Trending

GOVERNMENT OF MAHARASHTRA : फळपिके, फुलपिके व बांबू लागवड अनुदानासाठी अर्ज करा…….!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

GOVERNMENT OF MAHARASHTRA : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड योजना सन २०२४-२५ मध्ये समाविष्ट फळपिके, फुलपिके व बांबू लागवडीसाठी, तसेच सलग क्षेत्रावर फळबाग लागवड, बांधावर फळझाडे लागवडीसाठी संबंधित गावाचे कृषी सहायकांकडे अर्ज करावा……..!

अनुदानासाठी अर्ज करा…….!

बारामती: महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड योजना सन २०२४-२५ मध्ये समाविष्ट फळपिके, फुलपिके व बांबू लागवडीसाठी, तसेच सलग क्षेत्रावर फळबाग लागवड, बांधावर फळझाडे लागवडीसाठी संबंधित गावाचे कृषी सहायकांकडे अर्ज करावा. असे आवाहन प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी सुप्रिया बांदल यांनी केले आहे.

सावकाराने हडप केलेली जमीन परत कशी मिळवायची ?

वाचा सविस्तर…….!

GOVERNMENT OF MAHARASHTRA

बारामती: महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड योजना सन २०२४-२५ मध्ये समाविष्ट फळपिके, फुलपिके व बांबू लागवडीसाठी, तसेच सलग क्षेत्रावर फळबाग लागवड, बांधावर फळझाडे लागवडीसाठी संबंधित गावाचे कृषी सहायकांकडे अर्ज करावा. असे आवाहन प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी सुप्रिया बांदल यांनी केले आहे.

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत लागवडीस बारामती २४० हेक्टर, इंदापूर २३० हेक्टर, दौंड – २२२ हेक्टर व पुरंदर २२० हेक्टर असे एकूण ९१२ हेक्टरवर फळपीक, फुलपीक व बांबू लागवडीसाठी परवानगी देण्यात आलेली आहे……..!

पावसामध्ये बाइकवर लेकरांना किती भिजवणार ?

1.35 लाख रुपये कमी देऊन tataची शानदार कार आणा घरी..!

क्षेत्र परिस्थितीनुसार लागवडीचे अंतर कमी-जास्त करण्यास परवानगी आहे, परंतु देय अनुदान फळपीक लागवडीचे निकष, विद्यापीठ शिफारशीनुसार अंतर मर्यादेतच देय राहील. अतिरिक्त कलमे, रोपे यांचे अनुदान दिले जाणार नाही.

लागवड वर्षासह सलग ३ वर्षांत मंजूर अंदाजपत्रकानुसार अनुदान देय राहील. दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी बागायती फळपिकांकरिता जे लाभार्थी ९० टक्के फळझाडे जिवंत ठेवतील व कोरडवाहू फळपिकांचे ७५ टक्के फळझाडे जिवंत ठेवतील, अशाच लाभार्थ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचे अनुदान देय राहील.

शेळीपालनासाठी सरकारची नवीन योजना,

पाहा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ………!

वैयक्तिक बांधावरील फळपिके लागवडीसाठी हेक्टरी २० रोपे या मर्यादेत ही योजना राबविण्यात येते………!

प्रति लाभार्थी क्षेत्र मर्यादा कमीतकमी ०.०५ हेक्टर व जास्तीतजास्त २.०० हेक्टर आहे. इच्छुक लाभधारकाच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे. सातबारावर कुळाचे नाव असल्यास कुळाची संमती आवश्यक राहील……..!

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जाती, दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींना, तसेच अल्प व अत्यल्प, महिला लाभार्थी, दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य देण्यात येईल. लाभार्थी ग्रामपंचायतीचे जॉबकार्डधारक असावा, असे लाभार्थी निवडीचे निकष आहेत, अशी माहिती बांदल यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *