कंजूस की उदार ….
तूमच्या कानावर नेहमी काही शब्द सतत ऐकायला येत असतील की पैसा कमवून दाखव मग बोल .पैसा कमावयला किती कष्ट लागतात वगैरे वगैरे .पैसा जपून वापरायचा असतो..पैसा टिकवायला यायला पाहिजे …यामध्ये काहीही चूक नाही त्यांच्या जीवनानूसार ..आणि साधारण पणे माणसे याच विचाराचे असतात ..त्यात काय वाईट नाही
अशा विचाराने आपल्या देशाला हातभार लागतो पण आपली अर्थव्यवस्था धावणार नाही ,गती प्राप्त् होणार नाही..संथ गतीने ती चालत राहील .माझ्या मते आपल्या अर्थव्यवस्थेला गती प्राप्त् करून दयायची असेल तर माणसाने उदार होयला पाहिजे .जूने विचारात थोडासा बदल करणे गरजेचे आहे.जास्त् काटकसर करणे सोडले पाहिजे.
काटकसर करणे गरजेचे आहे पण कमी प्रमाणात करा. तुमच्या ईच्छा ,आकांशा मारून जगणे म्हणजे तूम्ही आपली अर्थव्यवस्था संथ गतीने चालण्यास मदत करत आहात.ते धावण्यासाठी तूमची मदत होत नाही..त्यासाठी तूम्हाला तूमच्या ईच्छा ,स्वप्न् मारून चालणार नाही.एखादी वस्तू जर घ्यायची ईच्छा झाली आणि तूम्ही जर ती घेत नसाल तर देशाला त्याचा काहीच उपयोग नाही..जर पैशाची कमतरता असेल तर पैशे कमवण्याचे नवीन नवीन मार्ग शोधून काढले पाहिजे.
आपली अर्थव्यवस्था जर मजबूत करायची असेल तर आपली खरेदी शक्ती वाढवली पाहिजे .तूम्हाला फक्त् स्वत्:च्या ईच्छा पूर्ण करायच्या आहेत.देशाला अप्रत्यक्ष फायदा होणारच आहे..तुम्हाला फक्त् तुमचा उत्पनाचा स्त्रोत वाढवता आला पाहिजे .
तात्पर्य असे आहे की देशासाठी कंजूष पणा सोडा आणि उदार व्हायला शिका..यासाठी फक्त् तूमचे स्वप्न् पुर्ण करा आणि सामाजिक कार्यात अप्रत्यक्ष पणे मदत करा.
लेखक : राम ढेकणे