उद्योजकता

कायझेन ह्या पुस्तकाचा परिचय Kaizen book summary in Marathi 

कायझेन ह्या पुस्तकाचा परिचय Kaizen book summary in Marathi 

कायझेन जापनीज मेथड ऑफ ट्रान्स फाॅर्मिग हॅबिटस ह्या पुस्तकाचे लेखन सारा हार्वे यांनी केले आहे.

आपल्या प्रत्येकामध्ये एवढी क्षमता तसेच पात्रता आहे की आपण आपल्या जीवनात आपल्या कुठल्याही वाईट सवयीचा त्याग करून आपल्या जीवनात एक मोठे परिवर्तन घडवून आणु आणू शकतो.

आज आपल्यातील खूप जणांना काही अशा सवयी जडलेल्या आहेत ज्यांच्यापासुन सुटका करून घेणे आपणास खूप अवघड जाते.

आपण खुप ठरवून देखील ती वाईट सवय सोडु शकत नसतो.अशा व्यक्तींकरीता कायझेन हे पुस्तक एक उत्तम पर्याय आहे.

कायझेन ह्या पुस्तकात असे सांगितले आहे की आपण आपल्या कुठल्याही अशा वाईट सवयीमध्ये क्षणार्धात किंवा एका रात्रीत परिवर्तन घडवून आणु शकत नाही.जी सवय आपणास दीर्घकाळापासून लागलेली आहे.

पण आपण आपल्या दैनंदिन जीवनात रोज एक छोटेसे पाऊल उचलुन आपल्या मधील मोठयात मोठ्या वाईट सवयींचा देखील त्याग करून स्वतामध्ये एक मोठे परिवर्तन घडवून आणु शकतो.

कायझेन पुस्तकातुन हे सांगण्यात आले आहे की आपण आपल्या जीवनात घडवून आणलेले एक छोटेसे परिवर्तन देखील आपल्याला मोठमोठे रिझल्ट प्राप्त करून देते.

उदा,एखाद्या व्यक्तीला आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे.स्वताला निरोगी अणि तंदुरुस्त ठेवायचे असेल तसेच वजन कमी करायचे असेल तर ती व्यक्ती याची सुरुवात एका छोट्याशा पाऊलाने देखील करू शकते.

यासाठी ती व्यक्ती रोज सकाळी १० मिनिटे पायी चालु शकते किंवा आपल्या रोजच्या आहारात गोड पदार्थांचा समावेश करणे टाळु शकते.

कायझेन टेक्निक हे आपल्या जीवनात पुर्णतः रूपांतरण घडवून आणण्याचे एक जपानी सिक्रेट तसेच फाॅर्म्युला आहे.

कायझेन टेक्निकचा वापर करून आपण छोटछोटया पाऊलांच्या साहाय्याने आपल्या जीवनातील कोणतेही मोठे ध्येय साध्य करू शकतो.

उदा वजन कमी करणे, स्वताला निरोगी तसेच तंदुरुस्त ठेवणे,व्यवसायात प्रगती करणे,एखादी परीक्षा उत्तीर्ण होणे, एखाद्या वाईट सवयीचा त्याग करणे,इत्यादी 

कायझेन टेक्निक मध्ये आपल्याला सांगितले आहे की जीवनात कुठलेही मोठे ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला छोटे पाऊल उचलणे आवश्यक आहे.

आज आपल्याला मोठे ध्येय साध्य करण्यासाठी दैनंदिन जीवनात मोठमोठी पाऊले उचलणे अवघड जात असते.पण छोटछोटी पाऊले उचलणे आपल्या प्रत्येकासाठी एकदम सोपे असते.

म्हणून आपण कुठलेही ध्येय साध्य करण्यासाठी पहिले छोटे पाऊल उचलणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.कारण हीच छोटछोटी पाऊले आपल्याला जीवनात एक मोठे ध्येय साध्य करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

आज कायझेन ह्या जापनीज मेथडचा वापर करून आपण आपल्या आयुष्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात जसे की आरोग्य,पैसा, नातेसंबंध,करीअर इत्यादी मध्ये परिवर्तन घडवून आणु शकतो.

कायझेन ही जापनीज मेथड अशा व्यक्तींसाठी उपयुक्त ठरते ज्यांना जपानच्या तत्वज्ञान जाणुन घेण्यात रूची बाळगतात.

जे व्यक्ती आपल्या जुन्या वाईट सवयींमध्ये परिवर्तन घडवून आणु इच्छित आहे ज्यांना आपल्या जीवनातील एका विशिष्ट क्षेत्रात सुधारणा घडवून आणायची आहे.पण त्यांना कुठून सुरूवात करावी अणि कशी सुरूवात करावी हेच कळत नाहीये.

ज्या व्यक्तींनी आपल्या दैनंदिन जीवनात अनेक सेल्फ इंप्रूव्हमेंट टेक्निकचा वापर केला पण त्यांना आपल्या वैयक्तिक आयुष्यात त्यामुळे कुठलाही विशेष लाभ प्राप्त झाला नाहीये.

पुस्तकाचा सारांश –

कायझेन मेथड म्हणजे छोटछोटी पाऊले उचलत स्वतामध्ये केलेली एक मोठी सुधारणा.

कायझेन मेथड आपल्याला ह्या गोष्टीसाठी प्रेरीत करते की आपण स्वतामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी वैयक्तिक ध्येय निश्चित करावे.अणि ते ध्येय साध्य करण्यासाठी एक छोटेसे पाऊल उचलुन सुरूवात करावी.

कायझेन मेथड वापर सांगते की आपण आपल्या जीवनातील वेगवेगळ्या क्षेत्रात परिवर्तन घडवून आणायला हवे.

अणि एकावेळी एकच छोट्याशा कामावर लक्ष केंद्रित करून त्यात सुधारणा घडवून आणावी मग दुसरया कामाला सुरुवात करायला हवी.

१)छोटी सुरूवात करणे –

कायझेन मेथड मध्ये सांगितले आहे की आपण आपल्या ध्येयाला रोजच्या छोटछोटया टास्क मध्ये विभाजित करून घ्यायला हवे.

२)रोज प्रगती करणे –

रोज आपण स्वतामध्ये छोटछोटया सुधारणा घडवून आणण्याची सवय लावायला हवी.

म्हणजे काल आपण सकाळी उठल्यावर एक पुश अपस मारली असेल तर आज आपण दोन पुश अपस मारायचा प्रयत्न करायचा आहे.अशा प्रकारे रोज स्वतामध्ये प्रगती घडवून आणायची आहे.

३) स्वताला प्रतिसाद देणे –

आज आपण जे छोटे कार्य केले त्यात काही बदल घडवून आणत आपण अजुन चांगल्या पद्धतीने ते काम करू शकलो असतो का?हा प्रश्न स्वताला विचारायला हवा.

अणि त्याचे उत्तर आपणास हो मिळत असेल तर दुसरया दिवशी त्या कामात त्या पद्धतीचा बदल घडवून आणायचा.

कायझेन मेथडचा वापर आपल्या जीवनातील वेगवेगळ्या क्षेत्रात कसा करायचा?

कायझेन मेथडचा वापर आपण आपल्या जीवनातील कुठल्याही क्षेत्रात करू शकतो.

परिस्थिती कशीही असो कायझेन मेथडनुसार आपल्याला आपल्या समस्येकडे बघायचे आहे.आपल्या जीवनातील लहानात लहान समस्येचे निरीक्षण करायचे आहे.

अणि त्या समस्येचे निराकरण करण्यासाठी आपल्या स्वतामध्ये रोज काही छोटछोटया सुधारणा घडवून आणायच्या आहेत.

जेणेकरून एकेदिवशी ती समस्येचे एकेदिवशी पुर्णतः निराकरण होईल अणि आपल्याला पाहीजे ते ध्येय जीवनात साध्य करता येईल.

कायझेन मेथडचा वापर करून आपण आपल्या जीवनातील फायनान्स, रिलेशनशिप, हेल्थ, करिअर बिझनेस इत्यादी कुठल्याही क्षेत्रातील एक समस्या शोधुन काढायची आहे.

१)आरोग्य:

कायझेन मेथडचा आपल्या आरोग्यासाठी वापर करणे म्हणजे कायझेन मेथडचा वापर करून आपल्या आरोग्यात छोटछोटे सकारात्मक परिवर्तन घडवून आणने होय.

आपल्या आरोग्यात बदल घडवून आणण्यासाठी आपण रोज एक्सरसाईज करायला हवी.एक्सरसाईज मध्ये आपण चालण्यापासून देखील सुरूवात करू शकतो.

रोज कमीत कमी जेवढा वेळ आपल्याला पायी चालता येईल रोज तितका वेळ आपण पायी चालायला सुरुवात करावी.

याचसोबत चांगल्या आरोग्यासाठी आपण आपल्या आहारात हिरवा भाजीपाला,फळे, तसेच दाळी इत्यादी पौष्टिक आहाराचा समावेश करायला हवा.

ह्या दरम्यान आपण फास्टफुडचे तसेच कुठल्याही प्रकारच्या जंकफुडचे सेवण अजिबात करायचे नाही.

ज्या व्यक्तींना कायझेन मेथडचा वापर आपल्या उत्तम आरोग्यासाठी करायचा आहे त्यांनी रोजचा एक डाएट प्लॅन तयार करायला हवा अणि तो फाॅलो करायला हवा.

आवश्यक एक्सरसाईज देखील करायला हवी अणि आपल्या आरोग्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी छोटछोटी पाऊले टाकण्यास सुरुवात करायला हवी.

सुरूवातीला केलेल्या वाॅकिंग डाएटींग मध्ये कालांतराने सुधारणा घडवून आणावी.रोज कमीत कमी ८ तास झोप देखील घ्यायला हवी.

आरोग्यदायी राहण्यासाठी आपण नेहमी निरोगी तंदुरुस्त व्यक्तींच्या सान्निध्यात राहायला हवे.अणि स्वताला नेहमी निरोगी तंदुरुस्त ठेवण्यासाठी काय करायला हवे यासंबंधीची पुस्तके वाचली पाहिजे.

अशाप्रकारे रोज एक एक पाऊल टाकत स्वतामध्ये सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करायचा अणि जोपर्यंत आपण आपल्या आरोग्यविषयक निर्धारित केलेले ध्येय प्राप्त करत नाही.

तोपर्यंत आपण छोटछोटे सकारात्मक अणि आनदाने भरलेले चांगल्या सवयीचे विचार करायला हवेत.

जसजसे आपल्या मनात सकारात्मक सवयीचे विचार निर्माण होतील तसतसे आपल्याला जाणवेल की आपल्या जीवनात यश अणि आनंद द्विगुणित होण्यास सुरुवात झाली आहे.

२) आर्थिक

ज्या व्यक्तींच्या आयुष्यात आर्थिक अडीअडचणी समस्या आहेत ते कायझेन मेथडचा वापर करून आपल्या आर्थिक जीवनात देखील चांगली सुधारणा घडवून आणु शकतात.

यासाठी आपण सुरूवातीला छोटछोटे पाऊल उचलायला हवे.यासाठी दरमहा आपल्या कमाई मधील थोड्या पैशांची आपण बचत करायला हवी.

तसेच थोड्या पैशांची अशा एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करायला हवी जिथून भविष्यात आपल्याला चांगला परतावा मिळेल.

फायनान्स विषयी माहिती प्राप्त करण्यासाठी फायनान्सशिअल मॅनेजमेंट संबंधित पुस्तकांचे वाचन करायला हवे.

अणि आपल्या जीवनात फायनान्स संबंधित छोटछोटया सुधारणा घडवून आणायला हव्यात याने आपल्या जीवनातील आर्थिक समस्या देखील कायमची संपुष्टात येईल.

अणि काही दिवस तसेच वर्षभरात आपल्याला आपल्या निश्चित फायनान्शिअल टार्गेटला देखील साध्य करता येईल.

कायझेन मेथडदवारे पाहीजे तसा रिझल्ट प्राप्त करण्यासाठी आपण नेहमी सकारात्मक, आशावादी अणि कृतज्ञ असणे आवश्यक आहे.

आपण नेहमी स्वताविषयी आपल्या ध्येया विषयी सकारात्मक विचार करायला हवेत.स्वताशी सकारात्मक गोष्टींवर बोलायला हवे.

अणि रोज रात्री झोपण्यापूर्वी त्या सर्व गोष्टींना प्राप्त करण्यासाठी युनिव्हसचे आभार व्यक्त करायला हवेत ज्या गोष्टी आपल्याला जीवनात साध्य करायच्या आहेत.

आपण आशावादीपणे सकारात्मकपणे हा विचार करायला हवा की आपण आपल्याला पाहिजे ती गोष्ट कशी प्राप्त करू शकतो.

३) रोजच्या कामात कायझेन मेथडचा वापर –

कायझेन मेथडचा वापर करून आपण आपल्या कामाच्या ठिकाणच्या वातावरणात देखील एक चांगले परिवर्तन घडवून आणु शकतो.

याचसोबत आपल्या कामात चांगले बनुन आपल्याला पाहीजे तसे रिझल्ट देखील प्राप्त करता येतात.

यासाठी आपल्या कामाच्या ठिकाणी यशस्वी लोकांचे तसेच सकारात्मक विचार असलेले फोटो आपण लावायला हवेत.

आपले आरोग्य नेहमी चांगले राहावे आपल्या आजुबाजुचे वातावरण देखील पर्यावरणास पुरक असावे म्हणून आपण आपल्या कामाच्या ठिकाणी आजुबाजुला वृक्ष लागवड केली पाहीजे.

आपल्या कामात नेहमी सक्रीय राहण्यासाठी विश्रांतीच्या वेळेत छोटछोटे एक्सरसाईज देखील करायला हवे.किंवा तिथल्या तिथे थोडे पायी चालायला हवे.

विश्रांतीच्या वेळेत आपल्यात सकारात्मक अणि आनंदी विचार निर्माण करतील अशा पुस्तकांचे वाचन करायला हवे.

किंवा अशा सकारात्मक विचार असलेल्या व्यक्तींसोबत संवाद साधला पाहिजे.ज्यांच्याशी चर्चा केल्यावर आपल्याला आपण अधिक आनंदी अणि सकारात्मक असल्याचे जाणवते.

आपल्या डोक्याला नेहमी शांत ठेवण्यासाठी दुपारच्या जेवणानंतर विश्रांतीच्या काळात पाच ते दहा मिनिटे मेडिटेशन करायला हवे.

याकरिता आपण दुपारच्या जेवणानंतर एखाद्या शांत ठिकाणी डोळे बंद करून पाच मिनिटे बसायला हवे.

एवढेच नव्हे तर आपण मेडिटेशनला बसण्या अगोदर आपल्या मोबाईल मध्ये पाच ते दहा मिनिटांचा अलार्म देखील लावू शकतो.

याचसोबत आपले काम करण्यासोबत आपल्या वर्क लाईफ बॅलन्स मध्ये देखील संतुलन ठेवायला हवे.कामासोबत आपल्या फॅमिली, हेल्थ,हाॅबी, इत्यादी गोष्टींना देखील पुरेसा वेळ द्यायला हवा. 

म्हणजे आपल्याला आपले काम करताना कंटाळवाणे वाटत नाही.याने आपल्या मेंदुत हॅपी हार्मोन्स तयार होत असतात ज्याने काम करताना आपल्याला आपण अधिक प्रोडक्टीव्ह अणि फोकस असल्याचे जाणवेल.

अशा पद्धतीने कायझेन मेथडचा वापर करून आपण आपल्या जीवनातील कुठल्याही क्षेत्रात सुधारणा घडवून आणु शकतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *