Trending

Monsoon Updates Today : मान्सूनबाबत सर्वात मोठी अपडेट! 48 तासांत मान्सून महाराष्ट्रात धडकणार, आजपासून पुढील तीन दिवस तुफान पावसाची शक्यता…!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Monsoon Updates Today : सिंधुदुर्गमध्ये 3 ते 4 जून दरम्यान वादळी वारे, गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळं प्रशासनाने जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला आहे.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर, शेतात विहिरी खोदण्यासाठी मिळणार 4 लाखांचे अनुदान,

त्वरीत अर्ज करा…!

मुंबई : आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजासाठी (Monsoon News)  आनंदाची बातमी आहे. येत्या 48 तासांत मान्सून महाराष्ट्रात धडकणार आहे.   आजपासून पुढील तीन दिवस तूफान पावसाची शक्यता असल्याचा अंदाज  हवामान खात्याने व्यक्त केला आहे.तर  मुंबईत 4-5 जून पावसाचे आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे. यामुळे पावसाची प्रतीक्षा लवकरच संपण्याची शक्यता आहे.

केरळमध्ये मान्सीन वेळेअगोदरच दाखल झाला. त्यामुळे महाराष्ट्रातही मान्सून वेळेअगोदरच दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनच्या आगमनाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.  सध्या नैऋत्य मोसमी वारे हे दक्षिण कर्नाटकपर्यंत मजल मारली आहे. 

या बँकांमध्ये मिळणार स्वस्त वैयक्तिक कर्ज,

पहा २५ बँकांची यादी !

Monsoon Updates Today

मागील काही दिवसांपासून मुंबई तसेच उपनगरांत उकाड्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना वातावरणाचा त्रास जाणवत आहे. दरम्यान मुंबईत कोरडे वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर, ठाणे, पालघरमध्ये उष्ण दमट वातावरणाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात हलक्या पवासचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान कोल्हापूर,  सातारा, अहमदनगर, बीड आणि जालना भागात  वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या दरम्यान 40-50 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. 

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी.! फक्त 35 हजार रुपये भरून मिळवा मिनी ट्रॅक्टर,

इथे बघा कुठे करायचा अर्ज ..!

कसे असणार मुंबईचे हवामान?

सोमवारी मुंबईत तापमान 33 ते 35 अंशादरम्यान राहण्याचा अंदाज आहे. तर ठाणे, पालघर भागात उष्ण आणि दमट वातावरण असणार आहे. नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागणार आहे. 

सिंधुदुर्गमध्ये  आज किंवा उद्या  वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता 

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्गमध्ये 3 ते 4 जून दरम्यान वादळी वारे, गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळं प्रशासनाने जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच या काळात ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहणार आहेत. मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती आहे. त्यामुळं येत्या 2 ते 3 दिवसात तो कर्नाटकात पोहोचण्याचा अंदाज आहे. तर 7 ते 8 जुनपर्यंत मान्सून राज्याच्या प्रवेशद्वार असलेल्या सिंधुदुर्गात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

राज्यात इतर ठिकाणी कसं असेल हवामान?

वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे जूनच्या सुरुवातीला मान्सूनपूर्व पाऊस राज्यात सक्रिय होईल. त्याप्रमाणे आज 2 जून दक्षिण पश्चिम महाराष्ट्र सोलापूर सांगली धाराशिव लातूर नांदेड पाऊस वाढण्याची शक्यता आहे. तर 3/4/5 जूनला राज्यात मध्य महाराष्ट्र अहमदनगर नाशिक संभाजी नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर बीड परभणी जालना जोरदार मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 6/7/8 जूनला अरबी समुद्रात देखील एक प्रणाली सक्रिय होईल. तसेच 17/18 जून च्या जवळपास देखिल प्रणाली तयार होणार आहे.

Marathi Udyojak

मराठी उद्योजक हा प्रत्येक मराठी उद्योजकासाठी एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. मराठी उद्योजकच्या माध्यमातून आम्ही व्यवसाय, शेअर मार्केट, स्टार्टअप इत्यादी विषयी उपयुक्त माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोहचवत असतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *