ई-कॉमर्सउद्योग मोटिवेशनउद्योजकताबातम्यासुविचारस्टार्टअप Storyस्वतःची डेव्हलोपमेंट

उद्योजगांच्या व्यवसाय करताने होणाऱ्या ७ चुका.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो व्यवसाय सुरु करताना फक्त यश्याच्या गोष्टी न वाचता उद्योजकांनी अनुभवलेल्या अपयश आणि अडचणी समजून घेणे फार महत्वाचे आहे.

एखादा उद्योग जेव्हा आपण सुरुवात करण्याचा विचार करतो किंवा खऱ्या अर्थाने वास्तविक सुरू करतो तेव्हा बाकी उद्योजकांच्या यशाशी संबंधित बर्‍याच गोष्टी किंवा लेख वाचतो. हे अजिबात वाईटहि नाही परंतु फक्त यशाच्या मंत्राचे अनुसरण करणे हा केवळ यशस्वी होण्याचा एकमात्र मार्ग नाही. म्हणूनच उद्योजकांनी अनुभवलेल्या अपयश आणि अडचणी समजून घेणे फार महत्वाचे ठरते, मी आणि माझ्या मित्रांनी अशाच एका सुरु केलेल्या आणि अपयशी झालेल्या उद्योगाविषयी आणि आमच्या उपयशात झालेल्या चुकानबद्दल मी आज बोलणार आहे, आमच्या उपयशाची करणे मी खाली दिली आहेत प्रत्येक उद्योजकाणे त्यांचा उद्योजकीय प्रवास सुरू करताना खालील गोष्टी लक्षात नक्की ठेवाव्यात.

१. गेममध्ये रहा (Be In The Game)

मी व माझ्या मित्रांनी २०१५-१६ साली पुण्यामध्ये Ezzyserve.com ची स्थापना केली, ज्यामध्ये ऑनलाईन प्लंबर, कार्पेन्टर, लाउंद्रीवाला ह्यांना आम्ही डायरेक्ट ग्राहकांशी जोडले होते . हे असे एक क्षेत्र होते जिथे २०१५-१६ मध्ये मोठ्या संख्येने उद्योग सुरु झाले होते .परंतु काहीजण व्यवसायामध्ये पुढे गेले तर काहींचे उद्योग बंद पडले . नुकताच सुरु झालेला आमचा व्यवसाय पण अयशस्वी झाला कारण मी अजूनही माझ्या दिवसाच्या नोकरीवर आणि अर्धवेळ माझ्या स्टार्टअपवर लक्ष केंद्रित करत होतो. बरेच लोक म्हणतात की आपल्या व्यवसायातुन चांगला इनकम होईपर्यंत नोकरी सोडू नये आणि हि गोस्ट बरोबर हि होती आणि म्हणूनच मी माझ्या नोकरीत अडकलो आणि त्याचा आमच्या स्टार्टअपवर निश्चितच परिणाम झाला. .
मी म्हणत नाही तुम्ही लगेच जॉब सोडा पण जॉब सोडण्याची तयारी नक्की ठेवा.

आमच्या उद्योगामध्ये माझे कामी हे वेब आणि Android अँप करण्यासाठी इनपुट देणे हे होत आणि आमची डेव्हलोपमेंट टीम हि पुण्यात केली होती . मी मुंबईत काम करायचो आणि आठवड्याच्या शेवटी फक्त पुण्याला जायचो आता मी विचार करतो की आम्ही तीच टीम मुंबईत बनवली असती तर मी अधिक वेळ आणि इनपुट देऊ शकलो असतो आणि त्याचा आम्हाला नक्की फायदा झाला असता.आपल्या मराठी मध्ये एक म्हण आहे उंटावरून शेळ्या हाकायला नाही पाहिजेत, तसे मला इथे वाटते कि जो कोणी व्यवसाय सुरु करत असेल त्याने टीम मध्ये राहून काम करायला पाहिजे दुरून जास्त चांगली कामे होत नाहीत.

२. टीम खूप महत्वाची (Team Plays All)

आमच्या स्टार्टअपचा एक आधारस्तंभ म्हणजे आपचे अँप आणि website. आजकाल न सांगता एक नियम बनला आहे की जर टेक बॅकग्राउंडमध्ये स्टार्टअप करत असाल तर आपल्याकडे टेक बॅकग्राउंडचा एखादा सहकारी-संस्थापक असावा जेणेकरून गोष्टी विकसित करणे सोपे होईल आणि तुमच्या प्रॉडक्ट वर तुमची पकड चांगली होईल.

३. योग्य गुंतवणूकदारांकडं लक्ष देणे तेवढेच महत्वाचे जेवढे योग्य ग्राहकांकडे. (Targeting the right customers also target the right investors)

उद्योगदरम्यान, आम्हाला वाटले की आम्ही योग्य ग्रहांकावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि ते बरोबर हि आहे. परंतु योग्य गुंतवणूकदारावर लक्ष केंद्रित करणे हे देखील अत्यंत निर्णायक बनले आहे. आम्ही आमची स्टार्टअप तीन गुंतवणूकदारांना दाखवली पण त्यापैकी कोणीही प्रतिष्ठित गुंतवणूकदार नव्हता किंवा आमच्या व्यवसाय विषयी कुणालाही फारशी माहिती नव्हती . त्यामुळे आम्हला असे वाटले कि आमच्या आईडिया मध्ये दम नाहीय. आता इतर स्टार्टअप्स ज्यांनी योग्य गुंतवणूकदारांवर लक्ष केंद्रित केले त्यांनी मोठी झेप घेतली. म्हणूनच योग्य ग्राहक तसेच योग्य गुंतवणूकदारांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

४. ओरिजनल राहा (Be Orignal )

प्रत्येक स्टार्टअप संस्थापकाला माहित असले पाहिजे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. उत्पादन विकसित करताना, आपले प्रतिस्पर्धी काय करत असतील आणि आपण पण तेच करणे योग्य नाही .आपण प्रतिस्पर्ध्यांकडील गोष्टी कॉपी करण्याऐवजी नवीन गोष्टी डिव्हलोप केल्या पाहिजेत आणि बाजाराचा ताबा घेतला पाहिजे.

५. कार्यक्षमता आणि ऑप्टिमायझेशन ( Efficiency and optimization )

प्रत्येक स्टार्टअप संस्थापकाने त्याच्याकडे असलेल्या संसाधनांवर लक्ष केंद्रित करणे खूप आवश्यक आहे. वेळ, पैसा, उर्जा या सर्वांचा प्रभावीपणे स्टार्ट-अपच्या वाढीसाठी उपयोग झाला पाहिजे. आपणास असलेले संपर्कसुद्धा वेळेवर आणि प्रभावीपणे कसे वापरावे ह्याचा विचार केला पाहिजे.

६. मालकी वाटा बघू नका(Don’t look for the share )

उद्योहकांची सर्वात मोठी चूक म्हणजे उद्योगामध्ये वाटा पाहणे. तसे केले तर वेगळ्या ठिकाणी फोकस जाऊ शकते तसेच उद्योजकांमध्ये आपापसात खूप गैरसमज निर्माण होऊ शकतात. मालकी हक्कावर एवढापण फोकस अजिबात शोधू नका. यशस्वी स्टार्ट-अपमध्ये 1% असणे हे अयशस्वी स्टार्टअपमध्ये 100% असण्यापेक्षा चांगले आहे.

७. अकाउंट बुकचे मास्टर व्हा ( Be a master of the account book )

पैसा हा कोणत्याही व्यवसायाचा कणा असतो आमच्याकडे पहिल्यांदा चांगल्या ऑर्डर्स होत्या आणि त्या दिवसेंदिवस वाढतच होत्या पण आमची नेमकी चूक म्हणजे आम्ही आमचे खाते नीट ठेवले नाही.
आणि त्याचा परिणाम हा आमच्या उद्योगावर झाला. जेव्हा आपण एखादा उद्योग सुरु करतो त्त्यावेळेस बारकाईने आणि काटकसरीने पैशाचे म्यानेजमेंट हे खूप महत्त्वाचे असते आणि ते आपण योग्य रीतीने मेंटेन केले पाहिजे .असलेला पैसा कुठे आणि कसा वापरायचा त्याचा प्लान असणे खूप महत्त्वाचे आहे जर हा प्लान नसेल आणि आपण प्लॅन न करता कुठेही पैसे टाकत असु तर त्याचा रिझल्ट आपल्याला वाईट येईल आणि आपल्याला नक्कीच कुठे ना कुठेतरी नुकसान सोसावे लागेल म्हणूनच छोटा छोटा पण पैसा कुठे जातोय हे बघणे खूप महत्त्वाचे आहे.
म्हणतात ना एक छोटासा छिद्र मोठ्या जहाज बुडू शकते तसेच छोटे पैशाचे लिक आपल्या उद्योगाला बुडवू शकते.

आमच्या उपयशामध्ये हे प्रमुख कारणे होतीच पण ह्या पलीकडे पन एक मोठे कारण होते ते म्हणजे आम्ही खूप लवकर Give up केले. आता मी आणि माझा मित्र किंवा पार्टनर आमच्या एरिया मध्ये वाढणार्‍या स्टार्ट अप बद्दल बोलतो त्यावेळी असे वाटते कि आपण जर आपल्या आयडिया वर आणि स्वतःवर विश्वास ठेवला असता तर आम्ही नक्कीच यशस्वी झालो असतो.

हे आर्टिकल मी yourstory.com वर हि प्रकाशित केली आहे ती तुम्ही इथे वाचू शकता.

आपण आपला उद्योजकीय अनुभव नक्की पाठवा आणि कंमेंट मध्ये हा लेख तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *