उद्योजकीय पुस्तके
०१. रावण राजा राक्षसांचा – लेखक शरद तांदळे
रावण राजा राक्षसांचा ही रामायणातील पराक्रमी, विद्वान,वेदपंडीत,कट्टर शिवभक्त अश्या लंकेच्या राजाची कथा आहे.
आजवरची पुराण, कथा,साहित्य,कला यामधून रावणाला दुर्गुणी,अवगुणी प्रवृतीचा प्रतिक बनवलं गेल. परंतु रावणसंहिता,कुमारतंत्र,सामवेदातील ऋचा,शिवतांडवस्स्तोत्र,वीणा,बुद्धिबळ यांची निर्मिती रावणाने केली.येवढा विद्वान कित्तेक शास्त्रात पांडित्य मिळूनही खलनायक का ठरवला गेला?
सर्व देवांना पराभूत करणारा सर्व दैत्य, दानव,असुर आणि कित्तेक भटक्या जमातींना स्थैर्य आणि समृद्धी देऊन सोन्याची लंका बनवणाऱ्या महान राक्षस राजाच्या मनाची वेध घेणारी कादंबरी रावण राजा राक्षसांचा.
जर कुणाला रावणाची वेगळी कथा जाणून घ्यावी असे वाटत असेल तर ‘रावण राजा राक्षसांचा’ हि कादंबरी एक चांगला पर्याय आहे. प्रस्तुत कादंबरीमध्ये रावणाने अनार्यांना कसे संघटित केलंआणि एक वेगळी संस्कृती आणि राष्ट्र उभे केलं यावर हि बेतलेली आहे.
हि कादंबरी रामायणातील काळ आणि रावणाबद्दल एक वेगळा विचार मांडते आहे. तसेच, नेहमीच्या रामायणातील जादूमय आणि रहस्यमयी दुनियेतून वस्तुस्थितीवर प्रकाश टाकणारी हि कादंबरी आहे. वेगवेगळ्या अफवा / कथा पसरवून सर्वसामान्यांची कशा प्रकारे फसवणूक केली जाते किंवा केली जाऊ शकते हे हि खूप चांगल्या प्रकारे दाखवले आहे. उदा. रावणाला दहा दहा डोकी आणि वीस हात आहेत, यमाच्या राज्यात वैतरणा नदीतून रक्त वाहते वगैरे.
रावण हा एक पंडित होता ज्याने शिवस्तोत्र, रावण संहिता लिहिली, बुध्धीबळ हा बैठा खेळ शोधला.
पुस्तकाची किंमत : ४३० रुपये (घरपोच फ्री डिलिव्हरी )
विकत घेण्यासाठी तुम्ही पुढील क्रमांकावर phonepe /gpay /paytm करू शकता ९५९५९२२३१८
पेयमेन्ट साठी UPI ID : ९५९५९२२३१८@ybl
पुस्तकाची माहिती :
लेखक : शरद तांदळे
Publication: न्यू इरा पब्लिशिंग हाऊस
वजन : 550 Gm
Binding: Paperback
०२. द आंत्रप्रन्योर (The Entrepreneur) – लेखक शरद तांदळे
द आंत्रप्रेन्योर हे फक्त मार्गदर्शनपर पुस्तक नसून या पुस्तकाचे लेखक आणि प्रकाशक असलेल्या शरद तांदळेची ही आत्मकथा आहे. आंत्रप्रेन्योर या परदेशी शब्दाबद्दल बरेच गैरसमज प्रसूत आहेत जसे की एखादी सॉफ्टवेयर स्टार्ट अप कंपनी कोणी उघडली असेल तर तोच आंत्रप्रेन्योर असतो. पण लेखकाने सांगितले आहे की कोणताही व्यवसाय पारंपरिक अथवा नव्या पद्धतीने सुरु करणारा कोणीही हा आंत्रप्रेन्योर असतो.
कोणताही व्यवसाय चांगला किंवा यशाची हमी देणारा नसतो जोवर आपण तो पूर्ण समजून तयारीनिशी सुरु करत नाहीत. व्यवसाय म्हणला की बऱ्याच जणांना फक्त बक्कळ पैसा दिसतो पण तेवढेच खरे नसते, त्याचबरोबर संघर्ष, तात्पुरते अपयश आणि एक सामाजिक जबाबदारीसुद्धा आपल्याकडे येते. जगात नवउद्योजक निर्माण होणे खूप गरजेचे आहेत, कारण ते देशाच्या अर्थव्यवस्थेला तसेच रोजगार निर्मितीला खूप मोठा हातभार लावतात. उगीच कोणीतरी म्हंटले किंवा दुसऱ्याची बिझिनेस आयडिया घेऊन व्यवसाय सुरु केला तर ते बुडण्याचीच शक्यता जास्त असते. त्यामुळे ज्याला उद्योजक व्हायचे आहे त्याने सर्व गोष्टींचा अभ्यास करून छोट्या भांडवलातून उद्योग आरंभावा हे उत्तम.
पुस्तकात लेखकाने त्यांचा उद्योजक होण्यापर्यंतचा प्रवास वरवर न सांगता त्यातल्या अनेक लहानसहान खाच खळग्यांसहित सांगितला आहे. तसेच त्यांनी त्यांचे कॉलेज चे जीवन आणि कॉलेज संपल्यानंतर उद्योजक होईपर्यंत काय काय करामती केल्या याचे मनोरंजकरित्या विवेचन केले आहे. पुस्तक वाचताना प्रत्येकाला आपण त्या वयात केलेल्या कारनाम्याची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.
शरद तांदळे यांचा सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरातून उद्योजक होण्यापर्यंतचा प्रवास हा खूपच प्रेरणादायी आहे. हे पुस्तक सर्वांनी वाचावे असे असून त्यामुळे दिशाहीन तरुण पिढीला जर योग्य दिशा सापडली तर अशा पुस्तकाचा उद्देश्श सफल झाला असे म्हणता येईल.
पुस्तकाची किंमत : २९० रुपये (घरपोच फ्री डिलिव्हरी )
विकत घेण्यासाठी तुम्ही पुढील क्रमांकावर phonepe /gpay /paytm करू शकता ९५९५९२२३१८
पेयमेन्ट साठी UPI ID : ९५९५९२२३१८@ybl
पुस्तकाची माहिती :
लेखक : शरद तांदळे
Category: बिझनेस आणि व्यवस्थापन
Publication: न्यूइरा पब्लिशिंग हाऊस
Weight: 170 Gm
Binding: Paperback