उद्योग मोटिवेशनउद्योजकता

शून्यातून शिखरापर्यंत : एका लहानशा दुकानापासून झाली एमडीएच ची सुरुवात…!!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

एमडीएच म्हणजे ‘महाशियां दी हट्टी’… याचा सरळ अर्थ आहे प्रतिष्ठित माणसाचे दुकान. श्रीमान धर्मपाल गुलाटी यांनी ती प्रतिष्ठा कमावली. तिचा दावा त्यांच्या पित्याने आपल्या दुकानासमोर लावलेल्या बोर्डवर केला होता.

धर्मपाल यांचे वय ९५ वर्षे आहे. वयाच्या १५ व्या वर्षापासून व्यवसायाचा अनुभव. त्यांचे वडील आरशांचा व्यवसाय करायचे. १९३७ ची गोष्ट. त्यांच्या वडिलांनी साबण, कपडे आणि लाकडाचा व्यवसायही करून पाहिला. १९४७ उजाडेपर्यंत धर्मपाल यांच्याकडे अपयशाचा भरपूर अनुभव जमला. फाळणीमुळे ते पाकिस्तानच्या सियालकोटमधून अमृतसरच्या विस्थापितांच्या शिबिरात पोहोचले. मग त्यांना दिल्लीत घर मिळाले. तेथे ना वीज होती ना पाणी ना शौचालय. खिशात वडिलांनी दिलेले १५०० रुपये. धर्मपाल यांनी ६५० रुपयात टांगा घेतला. २ आण्यात ते प्रवाशांना सेवा देऊ लागले. २०१६ साली याच सीईओंनी जवळपास २१ कोटी रुपये वेतन घेतले, जे एमडीएचच्या वर्षाच्या २१३ कोटी रुपयांच्या दहा टक्के इतके होते. 

  • एमडीएचची ८० टक्के भागीदारी धर्मपाल यांच्याकडेच आहे. ६० वर्षांपूर्वी एमडीएचची सुरुवात दिल्लीच्या अजमल खान रोडवर छोट्याशा दुकानाच्या रूपात झाली. गुणवत्ता आणि प्रामाणिकपणाच्या बळावर त्यांनी पावले टाकली. दुकाने थाटत गेले. लवकरच दिल्लीत मसाल्यांचा कारखाना सुरू केला. भारतीय मसाला बाजारात ही कंपनी दुसऱ्या स्थानी आहे. तिची हिस्सेदारी जवळपास १२ टक्के आहे. क्रमांक एकवर एव्हरेस्ट मसाले आहे. एमडीएचचे १६०० कोटी रुपयांचे साम्राज्य आहे. देशभरत जवळपास १५ कारखाने आहेत. एक हजार डीलरच्या माध्यमातून त्यांची उत्पादने घरोघरी पोहोचतात. दुबई आणि लंडनमध्येही एमडीएचची कार्यालये आहेत. १०० हून जास्त देशात ते उत्पादने वितरित करतात.एमडीएचकडे जवळपास ६२ उत्पादने आहेत. जी १५० प्रकारच्या पॅकेजमध्ये मिळतात. कंपनीने काही चॅरिटेबल संस्था अाणि रुग्णालये सुरू केली आहेत. २० शाळाही सुरू केल्या आहेत, ज्यात गरिबांची मुले शिकतात.

Marathi Udyojak

मराठी उद्योजक हा प्रत्येक मराठी उद्योजकासाठी एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. मराठी उद्योजकच्या माध्यमातून आम्ही व्यवसाय, शेअर मार्केट, स्टार्टअप इत्यादी विषयी उपयुक्त माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोहचवत असतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *