समाजकारण

पैसा पूढे कायदा सुध्दा सौम्य् झाला..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

भारतीय राज्यघटनेमुळे आपल्याला भेटलेल्या स्वातंत्र्याचा वापर करून काही जणांनी त्यांच्या  जीवनात भरपूर प्रगती केली .या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेण्याच्या संख्येत सुध्दा खूप वाढ झाली .त्याचेच एक उदाहरण म्हणजे पक्षांतर करण्याचे स्वातंत्र्य.

 १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले त्याच्या नंतर चा काही काळ सोडला तर  पक्षाच्या विचारावर निवडून यायचे ,आपले अस्तित्व्  निर्माण करायचे ,लोकांची मने जिकांयचे ,भरपूर प्रगती करायची ,२-३ वेळेस आमदार ,खासदार बनल्या नंतर अचानक पक्षाच्या नेतृत्वाबदद्ल तसेच पक्षाच्या धोरणाबद्दल शंका निर्माण करायची आणि पक्षाला सोडून इतर पक्षात जायचे ‍किंवा स्व्त:चा पक्ष स्थापन करायचा अशा घटनेची संख्या प्रचंड आहे.

  मग काय याचा सगळया पक्षाला धोका निर्माण होउ लागला म्हणून त्यांनी पंक्षातर बंदी कायदा आमलात आणला .आणि काही मर्यादा आमदार ,खासदार यांच्यावर आल्या..५२ वी घटनादुरस्ती १९८५ करून  पक्षांतर बंदी कायदा आणला.एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आल्यावर दुसऱ्या पक्षात जाण्यास मर्यादा घालण्यात आल्या..जर एखादया पक्षातले १/३ एक तृतीयांश जर दुसऱ्या पक्षात जात असतील तर पक्षांतर बंदी कायदा नुसार त्यांची आमदारकी ,खासदारकी ला घक्का लागणार नाही..ते पुढे ही आमदार राहतील,खासदार राहतील.

      पण या कायदयाचा परिणाम उलटा झाला ,एक आमदार,खासदार पक्ष सोडून पहिले जात होते आता तर ते गट करून दुसऱ्या पक्षात जाउ लागले..म्हणजे या कायद्याचा फायदा होण्यापेक्षा तोटाच जास्त होउ लागला.१/३ ही अट थोडीशी सौम्य वाटु लागली .कारण १/३ आमदार ,खासदार ही संख्या कमी असल्यामुळे सर्वजण गट करून दुसऱ्या पक्षात जाउ लागले..

त्यासाठी परत एकदा या पक्षांतर बंदी कायदात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला ..आली ती अट म्हणजे १/३ ऐवजी २/३ आमदार,खासदार एकत्र आले तर ते पक्षांतर करू शकता ..

९१ वी घटनादुरस्ती २००३ ला करून त्यामध्ये २/३ सदस्यांची अट टाकण्यात आली..आता पक्षांतर करणे कठीण होउन बसले.कारण एवढा मोठा समूह एखाद्या पक्षातून बाहेर पडणे जवळपास अशक्यच गोष्ट होती..त्याचा परिणाम आमदार ,खासदार त्या पाच वर्ष तरी त्या पक्षाबरोबर एकनिष्ठ राहू लागले.याच्या मुळे स्थिर सरकार येउ लागले .

पण महाराष्ट्रातील आमदार ,खासदारांनी या कायदयाची २/३ तृतीयांशाची अटीचे मर्यादा ओलांडू दाखवली. अवघड वाटणारे कार्य सफल करून आपला वेगळा गट निर्माण केला ..

याच्या मागे नक्कीच प्रचंड राजकारणात निर्माण होणारा पैसा जबाबदार आहे..एकनिष्ठेला सुध्दा खरेदी करेल एवढा पैसा राजकारणात निर्माण झाला आहे.एखादी पक्षातील २/३ तृतीयांश आमदार दुसऱ्या पक्षात जात असतील तर हे लोकशाही धोकयात आली आहे हे आपल्याला मान्य करावे लागेल..दुसरी बाजू पण आपल्याला विचारात घ्यावी लागेल की त्यांच्या भागाचा विकास होत नाही,निधी कमी पडत असेल ,त्यांनी उचलेले पावलाचे आपल्याला स्वागत करावे लागेल.. मला तरी ही येथे हेच मनावे लागेल पैशा पूढे कायदा सुध्दा झाला सौम्य्.  लेखक : राम ढेकणे

Marathi Udyojak

मराठी उद्योजक हा प्रत्येक मराठी उद्योजकासाठी एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. मराठी उद्योजकच्या माध्यमातून आम्ही व्यवसाय, शेअर मार्केट, स्टार्टअप इत्यादी विषयी उपयुक्त माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोहचवत असतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *