Trending

Farm Land : सावकाराने हडप केलेली जमीन परत कशी मिळवायची? वाचा सविस्तर…….!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Farm Land : सावकाराच्या ताब्यातून जमीन (Farm Land) कशी सोडवायची ? त्यासाठी काय प्रक्रिया आहे ? हे आपण जाणून घेऊ..!

शेतकऱ्यांपुढे संकटे जणू पाचवीलाच पुजली आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी शेतकन्यांचा सावकारी (Money Lender) फेरा काही चुकत नाही. अशात शेतकऱ्यांच्या अडचणीचा फायदा येत मनमानी व्याज लावून शेती बळकावल्याच्या घटना जिल्ह्यातही समोर आल्या आहेत. अनेकदा यातून शेतकरी टोकाचे पाऊल उचलत असतात. मग अशा परिस्थितीत सावकाराच्या ताब्यातून कायदेशीर पद्धतीने जमीन (Farm Land) कशी सोडवायची? त्यासाठी काय प्रक्रिया आहे? हे आपण जाणून घेऊ..!

सावकाराने हडप केलेली जमीन परत कशी मिळवायची ?

वाचा सविस्तर…….!

सततची नैसर्गिक आपत्ती अन् शेतीपिकांचे नुकसान (crop Damage), नापिकी आणि बँकेचे डोक्यावरील कर्ज (Crop Loan) अशातच मुलीचा विवाह, मुलाचे शिक्षण, दवाखान्याचा खर्च, अशा अनेक कारणांसाठी शेतकरी शक्य त्या सर्व पर्यायांचा अवलंब करतो. मात्र, प्रयत्नांना यश येत नसल्याचे पाहून शेवटी सावकाराचा दरवाजा ठोठावतो. समोरच्याची गरज पाहून सावकारही पाच ते दहा टक्क्यांनी पैसे देतो. शिवाय मुद्दलसह व्याजाच्या रकमेवर चक्रवाढ व्याज घेतो, ते वेगळे. सावकाराचे कर्ज शेतातील पिकातून कमी होईल, आपली जमीन पुन्हा परत मिळेल, या आशेने रक्ताचे पाणी करून पिकाला जपतो. परंतु, नापिकीच्या दृष्ट चक्रात अडकतो. शेतकरी पैसे परत करू शकत नसल्याने ती जमीन सावकाराच्या घशात जाते.

पावसामध्ये बाइकवर लेकरांना किती भिजवणार ?

1.35 लाख रुपये कमी देऊन tataची शानदार कार आणा घरी..!

अर्ज कसा करावा ? Farm Land

ज्या शेतकऱ्याची जमीन सावकाराने हडप केली आहे, त्याला संबंधित जिल्हा उपनिबंधक यांच्या ‘कार्यालयात जाऊन गोपनीय पद्धतीने अर्ज करावा लागतो. यासाठी शेतकरी एका साध्या कागदावर लिहून हा अर्ज करू शकतात. तसेच माझ्या जमिनीवर संबंधित व्यक्तीने ताबा मिळवला आहे. अशी तक्रार करू शकतात. सावकाराकडून घेतलेल्या कर्जाचा पुरावा आवश्यक आहे.

हडप केलेली जमीन परत कशी मिळवायची ?

एखाद्या शेतकऱ्याची जमीन सावकाराने फसवणूक करून बळकावली असेल तर त्या शेतकऱ्याला ती जमीन थेट परत मिळू शकते. पण, त्यासाठी संबंधित शेतकऱ्याने सावकाराच्या नावे जमिनीचे खरेदीखत झाल्यापासून पुढे २५ वर्षाच्या आत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे दावा दाखल करणे किवा तक्रारी अर्ज करणे आवश्यक आहे. त्यानंतर सखोल चौकशी होऊन गुणमूल्याच्या आधारावर अंतिम निकाल होतो.

शेळीपालनासाठी सरकारची नवीन योजना,

पाहा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ………!

सातबारावर बोजा असताना खरेदीखत होतेच कसे ?

सातबारा उताऱ्यावर बँकेच्या कर्जाचा बोजा असल्यास ती जमीन ना दुसऱ्याला खरेदी करता येत, ना त्याची विक्री करता येत. बोजा असलेल्या जमिनीची खरेदी – विक्रीपूर्वी सातबारा उताऱ्यावरील बोजा कमी करून बँकेचे पत्र व्यवहारावेळी जोडणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक जमिनींची खरेदी विक्री बँकेचा बोजा असतानाही होत असल्याची चर्चा आहे. पोकळ बोजा असल्याचे तोंडी सांगून असे व्यवहार होत असल्याचीही चर्चा आहे.

खासगी सावकाराने फसवणूक करून जमीन बळकावली असल्यास संबंधित शेतकयास साध्या कागदावर थेट कार्यालयाकडे तक्रार करता येते. अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रानुसार सत्यता पडताळली जाते. त्यानंतर दावा दाखल होऊन दोन्ही बाजूंची सुनावणी घेतली जाते. वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत १४९ तक्रारी दाखल झाल्या. मात्र, अद्याप शेतकऱ्यांकडून सावकारांनी शेती बळकावल्याचे पुरावे सादर केले नाहीत. ज्या तक्रारीत तथ्य आढळून आले, त्या प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले असून, प्रकरणे चौकशीत आहे.

Marathi Udyojak

मराठी उद्योजक हा प्रत्येक मराठी उद्योजकासाठी एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. मराठी उद्योजकच्या माध्यमातून आम्ही व्यवसाय, शेअर मार्केट, स्टार्टअप इत्यादी विषयी उपयुक्त माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोहचवत असतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *