Trending

Tata Motors Cars : पावसामध्ये बाइकवर लेकरांना किती भिजवणार? 1.35 लाख रुपये कमी देऊन tataची शानदार कार आणा घरी..!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Tata Motors Cars : टाटा मोटर्स शक्तिशाली वाहनांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. या कंपनीच्या कारमध्ये जबरदस्त सेफ्टी फीचर्स आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांत या कंपनीच्या गाड्यांना विविध सेगमेंटमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. दमदार वाहनांच्या निर्मितीसाठी टाटा मोटर्स विशेष प्रसिद्ध आहे. या कंपनीच्या गाड्यांमध्ये जबरदस्त सेफ्टी फीचर्स आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये या कंपनीच्या विविध सेगमेंटमधल्या कार्सना चांगली लोकप्रियता मिळालेली आहे. अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने एक विशेष ऑफर आणली आहे. Tata Motors Cars

येथून इलेक्ट्रिक कारची किंमत तपासा …….!

टाटा मोटर्स या जूनमध्ये आपल्या गाड्यांवर एक्स्चेंज बेनिफिट्स, कॉर्पोरेट ऑफर आणि ‘ग्रीन बोनस’ यासह आकर्षक सवलती देत आहे. इलेक्ट्रिक व्हेइकल्सची निवड करणाऱ्या ग्राहकांसाठी ग्रीन बोनस ही एक प्रोत्साहनपर ऑफर आहे. नेक्सॉन ईव्ही, टियागो ईव्ही आणि पंच ईव्हीच्या खरेदीवर ग्राहकांना लाखो रुपयांची बचत करता येणार आहे. बचतीची रक्कम ठिकाण आणि वाहनांची उपलब्धतात यानुसार वेगवेगळी असेल.

शेळीपालनासाठी सरकारची नवीन योजना,

पाहा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ………!

Tata Nexon EV 

टाटा नेक्सॉन ईव्ही : 2023 या वर्षात उत्पादन झालेल्या टाटा नेक्सॉन ईव्ही या महिन्यात 1.35 लाख रुपयांपर्यंतच्या सवलतींसह उपलब्ध आहे. 2024 या वर्षात उत्पादन झालेल्या नेक्सॉन ईव्ही क्रिएटिव्ह + मिड रेंज व्हॅरिएंट सोडून इतर सर्व नेक्सॉन ईव्हीवर 85 हजार रुपयांपर्यंत सूट देण्यात आली आहे. या गाडीची एक्स शोरूम किंमत 14.49 लाख ते 19.49 लाख रुपये आहे. मिड रेंज व्हॅरिएंटमध्ये 30kWh बॅटरी मिळते. ती 325 किलोमीटरपर्यंतची ARAI-प्रमाणित रेंज देते. नेक्सॉन ईव्ही एलआर 465 किलोमीटर रेंज देते. या कारमध्ये 40.5kWh क्षमतेची बॅटरी मिळते.

कोणाकडेही हात पुढे करण्यापेक्षा SBI कडून कर्ज घेणे चांगले, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया ,

कर्ज घेणे सोपे झाले आहे……..!

Tata Tiago EV

टाटा टियागो ईव्ही : 2023 या वर्षात उत्पादन झालेल्या सर्व व्हॅरिएंटमधल्या मॉडेल्सच्या खरेदीवर या महिन्यात 95 हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. 2024 या वर्षात उत्पादन झालेल्या टियागो ईव्हीचं लाँग-रेंज व्हॅरिएंट 75 हजार रुपयांपर्यंतच्या सवलतींसह ऑफर केलं जात आहे. गेल्या महिन्यात या कारवर 52 हजार रुपयांची सवलत मिळत होती, तर मिड-रेंज व्हॅरिएंटवर 60 हजार रुपयांची सवलत मिळत होती. टियागो ईव्हीची एक्स शोरूम किंमत 7.99 लाख ते 11.89 लाख रुपयांपर्यंत आहे.

Tata Punch EV

टाटा पंच ईव्ही : या महिन्यात 10 हजार रुपयांपर्यंतच्या सवलतींसह ऑफर केली जात आहे. कंपनीच्या इतर ईव्हीजवर मिळणाऱ्या सवलतीच्या तुलनेत पंचवर कमी सवलत मिळत आहे.

ही इलेक्ट्रिक एसयूव्ही दोन बॅटरी पॅक पर्यायांसह उपलब्ध आहे. त्यापैकी 25kWh क्षमतेचं युनिट 315 किलोमीटरपर्यंतची रेंज ऑफर करते, तर 35kWh क्षमतेचं युनिट 421 किलोमीटर्सपर्यंतची रेंज देते. पंच ईव्हीची एक्स शोरूम किंमत 10.99 लाख ते 15.49 लाख रुपये आहे.

Marathi Udyojak

मराठी उद्योजक हा प्रत्येक मराठी उद्योजकासाठी एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. मराठी उद्योजकच्या माध्यमातून आम्ही व्यवसाय, शेअर मार्केट, स्टार्टअप इत्यादी विषयी उपयुक्त माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोहचवत असतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *