उद्योग मोटिवेशन

झारखंड चे ट्रक ड्रायव्हर राजेश रावानी YouTube वरून आता वर्षाला कमावतात 50 लाख रुपये..!

नमस्कार मित्रांनो आपण आज पहाणार आहोत अताच चर्चेत असणारे झारखंडचे राजेश रावानी यांची सक्सेस स्टोरी.

राजेश हे पेशाने ट्रक ड्रायव्हर आहेत आणि त्यांनी 25 वर्षे ट्रक चालवण्याचं काम केलं आहे. पण असेच बाहेर ट्रक घेऊन गेलास ते व्हिडिओ बनवून ते घरी पाठवाचे त्याचा प्रवास आणि जेवण बनवणेचे व्हिडिओ घरचा ना पण खूप आवडायचे, त्यांचा शिक्षण जास्त नसल्यानं त्यांना यूट्युब विषयी काही जास्त माहिती नव्हती पण त्यांचा मुलांनी तेच व्हिडिओ यूट्यूब वर टाकली आणि काही दिवसात ती व्हिडिओ चांगला प्रतिसाद मिळाला. असा प्रकारे स्वयंपाकाची आवड असल्याने त्यांनी YouTube वर आपल्या स्वयंपाकाच्या कला दाखवायला सुरुवात केली. Rajesh Ravani

त्यांना त्यांच्या प्रवासात अनेक अडचणी आल्या. एका अपघातात त्यांचा हात जखमी झाला होता, पण तरीही कुटुंबाचं पालनपोषण करण्यासाठी आणि घर पूर्ण करण्यासाठी त्यांनी ट्रक चालवणं सुरु ठेवलं. अशा परिस्थितीतून ते पुढे आले आहेत.

2019 मध्ये, त्यांनी पहिलं व्हिडीओ अपलोड केलं ज्याला चांगला प्रतिसाद मिळाला. तेव्हापासून त्यांनी यूट्यूबवर नियमितपणे व्हिडीओ पोस्ट करायला सुरुवात केली आणि त्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. त्यांच्या मुलांनी या यूट्यूब चॅनेलच्या व्यवस्थापनात खूप मदत केली.

यूट्यूबवरच्या यशामुळे राजेश रावानींना ट्रक चालवण्याच्या तुलनेत चांगली कमाई होऊ लागली. ट्रक चालवून ते महिन्याकाठी साधारण ₹25,000 ते ₹30,000 कमावतात, तर यूट्यूबच्या माध्यमातून त्यांना ₹4 लाख ते ₹5 लाख मिळतात. त्यांची सर्वाधिक कमाई एका महिन्यात ₹10 लाख पर्यंत पोहोचली आहे. Rajesh Ravani

राजेश यांनी सांगितलं की, त्यांच्या कुटुंबाचं त्यांच्या यूट्यूब प्रवासात मोठं योगदान आहे. त्यांच्या मुलांनी त्यांचं चॅनेल चालवण्यात मदत केली आणि एकत्र काम करून त्यांनी यश मिळवलं.

सध्या ते लोकप्रिय YouTuber आहेत. त्यांचे 1.98 दशलक्ष पेक्षा जास्त Subscribers आहेत आणि त्यांनी आपल्या यूट्यूबच्या कमाईतून नवीन घर सुद्धा खरेदी केलं आहे.

त्यांच्या मेहनतीमुळे सध्या ते वर्षाला 50 लाख रुपये कमवत आहेत.

असाच नवीन स्टोरी साठी मराठी उद्योजक व्हॉट्स ॲप ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *