उद्योग मोटिवेशनउद्योजकतासुविचारस्टार्टअप Storyस्वतःची डेव्हलोपमेंट

पैशाची पाईपलाईन…एक उद्योजकीय बोधकथा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

एका गावामध्ये उन्हाळ्यात सर्व विहिरींचे पाणी आटून जात असे. गावापासून चार किलोमीटर दूर असलेल्या तलावात मात्र भरपूर पाणी असे. त्यामुळे दूर का असेना पण त्या गावाला कायमस्वरूपी पाणी मिळत असे. एवढ्या लांबवरून भर उन्हाळ्यात पाणी आणण्याचे काम म्हणजे फारच कष्टाचे काम होते.

त्या गावात दोन तरूण मित्र विनित व पुनित राहत होते. ते दोघे चांगले शिकलेले होते, कसलेही काम करण्याची त्यांची तयारी होती. तरीही त्यांना कुठलेही काम मिळाले नाही. त्यामुळे ते दोघेही बेरोजगार होते.

यावर्षी देखील उन्हाळ्यात गावातल्या सर्व विहिरी आटल्या. तेव्हा या दोघांनी एक एक सायकल घेतली व गावातल्या लोकांना पाणी आणून द्यायला सुरवात केली. १० रूपयांना एक हंडा पाणी याप्रमाणे त्यांनी पाणी वाटप सेवा सुरू केली. ते दोघे दररोज एक एक हजार रुपये कमवायला लागले. अंग मेहनतीच्या भांडवलावर त्यांनी उन्हाळ्यात पैसे कमवायला सुरवात केली. गावातल्या लोकांचा देखील पाणी आणण्याचा त्रास कमी झाल्यामुळे लोक मोठ्या मनाने त्यांना पैसे देत असत. उन्हाळ्यात कमावलेले पैसे त्यांना वर्षभर पुरत असत. चार महिन्यात लाख ते सव्वा लाख रूपये मिळत. तेवढे पैसे त्या दोघांसाठी भरपूर होत होते. कारण खेडेगावात महिन्याला १० रूपये खूप होत असत.

ई-कॉमर्स म्हणजे काय? ई-कॉमर्स चे प्रकार आणि ई-कॉमर्स ही नवी संधी

प्रत्येक उन्हाळ्यात दोघेही मित्र हेच काम करत होते . यावर्षीच्या उन्हाळ्यात पुनितने अर्धा दिवस पाणी आणायचे ठरवले होते. उरलेल्या अर्ध्या वेळेत तो तलावापासून गावापर्यंत चारी काढण्यात व्यस्त असायचा. विनित त्याच्या मुर्खपणावर हसायचा. पुनित विनाकारण अर्धे पैसे बुडवून चारी काढण्याचा बिनकामी उद्योग करत आहे, असा विचार विनित करत असे. त्याने पुनितला चारी काढण्याचा नाद सोडून दे असे सांगितले. पुनितने देखील त्याला ” मी पाईपलाईनद्वारे गावात पाणी आणणार आहे असं सांगितलं, तेव्हा पाईपलाईन करण्यासाठी लागणारी मदत तू मला केलीस तर भविष्यात मिळणाऱ्या फायद्यात अर्धा वाटा मी तुला देईन.” असे सांगितले. तेव्हा विनितने नकार दिला.

चार महिन्यात त्याने चारी काढून पाईपलाईन केली. दुसऱ्या वर्षीच्या उन्हाळ्यात एक इंजिन बसवून पहिल्याच दिवशी गावात पाणी आणले. आता तो दोन रुपयात एक हंडा पाणी देऊ लागला. गावातले सर्वच लोक आता पुनितकडून पाणी घेऊ लागले. विनितला पाणी आणण्यास कष्ट होत होते. त्याला १० रूपयाचा हंडा दोन रुपयात विकणे परवडत नसे. पाणी आणण्यासाठी बराच वेळ लागत असे. दिवसात तो फार कष्ट करून शंभर ते सव्वाशे हंडे पाणी सायकलवर घेऊन येऊ शकत होता. याउलट पुनित पाहिजे तेवढे पाणी अगदी कमी वेळेत कसलेही कष्ट न करता देऊ शकत होता. त्यामुळे त्याला २ रूपयात एक हंडा पाणी देणे सहज परवडत होते.

लोक विनितकडून पाणी घेईनात. शेवटी विनितला आपले पाणी आणण्याचे काम बंद करावे लागले. पुनितला विनितची दया आली. त्याने एक वर्षभर शेतीत काम करण्याच्या अटीवर पाण्याच्या व्यवसायातला कायमस्वरूपी अर्धा वाटा विनितला द्यायचे ठरवले. पुनित मैत्रीच्या नात्याला जागला. त्यामुळे विनितला पुन्हा उभा राहता आले. आता आयुष्यभर कसलेही कष्ट न करता दोघांनाही उन्हाळ्यात पैसे मिळणार होते.

बँक चार्जेस बद्दल तुम्हाला माहीत आहे का ?

उद्योजकीय बोध

आपल्या व्यवसायात देखील आपण वर्षानुवर्षे त्याच पध्दतीने काम करत असू तर आपल्याला देखील विनितसारखे एक दिवस मार्केटच्या बाहेर जावे लागेल. आपण पुनितप्रमाणे आपल्या कामात काळाची गरज ओळखून बदल केला तर निश्चितपणे आपल्या व्यवसायात भरपूर पैसा देणारी पाईपलाईन करू शकू. त्याच्या माध्यमातून कमी कष्टात व कमी वेळेत भरपूर लोकांना सेवा देऊन मुबलक पैसा कमावण्याचे आपले व्यावसायिक स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही.

व्यवसायात वारंवार बदल करून पैसे येणाच्या नव्या वाटांचा शोध घेत राहिले पाहिजे. नव्या मार्गाचा वापर करताना त्यासाठी व्यवस्थित यंत्रणा कामाला लावली तर ती यंत्रणा दीर्घकाळ पैसे निर्माण करून देत असते, हे लक्षात ठेवले पाहिजे. अशी काही कामे आपण एकदाच करतो मात्र त्यापासून मिळणारा फायदा कायमस्वरूपी असतो. त्या कामांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाला Passive Income म्हणतात. यामध्ये पैसा निर्माण करण्यासाठी पैशाचा वापर होतो. पैसा निर्माण करण्यासाठी यंत्रणांचा देखील वापर होतो. याउलट व्यक्तिगत कष्टातून येणाऱ्या उत्पन्नाला Active Income म्हणतात. यामध्ये माणूस काम करायचा थांबला की पैसे यायचे बंद होतात. माणसाला अनेक मर्यादा आहेत. पैशाला व यंत्रणेला मर्यादांच्या ऐवजी जास्त संधी आहेत. तेव्हा आपल्या व्यवसायातून Passive Income चे जेवढे जास्तीत जास्त मार्ग निर्माण करता येतील तेवढे करण्यातच उद्योजकाचे कल्याण आहे.

तुम्हाला काही ideas असतील तर नक्की शेअर करा खाली कमेंट box मधे आणि पोस्ट आवडली तर नक्की शेअर करा आपल्या मित्रांसोबत.

Marathi Udyojak

मराठी उद्योजक हा प्रत्येक मराठी उद्योजकासाठी एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. मराठी उद्योजकच्या माध्यमातून आम्ही व्यवसाय, शेअर मार्केट, स्टार्टअप इत्यादी विषयी उपयुक्त माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोहचवत असतो.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *