पेपर कप Manufacturing व्यवसाय बद्द्दल माहिती

नमस्कार उद्योजकांनो, पेपर कप उद्योगाला भविष्यामध्ये अतिशय मागणी असणार आहे , आज काल वाढत्या प्लास्टिक प्रदूषणामुळे पेपर चे प्रॉडक्ट्स ची मागणी वाढली आहे, ह्या मध्ये लोकांची पर्यावरना विषयी जण जागृती आणि सरकारचे प्लास्टिक प्रॉडक्ट्स वरती बंदी ह्या दोन्ही गोष्टी कारणीभूत आहेत.
आपण पाहुयात हा उद्योग नेमका कसा चालू करायचा आणि ह्या व्यवसाय करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींची पूर्तता कशी करायची.
पेपर कप साठी मार्केट कोणते आहे ?
पेपर कप हे disposable असतात आणि त्यांना खाण्यायोग्य पेपर पासून बनवतात म्हणजे हे कप पर्यावरणासाठी तसेच आपल्या साठी घातक नसतात, तसेच ते गरम किंवा थंड पदार्थ काही काळ होल्ड करू शकतात त्यामुळे त्यांची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे.
पेपरच्या कप ची मागणी हि नेमकी IT कंपन्या, कार्यालये , लग्न समारंभ व इतर कार्यक्रम ह्यातून येते. म्हणजे आपल्याला आपल्या पेपर ची मार्केटिंग हि ह्या गोष्टींना लक्षात ठेऊन करावी लागेल.
तुम्ही पेपर कप हे होलसेल विकू शकता, त्यामुळे विकण्याचा किंवा डिस्ट्रीबुट करण्याचा त्रास कमी होऊन जाईल आणि आपल्याला पूर्ण फोकस हा production वरती केंद्रित करता येतील.
Manufacturing प्रोसेस.
पेपर कप बनवण्याच्या मुखत्वे ३ स्टेज आहेत, त्यात पहिली स्टेप म्हणजे कप ला लागणारे पेपर यॊग्य आकारात कापून घेणे.
दुसरी स्टेप म्हणजे कापलेले पेपर तुकड्यांना योग्य तो आकार देणे. ह्या मध्ये बाजूच्या पेपर ला आकार आणि खाली असलेले बेस त्याला जोडून घेणे.
तिसऱ्या स्टेज मध्ये कप ला गरम करून हे आकार जोडून घेणे तसेच कप च्या कडेला दुमडून घेणे.
ह्या तीन स्टेप नंतर कप बनवणे हि प्रक्रिया संपते आणि कप हे एका वर एक असे जमा केले जातात.
पेपर कप साठी येणारा खर्च
ह्या उद्योगासाठी १०-१५ लाखपर्यंत खर्च येऊ शकतो. हि गुंतवणूक प्राथमिक पणे उद्योगासाठी लागणारी मशीनरी आणि वस्तू खरेदीसाठी लागेल, ह्यातील काही भांडवल हे कच्चा माल आण्यासाठी पण बाजूला ठेवावे लागेल.
ह्यातून आपल्यला दिवसामध्ये ३०,००० कप बनवणे श्यक्य होईल. एका कप ची किंमत हि ३० पैसे ते ४० पैसे एवढी असते. महिन्याला अंदाजे २.५ लाख ते ३ लाख एवढी उलाढाल ह्या उद्योगातून होऊ शकते.
एकदा का चांगली उलाढाल झाली तर तुम्ही तुमची कंपनी रजिस्टर करून बँक मध्ये लोण साठी apply हि करू शकता.
जमीन आणि शेड
Paper cup उद्योगासाठी तुम्हाला २ ते ३ गुंठे एवढी जागेचे शेड त्यात इलेक्ट्रिसिटीची सोय असावी.
जर शेड हे रोड लागत किंवा शहराजवळ असेल ते तुम्हाला लॉजिस्टिक साठी गोष्टी सोयीस्कर होतील.
पण हि काही प्रथम गरज नाहीय तुमचे शेड हे रोड पासून दूर असेल तरी पण चालेल. परंतु इलेक्ट्रिसिटी ची चांगली सोय असणे अत्यंत महत्वाचे आहे.
मशीनरी
भारतामध्ये Paper cup manufacturing ची मशीन खूप ठिकाणी विकत भेटू शकते. ह्याची माहिती तुम्ही ऑनलाईन वेबसाइट वरुन मिळवू शकता. एका मशीन ची जवळपास किंमत हि ८,५०,००० एवढी असून तुम्हाला Paper cup च्या size आणि कॅपॅसिटी नुसार डाय करून घ्यावी लागेल त्यासाठी तुम्हला १ ते १.५ लाख एवढा खर्च येऊ शकतो.
पेपर कप उद्योगासाठी लागणारी मशिनरी ही इंडियामार्ट वर उपलब्ध आहे.
मॅनपॉवर
आपल्याकडे जर एकच मशीन असेल तर ३-४ लोक कामाला लागतील, त्यात एक production मॅनेजर, एक सेल्स साठी व्यक्ती, एक स्किल वाला आणि एक स्किल नसलेला कामगार लागतील .
तुम्ही स्वतः उद्योग पाहणार असाल तर तुम्ही सेल्स किंवा production मॅनेजर म्हणून काम करू शकता.
Raw मटेरियल
ह्या उद्योगसाठी PE पेपर , बेस रीळ आणि पॅकिंग मटेरियल म्हणून raw मटेरियल लागेल. पेपर कप साठी तूम्हाला working कॅपिटल हे वेगळं ठेवावा लागेल.
पेपर कप उद्योगातील नफा
या व्यवसाय मधील व्यवसायात एकूण १० लाख सुरुवातीची इन्व्हेस्टमेंट आणि नंतर १० लाखा पर्यंत वर्किंग कॅपिटल लागेल. ह्यावर तुम्ही एका वर्षात अंदाजे ५० ते ६० लाखाचा व्यवसाय करू शकता.
ह्यात तुम्ही मार्जिन १० % पकडली तर वर्षाला १० लाखा पर्यंतचा नफा होऊ शकतो.
ह्यामध्ये तुम्ही किती विक्री करता हे महत्वाचं आहे.
तुम्हाला हि माहिती कशी वाटली नक्की सांगा आणि आणखी कोणत्या व्यवसायाबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे हे कंमेंट बॉक्स मध्ये सांगा.
मराठी उद्योजक
हे वाचा – टी-शर्ट प्रिंटिंग व्यवसाय बद्दल माहिती
Its nice pan mala jar ha business karyacha ashal tar mag mala loan milu shkata ka
Ho Bhetel..project Report tayar karun bank madhe juan ekda bola
HO bhetu shakt..bank madhe jaun bola ekda
Mala ha business karcha ahy
चांगला business आहे
Dada patravali ani dron che mahiti sanga na
Nemki kay mahiti haviy tyabaddal ?
Loan sathi sampark kara 8169906635
ओके सर