स्वतःची डेव्हलोपमेंट

वाढदिवस आपल्या जीवनातील एक आत्मचिंतनाचा दिवस !!

नेहमी प्रमाणे आमची व्हॉलीबाल ची मॅच चालू होती.अचानक शुभम ने भ्रमनध्वनी काढला आणि  भ्रमनध्वनी कानाला लावला आणि म्हंटला ..धन्यवाद . तेव्हा हे ऐकताच सर्वांच्या लक्षात आले की आज शुभम चा वाढदिवस आहे.

मग काय सर्वजणांनी शुभेच्छेचा वर्षाव शुभमवरती केला..आणि मॅच संपल्यानंतर आणि शुभमचा वाढदिवस केक कापून साजरा केला.वाढदिवस आहे आणि फोटो नाहीत अस होइल का या चालू युगामध्ये .त्यामुळे आम्ही पण ५-६ फोटो काढले..केक कापत असताना सवयी प्रमाणे इंग्रजी येत असो व नसो पण शुभेच्छा मात्र आम्ही इग्लिश मध्ये दिल्या.सवय पडली ना काय करणार ..असो

वाढदिवस म्हणजे काय ..याचे उत्तर सर्वसाधरण आपण जास्त विचार करत नाही ..केक कापणे ,पार्टी करणे ,कुठेतरी जेवण करायला जाणे ,काही जण या दिवशी अमली पदार्थाचा सेवन करतात..तर काही जण घरीच काहीतरी आवडीचा पदार्थ करतात,काही जण ‍ फिरायला जातात,काहीना काही या दिवशी करण्याचा प्रयत्न करतात.

पण थोडा विचार केला तर हा ‍ दिवस आपल्या जीवनातील एक आत्मचिंतनाचा दिवस आहे..या दिवशी जीवनातील आपली वाटचाल योग्य दिशेने होत आहे का ,आपल्या जीवनाचे घ्येय काय आहे आणि आपण ते प्राप्त करण्यासाठी आपण भूतकाळात काय केले आणि भविष्य काळामध्ये  ते प्राप्त करण्यासाठी आपले नियोजन काय असायला हवे आणि हे झाल भौतिक जीवनतील घ्येयाचा विचार  तसेच आध्यात्मीक जीवनात आपण किती प्रगती केली आणि आपले या पृथ्वी वर जन्म कशासाठी झाला आहे आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण आध्यात्मिक जीवनात योग्य प्रगती करत आहोत का .याचे  आत्मचिंतन आपण  केले या मध्ये जर आपल्याला वाढ जाणवली तर आपण म्हणू शकतो की हा वाढ दिवस आहे ..नाहीतर आपल्याला असे म्हणावे लागेल की हा घट दिवस आहे ..कारण तुमचे ध्येय प्राप्त करण्यासाठी एक एक दिवस कमी होत आहे ..भौतिक जीवनातील ध्येय तसेच आध्यत्मिक जीवनातील ध्येय असो..

चला तर मग सगळे जण मिळून येणाऱ्या प्रत्येक वाढदिवसाला  आत्मचिंतन करूया  आणि आपल्या जीवनाला एक नवीन दिशा देउया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *