उद्योजकतास्टार्टअप Story

मल्टीपल बिझनेस कसे करावेत ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now


एकावेळी अनेक उद्योग/व्यवसाय हे मोठे उद्योगसमूह, कंपन्या किंवा उद्योगपतीच करू शकतात असा कोणताही लिखित नियम नाही. लहान व्यावसायिकसुद्धा एका वेळी अशा प्रकारचे अनेक व्यवसाय करू शकतात. आपण कशा पध्दतीने ते मॅनेज करावे हे आपल्याला माहित हवे. त्यासाठी काही नियम पडताळून पहावे.

i) पहिला व मूळ व्यवसाय हा अत्यंत फायदेशीर व चांगला असला पाहिजे. तुमचा जो पहिला व्यवसाय आहे तो अत्यंत चांगल्या पध्दतीने करून तो यशस्वी केला पाहिजे व तो एका अत्यंत मजबूत स्थितीमध्ये आणला पाहिजे.

ii) एकाच वेळी एकापेक्षा अधिक व्यवसाय करण्यासाठी अद्वितीय नेतृत्वगुण व प्रशासकीय कौशल्य तुम्ही स्वत:मध्ये विकसित केले पाहिजे. त्याशिवाय तुम्ही एकाचवेळी एकापेक्षा अधिक व्यवसाय करू शकत नाही.

iii) एकापेक्षा अधिक व्यवसाय करण्यासाठी अत्यंत काटेकोर फायनान्स व अकाऊंट मॅनेजमेंट यंत्रणा तुमच्याजवळ असली पाहिजे. म्हणजे पैसा कसा वापरावा? कोणत्या व्यवसायात किती पैसा गुंतवावा? त्याचा हिशोब कसा ठेवावा? याची काटेकोरपणे अंमलबजावणी तुम्हाला करता आली पाहिजे.

iv) कायद्याची मजबूत चौकट पाहिजे. जसे मोठ्या उद्योगपतींचे अनेक उद्योग चालू असतात. रतन टाटा यांच्या टाटा समुहाच्या अंतर्गत जवळजवळ १५० कंपन्या आहेत. त्यांच्यासारखा वयोवृध्द माणूस इतक्या कंपन्या कशा चालवत असेल? कारण त्यांनी आपले सर्व व्यवसाय/कंपन्या कायद्याच्या मजबूत चौकटीत व्यवस्थित बसवले आहेत. कायद्याच्या मजबूत चौकटीत व्यवसाय असतील तर ते तुम्हाला व्यवस्थितपणे करता येतील.

v) रिपोर्टिंग मेथड पाहिजे. एकापेक्षा अधिक व्यवसाय करताना तुम्ही एक रिपोर्टिंग मेथड/पध्दती अंमलात आणली पाहिजे; म्हणजे तुमचा प्रत्येक व्यवसाय कोण सांभाळतो? कोण काय काम करतो? कोणाकडे काय जबाबदार्‍या आहेत? प्रत्येक व्यवसायात कोणत्या महिन्यात किती विक्री (Sales) झाली? किती उत्पन्न मिळाले? किती फायदा-तोटा झाला? याची एक रिपोर्टिंग पध्दत विकसित करावी लागेल, त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. Continuous watch is very much required.

vi) Monthly Review/मासिक आढावा घेणे आवश्यक आहे. तुमचे एकापेक्षा अधिक व्यवसाय असल्यास प्रत्येक व्यवसायासंबधी प्रत्येक महिन्याला एक मिटींग घेऊन त्याचा मासिक आढावा घेऊन त्याचे Analysis केले पाहिजे. मार्केटमध्ये आपण/आपला व्यवसाय कुठे आहे? आपले व्यवसाय नेमके कुठल्या दिशेने चालले आहेत? कोणता व्यवसाय फायद्यात व कोणता व्यवसाय तोट्यात चाललाय? याचे सखोल अभ्यासपूर्वक विश्लेषण प्रत्येक महिन्यात तुम्ही केले पाहिजे. यासाठी तुम्ही E-CRM व business analysis tools वापरू शकता.

vii) सक्षम पार्टनर/मॅनेजर/व्हेंडर पाहिजे. एकापेक्षा अधिक व्यवसाय यशस्वी करणे हे एकट्याला कधीच शक्य नसते. त्यासाठी कुशल व सक्षम पार्टनर मॅनेजर किंवा व्हेंडरची आवश्यकता असते, त्यांची व्यवस्थित बांधणी करणे तुम्हाला जमले पाहिजे.

viii) व्यवसाय वाढवायचा किंवा एक व्यवसाय चालू असताना दुसर्‍या व्हेंचर मध्ये पाऊल ठेवण्यासाठी चांगल्या गुंतवणुकदारांची (Investor) आवश्यकता असते किंवा स्वतःमध्ये तितकी गुंतवणूकक्षमता पाहिजे.

ix) पूर्ण अभ्यास करा व सुरू करा. कोणत्याही नवीन व्यवसायात जाताना लगेच सुरुवात करू नका. कमीत कमी ३ ते ६ महिने त्या व्यवसाय संकल्पनेचा सखोल अभ्यास करा. त्यात जाण्याची पूर्ण तयारी करा व नंतर हळूहळू त्याची तुम्ही सुरुवात करू शकता.

x) अद्वितीय टाईम मॅनेजमेंट पाहिजे. एकापेक्षा अधिक व्यवसाय करीत असताना कोणत्या व्यवसायासाठी किती वेळ द्यायचा? कोणत्या व्यवसायात किती पोटेन्शिअल आहे? किती फायदा आहे? या सर्व गोष्टी समजून घेऊन त्यानुसार वेळेचे व्यवस्थापन करणे तुम्हाला जमले पाहिजे.

xi) फायदे : तुमच्या मुळ व्यवसायात जर चांगला नफा मिळाला तर तो पैसा बर्‍याचदा वायफळ खर्च करण्यात निघून जातो. उदा. महागड्या गाड्या घेणे, इतर खाजगी ऐशो-आरामाच्या साधनांवर खर्च करणे इत्यादी. म्हणजेच मिळालेल्या नफ्याची योग्य ठिकाणी गुंतवणूक होत नाही; परंतु एका व्यवसायातील नफा नवीन व्यवसायात गुंतवल्यास तो पैसा वाया जात नाही, त्याची योग्य गुंतवणूक होते. त्याचप्रमाणे रिस्क कमी होते. म्हणजे एकापेक्षा अधिक व्यवसाय करताना एखाद्या व्यवसायात तोटा झाला तरी इतर व्यवसायातून नफा मिळणे चालू राहते. एकापेक्षा अधिक व्यवसाय यशस्वीपणे चालू राहिले तर तुमचा एक उद्योग समूह उभा राहतो. एक लहान व्यावसायिक ते एका उद्योगसमुहाचा मालक असा हा मनोरंजक प्रवास तुमच्या वाट्याला येतो. तुमचा फक्त एकच व्यवसाय न राहता तो Group of Business मध्ये रूपांतरित होतो. असे अनेक उद्योग समुह हळूहळू उदयास येत आहेत.


बोध : वॉरेन बफेट यांचे एक वाक्य आहे. ‘मला जर एका मार्गाने १०० रुपये फायदा होत असेल आणि जर १०० मार्गानी प्रत्येकी १-१ रुपया फायदा होत असेल तर मी दुसरा मार्ग निवडेन, कारण एक मार्ग (व्यवसाय) आयुष्यभर निरंतर चालूच राहील याची कोणीच या जगात खात्री देऊ शकत नाही; परंतु १०० मार्गांपैकी काही मार्ग बंद झाले तरी उरलेल्या मार्गांतून पैसा येत राहील.

🎯 व्यवसाय साक्षर व्हा…..

🎯 उद्योजक व्हा……


Credit – Respective Owner

Marathi Udyojak

मराठी उद्योजक हा प्रत्येक मराठी उद्योजकासाठी एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. मराठी उद्योजकच्या माध्यमातून आम्ही व्यवसाय, शेअर मार्केट, स्टार्टअप इत्यादी विषयी उपयुक्त माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोहचवत असतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *