात थोडी जागा असेल तर तुम्ही कोल्ड स्टोरेज लावू शकता आणि भाड्याने देऊ शकता. यासाठी जास्त गुंतवणूकीची आवश्यकता नाही परंतु आपण घरी बसून चांगली रक्कम मिळवू शकता.

डिझायनिंग ( Designing Business ) –

आजकाल डिझायनिंग ची गरज प्रत्येक व्यवसायात पडत असते. डिझायनिंग करण्यासाठी बरेचसे अँप उपलब्ध आहेत, जसे कि फोटोशॉप, कॅनवा, कोरल ड्रॉ इ. तुम्हाला तुमची जाहिरात करण्यासाठी डिझायनिंग उपयोगी ठरते.
जर तुम्हाला डिझायनिंग शिकायची असेल त्यासाठी बरेचसे कोर्सेस उपलब्ध आहेत. तुम्ही जे डिझायनिंग मध्ये निपुण असाल तर तुम्ही इंटरनेटच्या मदतीने डिझायनिंग ग्राहक तयार करू शकता, इंटरनेटवर असे बरेच लोक आहेत ज्यांना designers ची गरज आहे.
या व्यवसायासाठी तुमच्यात कला असणे आवश्यक आहे. बिना गुंतवणूक करता तुम्ही हा व्यवसाय सुरु करू शकता.

मोबाईल शॉप आणि रिपेअरिंग ( Mobile Shop And Mobile Repairing Business ) –

आजच्या काळात तुम्ही स्वतःची मोबाईल शिवाय कल्पनाच करू शकत नाहीत एवढे आपण त्याच्या आहारी गेलो आहोत. हा व्यवसाय करण्यासाठी तुमच्या जवळ १ लाखांपर्यंत भांडवल असायला पाहिजे. तुम्ही तुमच्या दुकानात अगदी नवीन स्वस्त स्मार्टफोन ठेवू शकता तसेच मोबाईल, कव्हर, सिम कार्ड, रिचार्ज कूपन इत्यादी ठेवू शकता.
तसेच, बरेच लोक महागडे मोबाईल घेतात, जर त्यांचे मोबाईल कधी पाण्यात पडले किंवा डिस्प्ले, टच ब्रेक झाले तर ते त्यांच्या दुकानाच्या आत दुरुस्ती सेवा देखील देऊ शकतात, जेव्हा लोकांना एकाच ठिकाणी दोन्ही सुविधा मिळतील, तेव्हा ग्राहक स्वतः येतील आणि जातील कमी गुंतवणुकीचा व्यवसाय असलेला हा भारतातील सर्वात फायदेशीर व्यवसाय आहे ज्याची मागणी कधीही संपणार नाही.

इंटरनेट कॅफे ( Internet Cafe) –

आजही अशी अनेक ऑनलाइन कामे आहेत, जी तुम्ही मोबाईलवर नीट करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला संगणकाची गरज आहे, उदाहरणार्थ, documents बनवण्यासाठी, डिझाईन किंवा प्रेसेंटेशन तयार करण्यासाठी किंवा वेबसाइटला भेट देऊन काही माहिती मिळवणे.
ही सर्व कामे केवळ संगणकाच्या मदतीने उत्तम प्रकारे करता येतात, परंतु प्रत्येकाकडे संगणक नसतो. आणि त्यांना वाटते की जर कोणाचा संगणक सापडला तर आपण हे काम करू शकतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या घरी कॉम्प्युटर हॉल तयार करू शकता आणि तेथील लोकांना इंटरनेट सेवा देऊन तुम्ही चांगले उत्पन्नही मिळवू शकता.

आधार बँकिंग ( Aadhar Banking Business ) –

आज आधार कार्ड हे फक्त ओळखपत्र राहिले नसून त्यावरून दुसरे अनेक कामे होत आहेत. आधारद्वारे बँकेतून पैसे काढू आणि जमा करू शकतो. जर तुम्ही गावात राहत असाल आणि तुमच्या गावात बँक वगैरे नसेल तर तुम्ही आधार बँकिंगद्वारे हा व्यवसाय करू शकता. आपल्याला यात जास्त गुंतवणूक करण्याची देखील गरज नाही, अश्या प्रकारची सेवा तुम्ही ग्रामीण भागात देऊ शकता.
हा व्यवसाय तुम्ही मोबाईल द्वारे देखील करू शकता. त्यासाठी तुमच्याकडे बायोमेट्रिक डिव्हाइस असणे आवश्यक आहे, जे तुम्ही बाजारातून फक्त २००० रुपयांना खरेदी करू शकता, त्यासाठी आधार बँकिंग आयडी देखील आवश्यक आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही आधारमधून पैसे काढण्याचे आणि जमा करण्याचे काम करू शकाल. आपण हे आयडी फक्त 100 किंवा ₹ 200 मध्ये बनवू शकता. म्हणून जर तुम्ही गावात राहत असाल तर या व्यवसायाबद्दल तुम्ही विचार करू शकता.

भाजीपाला व्यवसाय ( Vegetable farming Business ) –

आजकाल मोठ्या शहरांमध्ये राहणारे अनेक लोक त्यांच्या छतावर भाजीपाला लागवड करून चांगला नफा कमवत आहेत. तर हा व्यवसाय खूप कमी गुंतवणूक करून तुम्ही सुरु करू शकता. तुमच्या घराजवळ, घरामाघे किंवा छतावर देखील भाजीपाला लागवड करू शकता.
यामध्ये तुम्हाला भाजी विक्री साठी जागा घेण्याची आवश्यकता नाही, तुम्ही स्वतः फिरून किंवा व्यापाऱ्यांना एकदम सर्व माल विकू शकता. या व्यवसायासाठी तुम्हाला तुमचा पूर्ण वेळ द्यायची गरज नाही. पार्ट टाइम मध्ये हा एक चांगला विकल्प आहे.

फ्लॉवर गार्डन ( Flower Garden Business )

आपण सर्वांना फुलांची लोकप्रियता सर्वश्रुत आहे. सर्वांना वाटत असत कि आपल्या घरी छान फुलांची रोपटे असावेत, हि गोष्ठ लक्षात घेऊन तुम्ही अत्यंत कमी जागेत फुलांचे रोपटे लावू शकता.
त्या फुलांना फुलायला जास्त वेळ लागत नाही आणि बाजारात किंवा घरोघरी जाऊन फुलांचे भांडे विकू शकता. जर तुम्हाला फुलांची आवड असेल तर हा व्यवसाय नक्कीच खूप फायदेशीर ठरू शकतो.

ऑनलाइन बुक स्टोअर ( Online Book Store Business ) –

लोकांना पुस्तके किंवा कादंबऱ्या वाचायला खूप आवडतात. अशा परिस्थितीत ते अनेक ऑनलाईन पुस्तके मागतात किंवा ऑनलाईन मोफत पुस्तके वाचणे पसंत करतात. जर तुम्ही तुमच्या बुक स्टोअरमध्ये ऑनलाईन सेवा देणे सुरू केले तर तुम्ही त्यातून नफा कमवू शकता. आपण लोकांना घरी पुस्तके पुरवू शकता किंवा आपण आपले स्वतःचे ऑनलाइन अँप देखील सुरू करू शकता. येथून लोक तुमच्या बुक स्टोअरमधून पुस्तके खरेदी करू शकतात किंवा ऑनलाइन वाचू शकतात.

अपसायकल फर्निचर व्यवसाय ( Upcycle furniture business) –

जुन्या फर्निचरला थोडाफार बदल करून नवीन फर्निचरमध्ये बदलणे म्हणजे अपसायकल फर्निचर व्यवसाय. हा व्यवसाय कमी गुंतवणुकीचा जास्त नफा कमवून देण्याची ताकद ठेवतो. तुमच्यामध्येही अशी लपलेली कला आहे, तर आता ती बाहेर आणण्याची वेळ आली आहे, त्याला व्यवसायाचे स्वरूप द्या ज्यामध्ये तुम्हाला गुंतवणूक करावी लागणार नाही, कारण जुन्या गोष्टींचा वापर करून तुम्हाला एक नवीन गोष्ट तयार करावी लागेल आणि ते लोकांना उपलब्ध करून दया. जर तुम्ही खरंच चांगले काम करत असाल तर तुम्हाला या व्यवसायामधून प्रसिद्धी मिळेल आणि हा व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो.

एफिलिएट मार्केटिंग ( Affiliate Marketing Online Business ) –

हा व्यवसाय तुम्ही घर बसल्या करू शकता, यामध्ये काय असते बघा, ज्या गोष्टी माणूस प्रत्यक्ष दुकानात घ्यायला जातो, त्या सर्व वस्तू ऑनलाइन विकणे, म्हणजेच affiliate मार्केटिंग होय. यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त २ ते ३ हजार रुपये गुंतवून डोमेन आणि होस्टिंग विकत घ्यायची आहे आणि बस्स वर्डप्रेस वर तुमचे online दुकान चालू करायचे आहे.
तुम्हाला ज्या प्रॉडक्ट्स ची जास्त माहिती आहे त्या बद्दल लिहून लोकांना त्या प्रॉडक्ट बद्दल मार्गदर्शन करून त्यांना तो विकायचा असतो. ते कसे ? तर ऍमेझॉन affiliate बद्दल थोडक्यात सांगतो. ऍमेझॉन तुम्हाला एक लिंक देते जी तुम्ही तुमच्या ब्लॉग पोस्ट मध्ये टाकतात आणि जर ग्राहकाला माहिती आवडली आणि त्याने त्या लिंक वर जाऊन ऍमेझॉन वरून काहीपण खरेदी केले तर तुम्हाला १०% पर्यंत कमिशन मिळते.
कमी गुंतवणूक करून तुम्ही हा व्यवसाय सुरु करू शकता.

वाहन धुण्याचे दुकान ( Vehicle Washing Business ) –

आज जवळपास प्रत्येक घरात दुचाकी किंवा चारचाकी वाहन हे असतेच. वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे म्ह्णून जर तुम्ही वाहन धुण्याचा व्यवसाय सुरु केलात तर तू यशस्वी ठरू शकतो.
तुम्ही वाहनाच्या आकारानुसार पैसे आकारू शकता. जर तुम्ही चांगली सेवा देत असाल तर लोक आपण होऊन तुमच्या कडे यायला सुरवात करतील. हा व्यवसाय १२ महिने चालणारा आहे. तुम्ही नक्कीच याबद्दल विचार करू शकता.

हे वाचा – टी-शर्ट प्रिंटिंग व्यवसाय बद्दल माहिती.

ई-रिक्षा बिजनेस ( E- Rickshaw Business )

तुम्ही अशा क्षेत्रात राहता जिथे मोठ्या संख्येने महाविद्यालये आहेत किंवा अशी जागा आहे जिथे लोक भेटायला येत राहतात. त्यामुळे तुम्ही ई-रिक्षाचा व्यवसाय सुरू करू शकता, ई-रिक्षा ही अशी रिक्षा आहे, जी आपण बॅटरी चार्ज करून पेट्रोलशिवाय चालवू शकतो.
तुम्ही लोकांना तुमच्या ई-रिक्षात बसवू शकता आणि त्यांना नेऊन सोडण्याचे काम करू शकता आणि जास्त खर्च न करता तुम्ही या ई-रिक्षाच्या व्यवसायातून खूप चांगले उत्पन्न मिळवू शकता.

केटरिंग बिझनेस ( Catering Business) –

जर ती वैयक्तिक शेफ गिग तुमच्या वेळापत्रकासाठी खूप प्रतिबंधित असेल, तर त्याऐवजी केटरिंगचा विचार करा. तुमचे प्रोजेक्ट निवडा, कमी पण मोठ्या कार्यक्रमांवर काम करा आणि तुमची वेळ व्यवस्थापन कौशल्ये वाढवा. जर तुम्ही चांगला स्वयंपाक बनवत असाल तर हा व्यवसाय नक्कीच फायदेशीर ठरू शकतो.

Related Articles

6 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!