ई-कॉमर्सउद्योग मोटिवेशनउद्योजकतास्टार्टअप Story

ई-कॉमर्स म्हणजे काय? ई-कॉमर्स चे प्रकार आणि ई-कॉमर्स ही नवी संधी

ईकॉमर्स हि नवीन जगाची उद्योग संधी आहे, हि एक नवीन व्यापार करण्याची संधी आहे आणि आज आपण त्याबद्दल बोलणार आहोत . नेमके ईकॉमर्स म्हणजे काय त्याचे प्रकार आणि ईकॉमर्स द्वारे आपण कसे पैसे कमवू शकतो.


आपल्यापैकी बर्याच जणांनी ई-कॉमर्सची व्याख्या वाचली किंवा ऐकली असेलच किंवा फ्लिपकार्ट, Amazon बद्दल तरी ऐकले असेलच, आपल्यापैकी बर्‍याच जणांनी तर या वेबसाइट्स वरून खरेदीही केली असेल म्हणूनच ई-कॉमर्स म्हणजे इंटरनेट वर केली खरेदी किंवा विक्री. त्या खरेदी विक्री मध्ये कोणतीही वस्तू किंवा सेवा असू शकते म्हणजेच फोन, टी-शर्ट किंवा बुक्स यासारखे एखादे उत्पादन असू शकते किंवा सिनेमा/ विमानाचे तिकीट काढण्यासारखी एखादी सेवा असू शकते.

म्हणजेच फ्लिपकार्ट किंवा ऍमेझॉन वर इंटरनेट द्वारे एखादे उत्पादन खरेदी करणे म्हणजे ईकॉमर्स आहे किंवा BookMyShow वर चित्रपटाचे तिकीट खरेदी करणे हे देखील एक ईकॉमर्स आहे.

आता आपण ईकॉमर्स चे प्रकार पाहुयात.

ईकॉमर्स व्यवसायाचे मुख्य चार प्रकार आहेत आणि ते खालिलप्रमाणे,

१. व्यावसायिक ते ग्राहक ईकॉमर्स (Business to Consumer (B2C)):

जेव्हा एखादा व्यवसाय/संस्था एखाद्या व्यक्तीस एखादी वस्तू किंवा सेवा विकते त्या प्रकारच्या ईकॉमर्स ला बी ते सी ईकॉमर्स म्हणातात. म्हणजेच व्यवसाय ते ग्राहक ईकॉमर्स.

उदा. आपण फ्लिपकार्ट किंवा ऍमेझॉन वरून मोबाईल फोन खरेदी करणे हे व्यावसायिक ते ग्राहक ईकॉमर्सचे उदाहरण आहे.

ह्या मध्ये ऑनलाईन पोर्टल वर विविध सेलर्स असतात जे आपल्याला सेवा किंवा वस्तू विकत असतात म्हणजेच व्यवसाय ते ग्राहक इ- कॉमर्स.

२. व्यवसाय ते व्यवसाय ईकॉमर्स (Business to Business (B2B)): 

दुसरा प्रकार आहे व्यवसाय ते व्यवसाय .जेव्हा एखादा व्यवसाय दुसर्‍या व्यावसायाकडून एखादे उत्पादन किंवा सेवा खरेदी करतो त्या वेळेस त्या प्रकारच्या ईकॉमर्स ला व्यवसाय ते व्यवसाय ईकॉमर्स ( B2B) असे म्हणतात.

उदा. व्यवसाय इतर व्यवसायांच्या वापरासाठी सॉफ्टवेअर किंवा सामानाची विक्री करते.

३. ग्राहक ते ग्राहक ईकॉमर्स (Consumer to Consumer (C2C)):

जेव्हा एखादी व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीकडे एखादे उत्पादन किंवा सेवा विकते त्या प्रकारच्या ईकॉमर्स ला ग्राहक ते ग्राहक ईकॉमर्स असे म्हणतात

उदा. आपण आपला जुना मोबाइल OLX वर दुसऱ्या व्यक्तीला विकणे ह्या प्रकारचा ईकॉमर्स म्हणजे ग्राहक ते ग्राहक ईकॉमर्स.

४. ग्राहक ते व्यवसाय ईकॉमर्स (Consumer to Business (C2B)):

जेव्हा एखादी व्यक्ती आपली उत्पादने किंवा सेवा, व्यवसाय किंवा संस्थेला विकते त्या प्रकारच्या ईकॉमर्स ला ग्रहाला ते व्यवसाय ईकॉमर्स असे म्हणतात.

उदा. एखादा फोटोग्राफर जेव्हा त्याचा फोटो एखादया व्यवसायाला विकतो तेव्हा त्या प्रकारच्या ईकॉमर्स ला ग्राहक ते व्यवसाय ईकॉमर्स असे म्हणतात.

आता आपण ईकॉमर्समध्ये व्यवसाय कसा सुरू करू या याबद्दल चर्चा करू.

आपण आपला जुना व्यवसाय ऑनलाईन कसा करावा हे मी सविस्तर दुसऱ्या लेखा मध्ये लिहलेले आहे तुम्हे खाली वाचू शकता.

ह्या मध्ये तुम्ही दोन प्रकारे ईकॉमर्स व्यवसाय करू शकता जर तुमच्याकडे अगोदरचा एखाद व्यवसाय असेल तर तो ऑनलाईन किंवा त्याला ईकॉमर्सची जोड देऊ शकता म्हणजे तुम्ही तुमच्या जुन्या व्यवसायाचे उद्पादन तुमच्या स्वतःच्या वेबसाईट वरून विकू शकता किंवा तेच प्रॉडक्ट्स तुम्ही दुसऱ्या ईकॉमर्स प्लॅटफॉर्म वरून विकू शकता म्हणजेच फ्लिपकार्ट किंवा ऍमेझॉन वरून.

दुसरा प्रकार म्हणजे तुम्ही स्वतःच फक्त ऑनलाइन स्टोर चालू करू शकता म्हणजे इथे तुमचा व्यावसाय फक्त ऑनलाईन असेल आणि तुमचे ऑफलाईन मध्ये कोणतेही दुकान किंवा स्टोर नसेल. आमचा बॉम्बे क्लोथिंग कंपनी (bombayclothing.com) हे स्टोर हे फक्त ऑनलाईन च आहे म्हणजे हा द्दुसऱ्या प्रकारचा व्यवसाय आहे.

तुम्ही पण आपला जुना व्यायवसाय ऑनलाईन करू शकता किंवा नवीन ईकॉमर्स व्यवसाय सुरु करू शकता.

सध्या संपूर्ण भारतभरात १ लाखाहून अधिक ऑनलाईन विक्रेते अमेझॉनवर/फ्लिपकार्ट वर विक्री करतात आणि ही संधी अशी आहे कि येथून आपण संपूर्ण भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात आपले प्रॉडक्ट्स किंवा सेवा विकू शकतो तेही २४ तास आठवड्याचे सातही दिवस.

आज काळ च्या ह्या Corona काळात आपला व्यवसाय हा ऑनलाईन असणे खूप महत्त्वाचे झाले आहे. तुम्ही तुमचा व्यवसाय ऑनलाइन करा आणि आपला व्यवसाय हा भविष्य ready करा.


तुमच्या प्रतिक्रिया कंमेंट बोक्स मध्ये कळवा.

Related Articles

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *