सेंद्रिय खताचा व्यवसाय कसा सुरू करावा ? How to start an organic fertilizer business

कंपोस्ट म्हणजे सेंद्रीय खत. कंपोस्ट हा इंग्रजी शब्द आहे, त्यामुळे शेतकरी संभ्रमात पडतात. कंपोस्ट आणि सेंद्रीय हे वेगवेगळे खत आहेत की काय, असे त्यांना वाटते. काही लोक आजकाल सेंद्रीय खताचे महत्व पटल्यामुळे सेंद्रीय खत विकत घ्यायला लागले आहेत. पण त्याचीही गरज नाही. organic

आपल्याच शेतातला पाला-पाचोळा, गव्हाचे काड, पाचट, तुराट्या, सूर्यङ्गुलाची ताटे, कोणतेही पीक घेतल्यानंतर मागे जे काही उरलेले असेल ते म्हणजे पाने, ङ्गांद्या, खोड, टरङ्गल, भुस्सा, गवत, कोंबडीची विष्ठा, डुकाराच्या लेंड्या यांना कुजवून जे खत तयार होते त्याला कंपोस्ट खत म्हणतात. शेतकर्‍यांकडे बराच सेंद्रीय कचरा असतो.

परंतु त्याचा वापर सेंद्रीय खत करण्यासाठी होत नाही. हा कचरा जाळून टाकला जातो. उसाचे पाचट सुद्धा शेतकरी जाळून टाकतात. तसे ते जाळले म्हणजे खोडवा चांगला येतो, पिकातली कीड मारली जाते, खोडवा लवकर उगवून येतो असे अनेक गैरसमज असल्यामुळे शेतकर्‍यांचा उसाचे पाचट जाळण्याकडेच कल असतो. पण पाचटाचा सुद्धा उत्तम खत तयार होत असतो.

➡️ बिझनेस विषयी माहितीसाठी व मदतीसाठी जॉईन करा आपल्या जिल्ह्याचा मराठी उद्योजक व्हॉट्सॲप ग्रुप

organic fertilizer
organic fertilizer
error: Content is protected !!