समाजकारण

राजकारणामुळे चक्रव्युहात अडकलेली आमची स्पर्धा आणि आमचे विद्यार्थी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पुण्याला जाउन परीक्षा देउन  रात्री आलो .सकाळी उठून नवीन सुरूवात करावी आणि सरळसेवेचे रूप बदलेले आहे .या नवीन पध्दतीने परीक्षा घेणार आहेत त्याची तयारी करण्यासाठी योजना आखून अभ्यासाला लागावे या आशेने मी सकाळी उठलो आणि आश्रम मध्ये जाणार तेवढयात सोशल माध्यमातून एक बातमी कानावर आली ती म्हणजे शिवसेने गटनेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याची बातमी आणि सरकार कोसळणार ही बातमी वाचली आणि डोळयासमोर अंधार दिसू लागला ,मन खिन्न् झाले .‍मन रडू लागले.सुदर्शन या मित्राला कॉल केला आणि त्याला सांगतिले तर याच्या वर  काय प्रतिक्रिया दयावी त्याला समजले नाही..तो निशब्ध्‍ झाला .येणारा काळ कसा असेल याचे चित्र आमच्या डोळयासमोर उभे राहिले .

गेली  ३ वर्ष सरळ सेवा नावाची परीक्षा या सरकारने घेतली नाही..आता कुठे आशेचा किरण दिसत होता हे सरकार  दिवाळी पर्यंत परीक्षा घेणार होते..ती एक संधी आमच्या साठी होती ..त्या संधीचे सोने करण्याचा आम्ही प्रयत्न् करणार होतो..सरकारला आता कुठे गती येईल आणि सगळे सुरळीत होईल असे सगळयाच्या मनात आशा होती ..ती फोळ ठरली.

काही दिवसात नवीन सरकार स्थापन होईल आणि त्याचे खातेवाटप होण्यासाठी काही महिने जातील आणी परत आमच्या पदरी निराशा पडेल .दिवाळीत होणारी भरती पूढच्या वर्षी होईल .म्हणजे आमचे ४ वर्ष एकही सरळसेवा न देता गेले .याचा अर्थ आम्हाला सगळयांनी मिळून मूर्ख बनवले ..जून्या सरकारने ७२००० हजाराचे गाजर दाखवले..सध्याचे सरकारने परीक्षा घेउ याचे गाजर दाखवले आणि येणारे सरकार स्थापन होण्यासाठी ३ ते चार महिने खाईल आणि त्या नंतर विचार करेल परीक्षा घेण्याचा.

तुमच्या राजकारणात आमचा बळी का घेता ..आमची जर वर्षी परीक्षा होयला पाहिजे जेणेकरून आम्ही आमचे अस्तित्व्  निर्माण करू शकू..आमचा अंत पाहू नका .,.

१००- २०० कोटी कमवण्याच्या नादात आमची भाकरी अप्रत्यक्ष  पणे हिंसकावून घेउ नका..

सरळसेवे साठी कायदा वगैरे करता येतय का ‍ किंवा अशी काय पध्द्त विकसित करा जेणेकरून जर वर्षी ठराविक जागा निघायलाच ‍ पाहिजे ..एखादे सॉफ्टवेअर बनवता येत असेल तर ते बनवून जर वर्षी राजकारणांचा हस्तक्षेप न होता सरळसेवा घेता येत असेल तर ती घेण्यात यावी ही कळ कळीची ‍ विनंती .

ज्यांच्या घरी फक्त् तीन वेळेचे जेवण भेटत असेल तर त्यांनी व्यवसाय करण्यासाठी पैसे कोठून आणायचे .अशांना स्पर्धा परीक्षा म्हणजे सुवर्ण संधी असते.फक्त् बुध्दीचा विकास करायचा आणि आपले जीवनात बदल घडवून आणायचा.या शिवाय त्यांच्याकडे दूसरा पर्याय नसतो.

याची सर्वांनी दखल घेउन राजकारणी लोकांपर्यत हा लेख पोहोचवण्यात मदत करावी

लेखक : राम ढेकणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *