Multi Brand Strategy – मल्टि ब्रँड स्ट्रॅटेजी काय असतं…??
Multi Brand Strategy – जेव्हा कंपनीच्या उत्पादनांच्या पोर्टफोलिओमध्ये भिन्न ब्रँड किंवा नावे असतात तेव्हा त्यांच्याकडे मल्टी-ब्रँड धोरण असते. एखाद्या कंपनीला भिन्न प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी बहु-ब्रँड धोरण स्वीकारायचे असेल किंवा उत्पादनासाठी अधिक पैसे देण्यास इच्छुक असलेल्या ग्राहकांना आवाहन करण्यासाठी लक्झरी लाइन तयार करावी लागेल.
OPPO आणि VIVO चे मोठे होर्डिंग्ज, बॅनर, दुकानाचे शटर हिरवे आणि निळे रंगवलेले कधी लक्षात आले आहेत ka?
बहुतेक जणांना असे वाटते की हे दोन स्मार्टफोन ब्रँड प्रतिस्पर्धी आहेत आणि आणखी मार्केट शेअरसाठी एकमेकांशी झुंज देत आहेत. (Multi Brand Strategy)
मल्टीब्रँडिंगमध्ये प्रत्येक उत्पादनाला वेगळे नाव देणे समाविष्ट असते. जेव्हा प्रत्येक ब्रँड वेगळ्या मार्केट सेगमेंटसाठी असतो तेव्हा ही एक उपयुक्त रणनीती असते कारण ती वेगवेगळ्या उत्पादनांमध्ये फरक करण्यास मदत करते.
पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की OPPO आणि VIVO दोन्ही एकाच कंपनी चे ब्रॅण्ड्स आहेत. आणखी एक आश्चर्यकारक बाब म्हणजे, केवळ OPPO आणि VIVO च नाही तर One+, Realme आणि I-Q०० सुद्धा एकाच कंपनी चे प्रोडक्ट आहेत ते म्हणजे BBK Electronics.
याला म्हणतात मल्टी-ब्रँड स्ट्रॅटेजी… अंतर्गत स्पर्धा निर्माण न करता विविध प्रेक्षकांना संबोधित करण्यासाठी उत्पादनांचे स्थान आणि जाहिरात केली जाते.
Xiaomi चा 28% मार्केट शेअर असून पण BBK Electronics ही भारतातील सर्वाधिक विकली जाणारी स्मार्टफोन कंपनी आहे आणि 45% पेक्षा जास्त एकत्रित मार्केट शेअर BBK Electronics चा आहे.
काही कंपन्या त्यांच्याच ब्रँडला स्पर्धक म्हणून अनेक ब्रॅण्ड्स बाजारात आणतात आणि जास्त बाजारपेठेतील हिस्सा मिळवतात ह्याला मल्टी-ब्रँड स्ट्रॅटेजी असे म्हणतात.
धन्यवाद…