Trending

Monsoon Alert Maharashtra : आज विदर्भात मुसळधार; नगर, पुण्यासह १६ जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’…….!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Monsoon Alert Maharashtra : राज्यात मान्सून दाखल झाला असून आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाऊस राहणार असल्याचे हवामान विभागाने (IMD Monsoon Alert) सांगितले. संपूर्ण विदर्भात माेसमी पावसाने हजेरी लावली असून पुढील सलग पाच दिवस विदर्भात पाऊस मुक्कामी आहे. हवमान विभागाने विदर्भासह १६ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.

शिलाई मशीन योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा ..!

राज्यात हलक्या व मध्यम सरींच्या शक्यता आहे. कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे, विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील पाच दिवसात मुसळधार पाऊस होणार असून पुढील २४ तासांत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यावर पावसाची रिपरिप वाढेल, असा अंदाज देण्यात आला आहे.

दरम्यान आज दि १३ जून रोजी बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाची शक्यता असून नगर, पुण्यासह राज्यातील १६ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

9 वी,10 वी आणि 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार

1,25,000 रुपयांची शिष्यवृत्ती……!

कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट ? Monsoon Alert Maharashtra

आज संपूर्ण विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता असून बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मध्य महराष्ट्रात नगर, पुणे सोलापूर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात धाराशिव, लातूर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून बीड नांदेड जिल्ह्यांमध्ये हलक्या व मध्यम सरींची हजेरी लागेल.

Marathi Udyojak

मराठी उद्योजक हा प्रत्येक मराठी उद्योजकासाठी एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. मराठी उद्योजकच्या माध्यमातून आम्ही व्यवसाय, शेअर मार्केट, स्टार्टअप इत्यादी विषयी उपयुक्त माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोहचवत असतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *