मुंबईकर Vithal Kamat आहेत जगभरातील 450 हॉटेल्सचे मालक
Vithal Kamat हे नाव जरी ऐकलं तर आपणा सर्वांची छाती अभिमानाने भरुन येते.
मुंबईतील हॉटेल बिझनेस सर्वाधिक शेट्टी आणि दाक्षिणात्य लोकांच्या हातात. त्यांची मोनोपॉली असलेल्या बिझनेसमध्ये एक मुंबईकर येतो आणि आपल्या वडिलांचे छोटसं असलेल्या हॉटेल्सची चैन देशातील प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आणि आंतरराष्ट्रीय स्तारावर घेऊन जातो. हीच ओळख आहे प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक Vithal Kamat यांची…
आता घेऊया त्यांच्या कार्याचा आढावा! Vithal Kamat यांचा जन्म मुंबईतील ग्रॅंट रोड येथे वास्तव्यास असणा-या कामत या कुटुंबात झाला.
घरची परिस्थिती बेताचीच परंतु कष्ट करुन पोट भरण्यावर कामत कुटुंबियांचा कल.
विठ्ठल कामत यांच्या वडील व्यंकटेश यांचे हॉटेल व्यवसाय होता. विठ्ठल यांच्या आईचेही असेच म्हणने होते की, विठ्ठलनेही मोठे होऊन वडिलांचा व्यवसाय वाढवावा. परंतु, Vithal Kamat यांना हॉटेल व्यवसाय वेगळ्यापद्धतीने मोठा करायचा होता. आपला वडिलोपार्जित व्यवसायाचे नाव जगभरात करायचे होता. दरम्यान, विठ्ठल यांनी आपले इंजिनिअरिंगपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.*हॉटेल इंडस्ट्रीमधील बारकावे शिकण्यासाठी कूकचे काम केले…* वडिलोपार्जित ‘सत्कार’ हे हॉटेल चांगले चालत होते. दरम्यान विठ्ठल यांनी आपल्या आयुष्यातील मोठा निर्णय घेतला आणि तो निर्णय त्यांनी आपल्या बाबांना सांगितला. मला जगभरातील हॉटेल्समध्ये काम करायचे आहे आणि मला हॉटेल व्यवसाय सुरु करण्यापूर्वी प्रॅक्टिकल ज्ञान घ्यायचे आहे. वडिलांनीही विठ्ठल यांच्या निर्णयाला होकार दिला. Vithal Kamat यांनी वेळ न दवडता लंडन गाठले आणि तिथल्या रेस्टॉरंटमध्ये कूक म्हणून नोकरीस रुजू झाले. या कामाचे Vithal Kamat यांना दर आठवड्याला 75 पौंड मिळायचे. त्यांनी येथे कूकसहीत पडेल ते काम केले. जे काम जमत नव्हते त्याचे ज्ञान ग्रहण केले. आणि यातूनच त्यांना हॉटेल व्यवसायातील बारकावे कळत गेले.*हॉटेल एकट्याने कधीच चालत नाही.* टीमवर्कचे चांगले उदाहरण म्हणजे हॉटेलिंग व्यवसाय. मुख्य शेफ, त्याच्या खाली काम करणारे कूक ते हॉटेलमध्ये साफसफाई करणा-या कर्मचा-याला कसे सांभाळणे, टीम कशी उभी करणे, मुख्य म्हणजे हॉटेल मॅनेजमेंटचे धडे कॉलेजमध्ये न घेता Vithal Kamat यांनी देश-विदेशातील हॉटेल्समध्ये काम करुन ते शिकले. आणि हा सर्व अनुभवानिशी पुन्हा भारतात आले. आणि आपला वडिलोपार्जित व्यवसाय वाढविण्याकरीता कामाला लागले.*पहिल्या इको-टेल फाइव स्टार हॉटेल्सची चैन सुरु केली…* भारतात येऊन Vithal Kamat यांनी आपला वडिलोपार्जित व्यवसाय सुरु केला खरा. परंतु, त्यांना हा बिझनेस मोठा करायचे होते, त्या दिशेने त्यांनी प्रयत्न सुरु केले. दरम्यान त्यांन कळाले की सांताक्रुझ एअरपोर्टनजीकचे ‘प्लाझ्मा’ हॉटेल विकायला काढले आहे. विठ्ठल यांनी त्यात रस दाखविला. परंतु, हे हॉटेल विकत घेण्या इतपत आर्थिक त्यांच्याकडे नव्हते. तेव्हा त्यांनी आर्थिक जमवाजमव करुन हे हॉटेल खरेदी केले. त्याच जागेवर देशातील पहिले इको-टेल फाइव स्टार हॉटेल्स सुरु केले. आणि हॉटेलचे नाव ‘ऑर्किड’ असे ठेवले. याच व्यवहारानंतर Vithal Kamat यांचे मोठे हॉटेल उभारण्याचे स्वप्न पूर्ण झाले. याच दरम्यान एक साधारण मुंबईकरही हॉटेल व्यवसाय सुरु करु शकतो, हे सा-यांना कळून चुकले आणि Vithal Kamat प्रसिद्ध झाले.देशात Vithal Kamat यांनी पाहिले इको-टेल फाइव स्टार हॉटेल सुरु केल्यानंतर मागेवळून पाहिले नाही. त्यांनी आपल्या बिझनेसची वाढ फ्रॅन्चायझीपद्धतीने केली. आज देशातील मुख्य राष्ट्रीय महामार्गावर विठ्ठल कामत यांचे हॉटेल आहेत. एवढेच नव्हे तर देश-विदेशातील 450 हून अधिक ठिकाणी या हॉटेल्सच्या बिझनेस विस्तारला आहे. आणि Vithal Kamat हे महाराष्ट्रातील आणि देशातील हॉटेलिंग व्यवसायातील प्रमुख नाव आहे. विठ्ठल कामत यांची बिझनेस कहानी मराठी नवउद्यमींसाठी प्रेरणादायक आहे.https://t.me/marathiudyoajk