पुस्तकांविषयीस्वतःची डेव्हलोपमेंट

इंग्रजी उच्च शिक्षणाचा पाया ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

काही दिवसापूर्वी दहावी आणि बारावी चा निकाल लागला ..ज्यांना चांगले मार्क पडले त्यांना मनापासून अभिनंदन आणि त्यांना पण पुढील वाटचाली साठी हार्दीक शुभेच्छा… सोशल माघ्यमात एक पोस्ट् वाचली ती अशी होती की ज्यांना चांगले मार्क पडले त्यांना डॉक्टर ,शिक्षक ,इंजिनिअर  होण्यासाठी तसेच उच्च शिक्षण घेण्यासाठी  हार्दीक शुभेच्छा आणि ज्यांना कमी मार्क पडले आहेत किंवा जे नापास झाले आहेत त्यांना मंत्री ,आमदार ,खासदार,नगरसेवक होण्यासाठी हार्दीक शुभेच्छा.. असो याच्यावर विचार करा हा आजचा आपला विषय नाही..

 तुम्हाला किती मार्क पडले आहेत आता हे महत्वाचे नाही .जे झाले ते झाले आता पुढील शिक्षणासाठी तुमच्या जवळ काय गुण पाहिजे तसेच कोण काणते कौशल्य् तुमचे विकसित झाले पाहिजे त्याचा विचार करणे गरजेचे आहे .येणाऱ्या काळात तुम्हाला तुमचे चांगले करिअर घडवायचे असेल तर ज्या चारपाच गोष्टी तुमच्या जवळ असणे गरजेचे आहे त्यापैकी एक म्हणजे इंग्रजी विषय बोलण्याचे ,लिहिण्याचे  ,आपले  विचार इंग्रजी मध्ये व्यक्त् करता येण्याचे कौशल्य्.

  खूप जण सल्ला देतील की इंग्रजी नाही आली तरी तू चांगले करिअर घडवू शकतो वगैरे वगैरे ..पण जर इंग्रजी या विषयावर तुमची चांगली पकड असेल तर तुमच्या समोर अनेक संधी उपलब्‍ध होतात. इंग्रजी जर येत नसेल तर पदवी पर्यतंचे शिक्षण कसेतरी तुम्ही पूर्ण कराल पण त्यांच्या नंतर जेव्हा तुम्हाला (टेक्नीकल ) कंपनी मध्ये मुलाखत देण्यासाठी जायचे असते तेव्हा जर तुमची इंग्रजी विषयावर पकड असेल तर मुलाखती मध्ये तुमचा प्रभाव सर्वांपेक्षा जास्त पडतो आणि तुम्हाला  नौकरी मिळवण्याची संधी मध्ये सर्वांच्या तुलनेत जास्त प्राधान्य मिळते ..लवकरात लवकरात लवकर यश मिळवायचे असेल तर लवकरात लवकर  इंग्रजी या विषयावर आपले प्रभूत्व मिळवा..

    जरी इंग्रजी ही आपली मातृभाषा नसेल तरीही सर्व बाजूने  विचार केला तर इंग्रजी शिकण्याशिवाय आपल्या जवळ या घडीला तर पर्याय नाही..

ज्यांना इंग्रजी येत नाही त्यांनी खालील प्रमाणे दररोज इंग्रजीचा अभ्यास करणे गरजेचे आहे..

  • दररोज  नवीन नवीन  शब्द शिकले पाहिजे.किमान १० ते २० शब्द
  • दररोज व्याकरणामधील एक टॉपिक शिकणे गरजेचे आहे
  • मित्राबरोबर इंग्रजी मधून बोलण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे
  • इंग्रजी मध्ये दररोज लिहिण्याचा प्रयत्न् करणे
  • दर्जेदार पुस्तकाचा दररोज वापर करणे गरजेचे
  • न्यूज पेपर वाचणे गरजेचे

याप्रमाणे दररोज  तुम्ही  इंग्रजी चा अभ्यास करणे गरजेचे आहे ..जर या प्रमाणे तूम्ही जर अभ्यास केला तर कंपनी मधील मुलाखत तसेच इतर क्षेत्रातील संधी तुमच्या साठी कायम खूल्या असतील ..

तुमच्या चांगल्या भविष्यासाठी  इंग्रजीचा अभ्यास करणे अनिवार्य आहे..जर आता अभ्यास केला नाही तर पदवी झाल्यावर तुम्हाला शेवटी का होईना इंग्रजी चा अभ्यास करावाच लागतो..

 ज्यांची दहावी ,बारावी झाली आहे तसेच पदवी झाली आहे त्यांच्या साठी सुध्दा मी खालील दिलेली पुस्तके नक्की वाचावी

१ इंग्रजी व्याकरण : बालासाहेब  शिंदे

२ इंग्रजी व्याकरण : एम .जे .शेख

३ इंग्रजी बोला पटकन : अब्दूस सलाम चाउस

इंग्रजी ची मनातील भिती कायमची घालून टाका आणि तुमच्या करिअर मध्ये सुसाट वाऱ्यांसारखे धावा.

आता हा विचार करू नका की आता मला इंग्रजी येईल का नाही ..हे लक्षात ठेवा माणूस हा मरेपर्यंत काहीना काही शिकत असतो..तसेच तुम्हाला पण करावे लागेल .न लाजता न घाबरता इंग्रजी हा  विषय ‍ हातात घ्या आणि उतरा या स्पर्धेच्या युगात..

एक गोष्ट् सांगतो  एक सामान्य् मुलगा ,तुमच्या प्रमाणे त्याला ही इंग्रजी येत नव्हती त्याने पदवी घेतली .पदवी घेताना सुध्दा त्याला विषय समजून घेण्यात खूप त्रास झाला ..शेवटी पाठ करून त्याने पदवी घेतली पण घेतलेले ज्ञान सांगताना त्याला दुस-याला सांगताना इंग्रजी न येत असल्यामुळे अडचण येउ लागली .मग काय हे पण त्याला सहन करावे लागले..शेवटी पदवी घेतली.पण त्याला हा अपमान हा त्रास  सहन होत नव्हता मग त्यांने  निर्धार केला की इंग्रजी हा विषय शिकायचा .मग काय एक दोन वर्षात त्याला  इंग्रजी बोलायला , लिहायला   येउ लागले ..आणि काही वर्षात तो दुसऱ्याला पण इंग्रजीचे धडे देउ लागला आणि त्याने स्व्त:चे क्लासेस ओपन केले..

तात्पर्य काय की इंग्रजी हा विषय कोणी पण कोणत्याही वयामध्ये शिकू शकते पण योग्य वेळेत शिकला तर त्याचा फायदा लवकर तुम्हाला मिळेल  आणि लवकर तुम्हाला यश मिळेल..

 लेखक : राम ढेकणे

Marathi Udyojak

मराठी उद्योजक हा प्रत्येक मराठी उद्योजकासाठी एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. मराठी उद्योजकच्या माध्यमातून आम्ही व्यवसाय, शेअर मार्केट, स्टार्टअप इत्यादी विषयी उपयुक्त माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोहचवत असतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *